बाय जू रविंद्रन कोण आहेत?बायजु रविंद्रन सध्या का चर्चेत आहेत?- Byju’s CEO Raveendran
भारतातील प्रसिद्ध एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बायजु अॅपचे सीईओ बायजु रविंद्रन यांच्यावर नुकतीच ईडीने कारवाई केली आहे.
बायजु रविंद्रन यांच्या बंगळुरू मधील कंपनीच्या तब्बल तीन ठिकाणी आतापर्यंत ईडीकडुन छापे टाकण्यात आले आहेत.
परकीय चलन व्यवस्थापण कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी बायजु रविंद्रन यांच्यावर ईडीने ही कारवाई केली असल्याचे न्युज चॅनलवर सांगितले जात आहे.
चौकशीदरम्यान त्यांची अनेक महत्वाची कागदपत्रे अणि डिजीटल डेटा जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
ह्याच मुळे बायजु रविंद्रन यांच्या नावाची सध्या सोशल मिडिया वर चर्चा सुरू आहे.
आजच्या लेखात बायजु रविंद्रन यांच्याविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
बायजू काय आहे?
बायजु हे एक आॅनलाईन प्लॅटफॉर्म आहे तसेच एज्युकेशन प्लॅटफॉर्म अॅप आहे जे विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाईन पदधतीने अभ्यासासाठी एज्युकेशनल कंटेट उपलब्ध करून देण्याचे काम करते.
यात विद्यार्थ्यांना फ्री मध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जातात तर काही कंटेट साठी शुल्क आकारले जाते.आज 10 करोड पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हे अॅप गुगल प्ले स्टोअर मधून आॅनलाईन अभ्यासासाठी डाऊनलोड केले असल्याचे आपणास दिसून येते.
बायजु रविंद्रन कोण आहेत?
बायजु रविंद्रन हे शिक्षण क्षेत्रामधील जगातील दितीय क्रमांकावर असलेले श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले जातात.तसेच ते बायजु अॅपचे को फाऊंडर अणि सीईओ देखील आहेत.
बायजु रविंद्रन यांचा जन्म हा केरळ मधील कन्नुर जिल्ह्यात अझीकोड नावाच्या एका गावात १९८१ मध्ये झाला होता त्यांचे प्राथमिक केरळ येथील मल्याळम माध्यमिक शाळेत पुर्ण झाले.
बायजु रविंद्रन हे एक शिक्षक उद्योजक तसेच इनव्हेस्टर म्हणून आपणास परिचित आहेत.
फोर्ब्सच्या अहवालानुसार बायजु रविंद्रन यांची एकुण संपत्ती ही ३.४ अब्ज डॉलर इतकी आहे.म्हणजे जवळजवळ २५ ते २६ हजार कोटी रूपये इतकी आहे.
बायजु रविंद्रन यांचे नाव हे भारतातील अरबपतींच्या जागतिक यादीत क्रमवारीत ९९४ व्या क्रमांकावर आहेत.
असे सांगितले जाते की बायजु रविंद्रन यांना भारतातील शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणायचा होता.याचसाठी त्यांनी बायजु अॅप नावाचे एक आॅनलाईन लर्निग प्लॅटफॉर्म २०११ मध्ये सुरू केले होते.
२०१५ पर्यंत ही अॅप एक मोठी एज्युकेशन प्लॅटफॉर्म बनली होती.
बायजु रविंद्रन हे पहिले शिक्षक असे शिक्षक आहे जे आज एक मोठे उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात.
बायजु रविंद्रन यांच्या ह्या कार्यात त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ हिने त्यांना हातभार लावला होता.
परदेशातील उच्च पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून त्यांनी हे एज्युकेशन आॅनलाईन लर्निग प्लॅटफॉर्म सुरू केले होते.ज्याचा आज मार्केटमध्ये मोठा ब्रॅड तयार झाला असल्याचे आपणास दिसून येते.