रिफायनरी म्हणजे काय? रिफायनरीचे महत्व काय आहे रिफायनरीचे काम समुद्र किनारीच का केले जाते? – What is Oil refinery project in Konkan coast

रिफायनरी म्हणजे काय What is Oil refinery project

रिफायनरी याचा अर्थ खनिज तेलशुदधीकरण असा होतो.रिफायनरी प्रकल्पांमध्ये बाहेरच्या देशातील कच्चे खनिज तेल हे आपल्या देशात आणले जात असते.

अणि मग रिफायनरी प्रकल्पादवारे ह्या कच्च्या खनिज तेलाचे शुदधीकरण केले जाते.ज्यातुन पेट्रोल डिझेल इत्यादी असे केमिकल्स बाहेर पडत असतात.

आपल्या भारत देशातील उर्जेची बहुतांश गरज आज ह्या कच्च्या खनिज तेलादवारेच इंधन निर्मिती करून भागवली जात आहे.याकरीता आपल्या भारत देशात रिफायनरीची आवश्यकता विपुल प्रमाणात असल्याची आपणास दिसून येते.

अणि आपला भारत देश मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची यासाठी आयात देखील करत असतो.असे सांगितले जाते की हे परदेशातुन आयात केलेले कच्चे खनिज तेल देशांतर्गत वापरले जातेच शिवाय फायनल प्रोडक्ट मध्ये आल्यावर याची परदेशात निर्यात देखील केली जात असते.

भारत देशातील एक्सपोर्ट म्हणजे नि्र्याती मध्ये देखील सुद्धा येथील रिफायनरीचा खुप महत्वाचा वाटा आहे.रिफानरीच्या पेट्रोलियम प्रोडक्टच्या माध्यमातूनच आपल्या भारत देशाला परकीय चलन देखील उपलब्ध होत असते.

What is Oil refinery project in Konkan coast
What is Oil refinery project in Konkan coast

भारतात कोणत्या ठिकाणी रिफायनरी आहे?

आपल्या भारत देशात गुजरात मधील जामनगर येथे रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे.कोची ह्या ठिकाणी बीपीसीएलची रिफायनरी आहे.ओएनडीसी बंगलोर अणि बीपीसीएलची अजून एक रिफायनरी मुंबई शहरात आहे.

अशा एकुण आपल्या भारत देशात साधारणतः २४ ते २५ रिफायनरी असल्याचे आपणास दिसून येते यातील सर्वाधिक रिफायनरी ह्या समुद्राच्या किनारी असल्याचे आपणास दिसून येते.

रिफायनरीचे काम समुद्र किनारीच का केले जाते?

आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की रिफायनरीचे खनिज तेल शुद्धीकरणाचे काम हे इतर कुठेही न करता समुद्री किनारी तसेच कोकणी भागातच का केले जाते.

See also  Football world cup 2022 matches TV channel number in India - फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?

यामागे नेमके काय कारण असावे आपल्या ह्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत की रिफायनरी प्रकल्प राबविण्यासाठी सुरू करण्यासाठी समुद्र किनारपटटीचा भागच का निवडला जात असतो,तसेच कोकणी भागालाच का विशेष प्राधान्य दिले जाते.

रिफायनरी प्रकल्पात कच्च्या तेलाचे शुदधीकरण करून पेट्रोल,डिझेल,राॅकेल,एलपीजी, इत्यादी इंधनाची निर्मिती केली जाते अणि देशांतर्गत इंधनाची गरज भागल्यावर उरलेले इंधन परदेशात निर्यात देखील करण्यात येत असते.

रिफायनरीचे काम समुद्रकिनारी केले जाण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत –

१) समुद्र मार्गाने केलेल्या वस्तुंच्या आयात निर्यातीवर रहदारीचा खर्च कमी लागतो –

रिफायनरी प्रकल्पासाठी जे कच्चे खनिज तेल देशात आयात केले जाते हे जहाजा दवारे समुद्रमार्गाने आयात केले जात असते.

अणि समुद्र मार्गाने कच्च्या तेलाची आयात केली गेल्याने शासनाला आयातीचा खर्च खुप कमी करावा लागत असतो ज्याने आर्थिक बचत होते.नफ्याचे प्रमाण देखील वाढत असते.

समुद्र मार्गाने केल्या जात असलेल्या निर्यातीचा देखील हाच एक महत्त्वाचा फायदा असतो.

२) कच्च्या खनिज तेलाची ज्वलनशीलता –

कच्चे खनिज तेल हे अत्यंत ज्वलनशील असते.म्हणजे हे इंधन कधीही पेट घेऊ शकते.ज्यामुळे इतर रस्ते वाहतुक वाहनांनी याची वाहतुक करणे अवघड जाऊ शकते म्हणूनच याला समुद्र किनारी ठेवले जाते.

३) पाण्याची भासणारी आवश्यकता –

साधारणत एक बॅरल कच्चे तेल शुदध करायला जवळपास किमान पंधराशे लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते.म्हणुन हे समुद्राच्या जवळ असणे अधिक फायदेशीर ठरते.

जर शहरात इतर ठिकाणी हे तेलशुदधीकरण प्रकल्प उभारले तर ह्या प्रकल्पात पाण्यासाठी जमिनीच्या पाण्यावर अवलंबितता वाढू शकते.अणि जमिनीखालील पाणी म्हणजे भुजल फार झपाट्याने कमी होण्याची शक्यता देखील असते.

रिफायनरी प्रकल्पात पाणी हे दोन स्टेज मध्ये वापरले जाते एक प्रक्रिया करणयादरम्यान अणि दुसरी कुलिंग दरम्यान म्हणजे यात विपुल प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत असल्याने देखील रिफायनरीचे प्रकल्प पाण्याच्या आवश्यकतेनुसार समुद्र किनारी उभे केले जात असतात.

See also  मराठी विचार - Good thoughts in Marathi

समुद्र किनारी रिफायनरी बसविण्यास विरोध केला जाण्याचे कारण काय आहे?

रिफायनरी प्रकल्पात एक बॅरल प्रोजेक्ट मधून डिझेल पेट्रोल जेट फ्युएल एलपीजी इत्यादी इंधनाची निर्मिती होत असते.

यात किमान साठ लीटर पेट्रोल निघते,चाळीस लीटर डिझेल निघते अणि दहा लीटर इतके जेट इंधन निघते बाकीच्या इंधनातुन देखील सुमारे २० ते २५ टक्के इंधन निर्माण केले जाते.

हे सर्व इंधन निर्मिती करत असताना मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत असते.

याचसोबत तज्ञांकडुन असे सांगितले जाते आहे की ह्या रिफायनरी प्रकल्पातील निघणारया सांडपाण्यामुळे समुद्र नदीचे पाणी प्रदुषित होईल पाण्यातील जीव जंतु मासे वगैरे नष्ट होतील.

बारसु सोनगाव येथील स्थानिक लोकांचे असे मत आहे की ह्या प्रकल्पामुळे पर्यावरणावर देखील वाईट परिणाम होईल, ह्या रिफायनरी मधुन जे दुषित पाणी बाहेर पडेल ते नदीत मिसळल्याने नदीचे पाणी दुषित होईल.सर्व शेतीतील फळझाडांची देखील नासाडी होईल.

आणि ह्या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम येथील परंपरागत मासेमारी व्यवसायावर पडेल त्यामुळे येथील मासेमारी व्यवसाय करणारयांनी देखील ह्या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

याचसोबत ह्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्ग संपन्नतेला धोका निर्माण होईल,मोठया प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण केले जाईल जेणे येथील परंपरागत शेती व्यवसाय धोक्यात येईल अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.