३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस का साजरा केला जातो?
दरवर्षी संपूर्ण भारतात ३० एप्रिल ह्या तारखेला आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात येत असतो.
आयुष्यमान भारत ही एक योजना आहे जी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये सुरू केली होती.
ह्या योजनेचे मुख्य भारतातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणे अणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य प्राप्त करून देणे आहे.
दरवर्षी भारत सरकारच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेला आयुष्यमान भारत दिवस हया रूपात ३० एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असते.
चार ते पाच वर्षे पुर्वी म्हणजे २०१८ मध्ये २५ सप्टेंबर हया तारखेला आपल्या भारत देशात आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली होती.
३० एप्रिल हा दिवस संपुर्ण भारतात आयुष्यमान भारत दिवस म्हणून साजरा केला जातो.
आयुष्यात भारत योजनेअंतर्गत भारत सरकारच्या वतीने कमी उत्पन्न असलेल्या परीवाराला दरवर्षी पाच लाख रूपये पर्यंतची मोफत स्वास्थ सुविधा उपचार सुविधा निःशुल्क प्रदान करण्यात येत असते.
ह्या पाच लाखाच्या रक्कमेचा वापर करून लाभार्थी कुटुंबाला कुठल्याही खाजगी तसेच सरकारी रुग्णालयातुन कॅशलेस पद्धतीने उपचार प्राप्त करता येणार आहे.
देशातील गरीब अणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांसाठी ही योजना खुप फायदेशीर ठरते आहे.हया योजनेमुळे गरीबांना मोफत उपचार आरोग्य विषयक सुविधा प्राप्त करता येत आहे.
आयुष्यमान भारत योजनेला जगातील सर्वात मोठे आरोग्य कवच म्हणून देखील ओळखले जाते.हया योजनेअंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबांना पाच लाख रुपये इतके आरोग्य संरक्षण प्रदान केले जाते.
आयुष्यमान भारत योजना ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे दुसरे नाव आहे.
ह्या योजनेचा हेतु देशाच्या दुर्गम भागात परवडणारया वैद्यकीय सुविधांंना सामाजिक आर्थिक जातीच्या जनगणनेच्या डेटाबेसवर प्रोत्साहन प्राप्त करून देणे हा आहे.
ह्या योजनेच्या माध्यमातून १० करोड कुटुंबांना आरोग्य सुविधेचा लाभ प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले होते.
ह्या आयुष्यमान भारत योजनेत आरोग्य विम्याचा लाभ प्राप्त करण्यासाठी लाभार्थींना एक आयुष्यमान भारत कार्ड बनवावे लागते.
हे कार्ड घेऊन जो लाभार्थी कुठल्याही सरकारी तसेच खाजगी रूग्णालयात जाईल अणि ह्या कार्डची इंट्री करेल त्याला अणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
२५ सप्टेंबर रोजी सुरू झालेली योजना ३० एप्रिल रोजी का साजरा केली जाते?
शासनाने ठरवले होते की एक असा दिवस निर्धारित केला जाईल ज्या दिवशी जनतेमध्ये स्वच्छतेबाबत निरोगी आरोग्याबाबत जागृती केली जाईल.
तेव्हापासून ३० एप्रिल हा दिवस निर्धारित केला गेल्यानंतर ३० एप्रिल रोजी दरवर्षी लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण केली जाते आरोग्यविषयक कॅपस अभियान चालवले जातात.