वर्धमान महावीर कोण होते? वर्धमान महावीर यांनी जगाला कोणती शिकवण दिली? -Bhagwan Vardhaman Mahavee

वर्धमान महावीर कोण होते? वर्धमान महावीर यांनी जगाला कोणती शिकवण दिली?

भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चौविसावे तीर्थंकर,तसेच गुरू प्रवर्तक होते.जैन धर्मातील लोक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने अणि उत्साहाने त्यांची जयंती साजरी करत असतात.

२०२३ मध्ये वर्धमान महावीर यांची जयंती कधी आहे?

हया वर्षी २०२३ मध्ये ४ एप्रिल रोजी वर्धमान महावीर यांची जयंती साजरी केली जाणार आहे.वर्धमान महावीर यांच्या जन्मदिनी पर्व साजरा करण्यात येते.

भगवान महावीर यांचा जन्म हा बिहार राज्यामधल्या वैशाली नामक जिल्ह्यातील कुंडग्राराम ह्या गावी झाला होता.कुंडग्राम गाव त्याकाळी क्षत्रियांचे परत म्हणून ओळखले जायचे.अणि वर्धमान महावीर यांचे पिता ह्या कुंडग्रामचे प्रमुख राज्यकर्ते होते.

आईवडिलांच्या मृत्युनंतर वडिलांच्या गादीवर त्यांचा मोठा भाऊ विराजमान झाला.वर्धमान महावीर यांना संसारी राजेशाही जीवणाचा त्याग करायचा असल्याने त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या अनुमतीने कायमचे घर सोडले.

जवळ एवढा राजविलास उपभोगण्यासाठी असुन देखील भगवान महावीर यांचे मन ह्यात अजिबात रमले नाही.अत्यंत अल्प वयात दीक्षा प्राप्त करण्यासाठी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला.यानंतर त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली.

वर्धमान महावीर यांनी सर्व जगाला अहिंसा आणि अपरिग्रहाची शिकवण दिली होती.वर्धमान महावीर यांचा भक्तीपेक्षा अधिक कर्म अणि ज्ञान ह्या दोन गोष्टींवर विश्वास होता.

एखाद्याला आपल्या मदतीची आवश्यकता आहे अणि आपण त्या व्यक्तीला मदत देखील करू शकतो पण तरी देखील आपण जर त्याला मदत नाही केली तर ही सुदधा एक हिंसाच असते असे वर्धमान महावीर म्हणत असत.

भगवान वर्धमान महावीर यांनी अहिंसा,अस्तेय,ब्रम्हचर्य, सत्य अणि अपरिग्रह जगाला ह्या पाच प्रमुख तत्वांची शिकवण दिली.

याचसोबत चोरी करणे,मोह करणे,एखाद्याचा द्वेष करणे किंवा निंदा करणे,असत्य बोलणे, क्रोध करणे असंयम बाळगणे ह्या सर्व गोष्टी पाप असतात हे पाप कधीही करु नये ह्या पापाचा आपण त्याग करायला हवा असे सांगितले.

See also  संस्कृत दिवस महत्व अणि इतिहास - Sanskrit Diwas Importance And History In Marathi

त्याग,करूणा,प्रेम,संयम,सदाचार,शील हे वर्धमान महावीर यांच्या प्रवचनाचे मुख्य सार असत.वर्धमान महावीर यांनी देशभर भ्रमंती केली अणि आपला हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.

प्राणीमात्रांवर प्रेम करा निसर्गाच्या जवळ जा असे त्यांनी आपणास सांगितले.आपण प्रत्येक सजीव प्राण्याच्या प्रती मनात दयेची करूणेची भावना ठेवायला हवी.

कधीही कोणाविषयी मनात घृणा बाळगु नये कारण असे करून आपला स्वताचाच विनाश करत असतो असे वर्धमान महावीर सांगायचे.लाखो शत्रुंवर विजय प्राप्त करण्यासाठी आधी आपण स्वतावर विजय प्राप्त करणे शिकणे आवश्यक आहे असे ते नेहमी सांगत असत.

जर आपण आपल्या आत्मयातील वाईट प्रवृत्तींना वेगळे केले तर आपणास विजय प्राप्त करण्यास काहीच अवघड नाही असे त्यांचे मत होते.

कार्तिक कृष्ण अमावस्येच्या दिवशी वर्धमान महावीर यांचे बिहार मधल्या पावापुरी येथे वयाच्या ७२ व्या वर्षी महावीर स्वामींचे निर्वाण झाले होते.