ब्रॉन्कायटीस म्हणजे काय?Bronchitis meaning in Marathi।

ब्रोंकायटीस म्हणजे काय?bronchitis meaning in Marathi

ब्रोंकायटीस म्हणजेच श्वास नलिका दाह होय.ब्रोंकायटीस हा एक खालच्या श्वसन मार्गाचा संसर्ग आहे.हा संसर्ग व्हायरल किंवा बॅक्टेरिअल असण्याची देखील शक्यता आहे.

ब्रोंकायटीस मध्ये आपल्या श्वसन नलिकेच्या आतील भागात सुज येत असते.याशिवाय विपुल प्रमाणात कफ देखील तयार होतो.

ब्रोंकायटीसचे प्रकार –

ब्रोंकायटीस हे दोन प्रकारचे असतात-

१)अॅक्युट ब्रोंकायटीस –

यात आपणास काही सर्व साधारण लक्षणे दिसुन येतात.ही लक्षणे लगेच दिसुन येत नाही.

२) क्रोनिक ब्रोंकायटीस –

अॅक्युट ब्रोंकायटीसची लक्षणे जेव्हा गंभीर रूप धारण करतात तेव्हा त्याला क्रोनिक ब्रोंकायटीस असे म्हटले जाते.

घशात खवखव होणे, डोकेदुखी,ताप ही तीव्र ब्रोंकायटीसची लक्षणे आहेत.

ब्रोंकायटीसची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत? bronchitis symptoms in Marathi

ब्रोंकायटीस मध्ये आपल्याला लागोपाठ खोकला येतो,भुक लागत नाही, डोके दुखते,ताप येत असतो,घसा बसतो,श्वास घेताना त्रास होतो, श्वास घेताना भीती वाटणे,छातीमध्ये कफ होऊ लागतात तसेच छातीवर दबाव येतो तसेच छातीत वेदना देखील होतात.

ब्रोंकायटीसची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत? bronchitis causes in Marathi

ब्रोंकायटीसचे प्रमुख कारण हे हवामानात झालेला बदल अणि कोंदट हवा हे आहे.याचसोबत प्रदुषण अणि धुम्रपानामुळे देखील ब्रोंकायटीस होत असतो.

ब्रोंकायटीस तेव्हा होत असतो जेव्हा आपल्या फुप्फुसांपर्यत हवा पोहचवणारी नळी म्हणजेच ब्रोकनिअल टयुब ला सुज येत असते.

ब्रोंकायटीस वर करावयाचे उपचार -bronchitis treatment in Marathi

  • ब्रोंकायटीसची सुरूवातीची लक्षणे समजुन आपण यावर घरगुती उपाय करून हा बरा करू शकतो.
  • ब्रोंकायटीस वर ज्येष्ठ मध खुप गुणकारी मानले जाते.यात अॅटी व्हायरल,अॅटी बॅक्टेरिअल अणि इंफलेमेंटरी गुणधर्म समाविष्ट असतात.
  • ज्येष्ठ मधाचे सेवन केल्याने श्वसन नलिकेच्या आतील साचलेला सर्व कफ निघुन जातो.याने श्वसन नलिकेच्या आतील भागातील सुज उतरून आपल्या घशाला देखील आराम प्राप्त होत असतो.
  • ज्येष्ठ मधाची कांडी चघळल्याने घशात जळजळ होत नाही.एखादया व्यक्तीचा घसा बसला असेल तर त्यावर देखील हे गुणकारी ठरते.
  • ज्येष्ठ मधाचे सेवन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो-
  • ज्येष्ठ मधाचे चुर्ण करून आपण ते मधासोबत घेऊ शकतो.याव्यतीरीक्त आपण ज्येष्ठ मधाचा चहा देखील करून घेऊ शकतो.
  • आले.लवंग,काळीमिरी या तिघांचा काढा किंवा चुर्ण करून आपण घेऊ शकतो.याने कफ पातळ होण्यास अणि ताप उतरण्यास मदत होते.
  • ब्रोंकायटीस वर कांदा देखील खुप फायदेशीर ठरत असतो.कांदयाचा रसाचे सेवन केल्याने जुना कफ निघुन जाण्यास मदत होते.अणि याने नवीन कफ देखील तयार होत नसतात.
  • हळद दुध पिल्याने घशाची सुज उतरण्यास मदत होते.अणि घशाला लवकरात लवकर आराम प्राप्त होत असतो.
  • ब्रोंकायटीस झाल्यावर आपण राईच्या तेलाने छातीवर गळ्यावर तसेच पाठीवर मालिश करू शकतो.किंवा गरम पाण्याने अंघोळ करू शकतो,शेक देखील घेऊ शकतो.याने आपणास आराम प्राप्त होत असतो.
See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०२३, थीम, पोस्टर, महत्त्व आणि इतिहास | World Food Safety Day 2023 In Marathi

पण जास्त त्रास होत असल्यास आपण डाॅक्टरांचा सल्ला देखील घ्यायला हवा.

ब्रोंकायटीस झाल्यावर कोणता आहार घ्यायला हवा?

ब्रोंकायटीस झाल्यावर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपण चिकनचे सुप घ्यायला हवे तसेच व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे आपल्या आहारात सेवन करायला हवे.

आले,मिरे,लसुन अणि गरम मसाला घालुन टोमॅटो सुप बनवायला हवे अणि हे सुप सकाळ संध्याकाळी घ्यायला हवे.

याचसोबत आपण साधे पाणी न पिता कोमट पाणी प्यायला हवे.आहारात तेलगट मसालेदार पदार्थांचा समावेश करणे टाळावे.

ब्रोंकायटीस होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी –

ब्रोंकायटीस होऊ नये म्हणून आपण प्रदुषणात जाणे टाळावे.धुम्रपान करू नये.आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे जास्त तिखट,साखरेचे,तेलाचे पदार्थ आपल्या आहारात अजिबात घ्यायचे नाही.

ब्रोंकायटीस वर आपण आपल्या श्वसन मार्गाच्या कार्यात सुधारणा होण्यासाठी तसेच ते सुरळीतपणे चालण्यासाठी आपण योग प्राणायाम कपालभाती असे व्यायाम देखील करू शकतो.