समुपदेशन म्हणजे काय?- Counselling meaning in Marathi

समुपदेशन म्हणजे काय?- counselling meaning in Marathi

काऊंसिलिंगचा अर्थ मराठीत समुपदेशन असा होत असतो.काऊंसिलिंग ही एक पदधत आहे जिच्यादवारे मानसिक समस्या असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांच्यावर उपचार केले जातात.

म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला काही मानसिक आजार किंवा इतर मानसिक आरोग्य विषयक समस्या असल्यास त्याच्यावर समुपदेशनाच्या माध्यमातुन उपचार केले जातात.

काऊंसिलिंगमध्ये कोणाचा समावेश होत असतो?

समुपदेशनाच्या प्रक्रियेत एकुण दोन व्यक्तींचा समावेश होत असतो.

एक तो व्यक्ती असतो ज्याला आजार तसेच मानसिक समस्या आहे.अणि दुसरा तो तज्ञ व्यक्ती असतो जो त्या मानसिक आजार तसेच समस्या असलेल्या रूग्णाला बरे करणार असतो त्याला योग्य ते मार्गदर्शन करणार असतो अणि त्या मानसिक समस्येतून बाहेर पडण्यास मदत करणार असतो.

काऊंसिलर म्हणजे काय?काऊंसिलर कोण असतो?

काऊंसिलर म्हणजे अशी एक तज्ञ व्यक्ती जी इतरांना समुपदेशन करण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम करते.

जेव्हा आपणास कुठल्याही क्षेत्रातील काही समस्या असते तेव्हा त्या समस्येतुन बाहेर कसे पडायचे याविषयी मार्गदर्शन प्राप्त करायला आपण त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेत असतो.
ज्याला त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान आहे.जो आपल्याला त्याविषयी योग्य ते अचुक मार्गदर्शन करू शकतो.

काही जण मानसिक आजार समस्या यांवर उपचार करण्यासाठी त्याविषयी मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी काऊंसिलरकडे जातात.

तर काही जण वैयक्तिक,व्यावसायिक,करिअर विषयक तसेच वैवाहिक संबंध विषयक समस्या दुर करण्यासाठी त्या विषयी मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी देखील काऊंसिलरकडे जात असतात.

See also  CRPF शौर्य दिवस कोट्स २०२३, शुभेच्छा | CRPF Valour Day Quotes In Marathi

काऊंसिलर हा मानसिक दृष्टया खचलेल्या निराश हताश झालेल्या व्यक्तीला मार्गदर्शन करून पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी प्रेरित करत असतो.

काऊंसिलरचे प्रकार किती आणि कोणते आहेत?types of counseling in Marathi

1)करिअर काऊंसिलर –

हा काऊंसिलिंगचाच एक महत्वाचा प्रकार आहे ज्यात आपल्याला काऊंसिलर हा करिअरविषयी मार्गदर्शन करण्याचे काम करत असतो.

शिक्षणासाठी कोणते क्षेत्र आपण निवडायला हवे कोणते क्षेत्र आपल्यासाठी अधिक योग्य अणि उत्तम आहे हे आपणास करिअर काऊंसिलर सांगत असतो.

ज्या विदयार्थ्यांना आपण कोणते क्षेत्र निवडावे हे कळत नसते अशा भयभीत अणि निराश झालेल्या विदयार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य ती दिशा दाखवण्याचे काम करिअर काऊंसिलर करत असतो.

2) मँरेज काऊंसिलर –

जे स्त्री पुरूष विवाहीत आहेत घरात त्यांचे आपल्या पतीशी पत्नीशी सतत भांडण होत असते एकमेकांशी नीट जमत नही सतत वादविवाद होत राहता अशा विवाहीत कपल्सला रिलेशनशिप विषयी मार्गदर्शन करण्याचे काम मँरेज काऊंसिलर करत असतो.

3) सायकोलाँजिस्ट काऊंसिलर –

हा एक विविध मानसिक समस्यांवर,आजारांवर मानसिक रोग आजार,समस्या असलेल्या व्यक्तीस योग्य ते मार्गदर्शन करणारा व्यक्ती असतो.

हा एक मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणारा काऊंसिलर असतो.जो मानसिक आजार तसेच समस्या असलेल्या व्यक्तीची समस्या त्याच्याशी संवाद साधून आधी जाणुन घेतो मग त्याला त्यातुन बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून त्याची मदत करत असतो.

4) चाईल्ड स्पेशलिस्ट काऊंसिलर –

हे काऊंसिलर लहान मुलांच्या समस्यांचे तज्ञ असतात हे आधी लहान मुलांच्या समस्या समजुन घेतात अणि मग त्यांच्याशी बोलुन संवाद साधुन योग्य ते मार्गदर्शन करून त्यांची मदत करत असतात.

5) बिझनेस काऊंसिलर –

हे काऊंसिलर आपणास आपल्या व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम करत असतात.काय केल्यावर आपल्या व्यवसायात अधिक प्रगती होईल आपल्या प्राँफिट इनकम मध्ये वाढ होईल इत्यादी व्यवसाय विषयक बाबींविषयी मार्गदर्शन बिझनेस काऊंसिलर करत असतो.

See also  किती बोलावे,कसे बोलावे अणि कधी बोलावे? बोलण्याची उत्तम कला कौशल्य कसे आत्मसात करावे?Art of speaking,Advanced communication skills

काऊंसिलर काऊंसिलिंग करण्यासाठी काही फी घेत असतात का?

काऊंसिलर हा एक आपल्या विशिष्ट क्षेत्राचे उत्तम ज्ञान असलेला एक तज्ञ प्रोफेशनल व्यक्ती असतो.प्रत्येक क्षेत्रातील काऊंसिलरची एक ठाराविक फी असते जी आपणास त्यांना काऊंसिलिंगच्या बदल्यात पे करावी लागते.