ब्रिजिंग लोन म्हणजे काय? – Bridging loan meaning in Marathi

ब्रिजिंग लोन म्हणजे काय? – Bridging loan meaning in Marathi

आपण आतापर्यंत अनेक लोनविषयी ऐकले आहे कार लोन,होम लोन, बिझनेस लोन इत्यादी पण आज आपण एका अशा लोनविषयी जाणुन घेणार आहे ज्याचे नाव आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत देखील नाही.ह्या लोनचे नाव आहे ब्रिज लोन.

आजच्या लेखात आपण ब्रिज लोन कशाला म्हणतात?याचा नेमका अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.

ब्रिज लोन म्हणजे काय?Bridge loan meaning in Marathi

ब्रीज लोन हा एक शाॉर्ट टम लोनचाच प्रकार आहे.ज्याला आपण मराठीत अल्पकालीन कर्ज असे देखील म्हणतो.

ब्रिज लोन हे एक सिक्युअर लोन असते.म्हणजे हे लोन प्राप्त करण्यासाठी आपणास म्हणजेच लोन घेत असलेल्या व्यक्तीला गॅरंटी द्यावी लागत असते.यात व्याजदराची आकारणी सुदधा खुप अधिक केली जाते.

ब्रिज लोनला अजुन कोणत्या नावाने ओळखले जाते?

ब्रिज लोनला गॅप फायना्नसिंग लोन असे सुदधा म्हटले जाते.

ब्रिज लोनचा एकुण कालावधी किती असतो?

इतर लोनच्या तुलनेत ब्रिज लोन हे खुप कमी कालावधी साठी आपणास उपलब्ध करून दिले जात असते.हे लोन साधारणत १२ ते २४ महिन्याच्या कालावधीसाठी दिले जात असते.

ब्रिज लोन कधी घेतले जाते?

जेव्हा आपणास आपल्या वर्तमानातील तत्कालीन गरजा पूर्ण करायच्या असतील तेव्हा आपण हे लोन घेत असतो.

कधी कधी घर जमिनीची मालमत्तेची खरेदी तसेच विक्री करण्याच्या कालावधीत सुदधा हे लोन काही जण तत्कालीन स्वरुपात डाऊन पेमेंट करण्यासाठी घेत असतात.

See also  क्रिप्टोकरंसीची यादी- List Of Cryptocurrencies In Marathi

ब्रिज लोन कोणी घ्यायला हवे?

ज्यांना काही कारणास्तव तात्काळ पैशांची गरज आहे असे व्यक्ती आपली गरज भागवण्यासाठी ब्रिज लोन घेऊ शकतात.

ज्यांना गॅरंटी आहे की नजीकच्या काळात आपण आपले घेतलेले सर्व कर्ज फेडू शकतो असे व्यक्ती हे अल्पकालीन कर्ज घेऊ शकतात.

ज्यांना दिर्घकालीन कर्ज घ्यायचे नसेल ते हे कर्ज घेऊ शकतात.

ब्रिज लोन किती दिले जाते?

नवीन मालमत्तेच्या मुळ किंमतीच्या ७० ते ८५ टक्के इतके कर्ज यात आपणास प्राप्त होत असते.याचसोबत कर्ज घेणारया व्यक्तीचे उत्पन्न किती आहे यावर देखील ह्या कर्जाची रक्कम अवलंबून असते.

ब्रिज लोनची प्रोसेसिंग फी किती असते?

ब्रिज लोनची प्रोसेसिंग फी ही कर्जाची जी मुळ रक्कम आहे तिच्या काही टक्के आकारली जात असते.

ब्रिज लोन घेण्यासाठी कोणते डाॅक्युमेंट लागत असतात?

● आपले ओळखपत्र

● इन्कम प्रुफ

● अॅड्रेस प्रुफ

● दोन पासपोर्ट साईज फोटो

ब्रिज लोन प्राप्त करण्यासाठी आपणास एक अर्ज करावा लागतो त्या अर्जाला वरील सर्व कागदपत्रे जोडावी लागतात.

सिक्युरिटी म्हणजे काय?

सिक्युरिटी म्हणजे आपली एखादी मालमत्ता संपत्ती सिक्युरिटी साठी तारण ठेवणे होय.जर आपण घेतलेले लोन वेळेत फेडले नाही तर बॅक वित्तीय संस्था आपल्या त्या प्राॉपर्टीवर जप्ती सुदधा आणु शकते.