संस्कृत दिवस महत्व अणि इतिहास – Sanskrit Diwas Importance And History In Marathi

Table of Contents

संस्कृत दिवस महत्व अणि इतिहास – Sanskrit Diwas Importance And History In Marathi

संस्कृत दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

दरवर्षी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस मोठया उत्साहात आनंदात अणि जल्लोषात साजरा केला जात असतो.

2022 मध्ये संस्कृत दिवस कधी साजरा केला जाणार आहे?

2022 मध्ये 12 आँगस्ट रोजी संस्कृत दिवस साजरा केला जाणार आहे.

संस्कृत दिवस का साजरा केला जात असतो?

मित्रांनो श्रावणी पौर्णिमेला भारतीय संस्कृतीमध्ये एक विशेष महत्व देण्यात आले आहे.तसेच संस्कृत दिनालाही आपल्या भारत देशात विशेष महत्व आहे.

 

  • कारण आपल्या भारत देशात जेवढेही त्रषी मुनी संत जन्माला आले.ते सर्व आपणास संस्कृत भाषेत बुदधी अणि ज्ञान या दोघांचीही अमुल्य देणगी दिली.
  • म्हणुन श्रावणी पौर्णिमेचा दिवस संस्कृत दिवस तसेच त्रषी पर्व दिवस म्हणुन सगळीकडे साजरा केला जातो.
  • विशेषकरून भारतात हा दिवस श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी मोठया उत्साहाने साजरा केला जातो.कारण भारत देश हा साधूसंताचा,त्रषी मुनींचा देश म्हणुन ओळखला जातो.
  • आपल्या देशातील घडुन गेलेल्या सर्व साधु संतांनी,त्रषी मुनींनी संस्कृत भाषेत आपणास जी विविध साहित्य कृतींच्या स्वरूपात ज्ञानाची देणगी दिली.त्यांच्या ह्या अमुल्य योगदानास श्रदधांजली वाहण्याकरीता हा दिवस दरवर्षी संस्कृत दिवस म्हणुन साजरा केला जात असतो.

भारतात संस्कृत दिवस कसा साजरा केला जातो?

संस्कृत दिनाच्या दिवशी भारतातील विविध शहर जिल्हा राज्यात संस्कृत भाषेतील साहित्य संम्मेलने कवी संम्मेलने इत्यादींचे आयोजन केले जाते.

या दिवशी विविध संस्कृत भाषेशी संबंधित भाषणे,स्पर्धा देखील आयोजित केल्या जात असतात.

संस्कृत भाषेचा इतिहास –

काळानुसार आजवर अनेक जुन्या भाषा लोप पावल्या आहेत पण संस्कृत भाषा आजही जिवंत आहे ती पुर्णपणे लोप पावलेली नाहीये.तिचे माधुर्य गोडवा कमी झालेला नाहीये.

  • संस्कृत भाषेलाच मराठी हिंदी तसेच इतर अनेक भाषांची जननी मानले जाते.कारण संस्कृत भाषेतुनच ह्या इतर भाषा जन्माला आल्या आहेत.
  • विविध धर्मातील ग्रंथांचे लेखन,वेदाची रचना साहित्याचे लेखन संस्कृत भाषेतच करण्यात आले आहे.
  • पतंजली ह्या साहित्य ग्रंथातील योगसुत्रामध्ये एकूण सहा प्रकारचे तत्वज्ञान सांगितले आहे जे संस्कृत भाषेतुन मांडले गेलेले आहे.
  • पाणिनीने रचलेले अष्टाध्यायी हे देखील संस्कृत भाषेशी निगडीत असलेल्या व्याकरणाशी संबंधित सर्वसमावेशक असे वर्णन म्हणुन ओळखले जाते.

संस्कृत दिवसाचे महत्व काय आहे?

संस्कृत दिवस हा जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणुन ओळखल्या जात असलेल्या संस्कृत ह्या भाषेला पुर्णपणे समर्पित असा दिवस आहे.

  • संस्कृत भाषेस देवनागरी भाषा असे देखील संबोधित केले जाते.हा दिवस आपल्या संस्कृतीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल मानला जातो.
  • कारण सध्या भारतात लोकांना संस्कृत भाषेत शिक्षण घेण्यास फारशी रूची असलेली आपणास दिसुन येत नाहीये म्हणुन संस्कृत भाषेतील शिक्षणाचे प्रमाण देखील कमी कमी होत चालले आहे.

संस्कृत दिवस सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला होता?

संस्कृत दिवस हा संस्कृत भाषेस समर्पित दिवस सगळयात आधी 1969 मध्ये प्रथमत व्यवहारात आणण्यात आला होता.

हा दिवस केंद्र अणि राज्य पातळीवर साजरा करण्यात यावा अशी घोषणा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केली होती.

जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणुन ओळखल्या जाणारया संस्कृत भाषेचे जतन करण्याचा हा पहिला टप्पा तसेच पहिले पाऊस होते असे म्हणण्यात येते.

संस्कृत दिवस हा श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच का साजरा केला जातो?

असे म्हटले जाते की प्राचीन काळामध्ये श्रावण पौर्णिमेच्याच दिवशी संस्कृत भाषेत शिक्षण देण्यास सुरूवात झाली होती.

ह्याच प्राचीन परंपरेला लक्षात ठेवून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा करण्यात यावा असे घोषित केले.

 संस्कृत दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु कोणता आहे?

संस्कृत ही जगामधील फार जुनी अणि फार प्राचीन काळातील भाषा आहे.म्हणजेच भारतीय संस्कृतीचा फार जुना घटक आहे.

ह्या भाषेस देववाणी मानले जाते.ह्या भाषेतील माधुर्य गोडवा विविध शब्दांचे यात करण्यात आलेले मिश्रण यामुळे ह्या भाषेकडे भारत देशासोबत इतर परदेशात देखील जगातील सर्वात प्राचीन प्रगत भाषा म्हणुन मोठया आदराने अणि सम्मानाने बघितले जाते.

काही भाषातज्ञांचे असे मत आहे की संस्कृत भाषा ही ग्रीक लँटिन ह्या भाषांपेक्षा फार जुनी भाषा आहे.म्हणजे आपली जुनी संस्कृती ह्या भाषेतुनच उदयास आली आहे.

लोकांच्या मनात आपल्या प्राचीन संस्कृति विषयी जागरूकता निर्माण राहावी.संस्कृत भाषा लोप पावु नये कारण ही भाषा सध्या फक्त घरगुती पुजा पाठ मंत्र विधी यासाठीच अधिक वापरली जात आहे.लोकांनी आपल्या संस्कृतीचा आदर अणि सम्मान करावा याकरीता जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

जगातील सर्वात प्राचीन अणि संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ कोणता आहे?

जगातील सर्वात प्राचीन अणि संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ त्रग्वेद हा आहे.

संस्कृत ही किती प्राचीन भाषा आहे?

संस्कृत भाषा ही भारतातील किमान तीन हजार पाचशे वर्ष इतकी जुनी भाषा आहे असे सर्वत्र मानले जाते.

संस्कृत भाषेशी संबंधित काही महत्वाचे ग्रंथ –

● चारही वेद

● उपनिषद

● अठरा पुराण

इत्यादी.

See also  Google Scholar विषयी माहीती - Advantages of using Google Scholar