डॉक्सिंग म्हणजे काय? – Doxxing meaning in Marathi

डॉक्सिंग म्हणजे काय? – Doxxing meaning in Marathi


मित्रांनो आज आपण एका अशा टाँपिक विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्या विषयी याआधी आपण कधीच ऐकलेले नाहीये.अणि हा विषय आहे डॉक्सिंग .

डॉक्सिंग हा एक इंटरनेटशी संबंधित इंग्रजी शब्द आहे.आपल्यातील खुप जणांना जे इंटरनेटचा वापर करता त्यांना हा शब्द माहीत सुदधा नसेल कदाचित त्यांनी हा शब्द आज पहील्यांदाच ऐकला असेल पण काळजी नका मित्रांनो

आजच्या लेखात आपण ह्याच इंटरनेटशी संबंधित डाँक्सिन शब्दाचा नेमका काय अर्थ होतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

डॉक्सिंग म्हणजे काय?doxxing meaning in Marathi

आज आपण सर्वच जण सोशल मीडिया मोबाइल इंटरनेटचा वापर करतो.

आपल्यातील खुप जण तर असे असतात जे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांची सर्व वैयक्तिक अशी माहीती सुदधा टाकुन ठेवत असतात जी टाकणे योग्य नाही.

पण जे व्यक्ती इंटरनेट अणि सोशल मीडिया वर आपली सर्व पर्सनल डिटेल शेअर करत असतात जसे की आपले नाव,पत्ता,जन्मतारीख,पत्ता,मोबाईल नंबर इत्यादी अशा व्यक्तींना डाँक्सिंग मुळे खुप तोटा खुप नुकसान होऊ शकते.

डाँक्सिन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यात कुठलाही इंटरनेट युझर तसेच हँकर सोशल मीडिया तसेच इंटरनेट वरून कुठल्याही व्यक्तीची,कंपनीची,संस्थेची वैयक्तिक खाजगी माहीती सर्च करून प्राप्त करत असतो.

अणि मग ती प्राप्त केलेली सर्व पर्सनल माहीती त्या व्यक्तीची म्हणजेच आपली कुठलीही परवानगी न घेता आँनलाईन इंटरनेट वर पब्लिश सुदधा करून देत असतो.

डॉक्सिंग मध्ये हँकर तसेच माहीती चोरणारा व्यक्ती नेमके काय करत असतो?

डॉक्सिंग प्रोसेस मध्ये कुठलाही इंटरनेट युझर तसेच हँकर जो आपली माहीती पर्सनल इनफरमेशन डेटा चोरत असतो तो आपली बेसिक माहीती जसे की आपले नाव,आपला ईमेल आयडी हे इंटरनेट तसेच सोशल मीडिया वरून आधी प्राप्त करत असतो.

See also  पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check

मग ह्या मिळवलेल्या बेसिक माहीतीच्या आधारे हँकर आपल्याविषयी अजुन पर्सनल माहीती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो.उदा,आपले नाव,पत्ता,जन्मतारीख,पत्ता,मोबाईल नंबर बँक खाते क्रमांक,आय एफसी कोड इत्यादी.

कोणती व्यक्ती आपली पर्सनल इनफरमेशन इंटरनेट वर आपली कुठलीही परवानगी न घेता पब्लिश करू शकते?

अशी कुठलीही व्यक्ती जिच्याशी आपले वादविवाद असतील,भांडण झाले असेल,आपल्याशी ज्याची दुश्मनी असेल,जो आपल्यावर जळत असेल ज्याला आपणास ब्लँकमेल तसेच बदनाम करायचे आहे

अशी कुठलीही व्यक्ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून इंटरनेट वरून आपली वैयक्तिक माहीती काढुन आपल्याला त्रास देण्यासाठी,बदनाम करण्यासाठी आपल्याकडुन पैसे लुबाडण्यासाठी आपली पर्सनल डिटेल इंटरनेट वर आपली परवानगी न घेता पब्लिश करू शकते.किंवा असे करण्याची धमकी आपणास देऊ शकते.

डॉक्सिंग पासुन बचावासाठी आपण काय करायला हवे?

● आपली सोशल मीडिया अकाउंट वरील गोपनीय माहीती जसे की फेसबुक इंस्टा वर आपण जे आपला पत्ता,आपले नाव,आपला मोबाइल नंबर टाकत असतो ते कधीही पब्लिकली ठेवू नये त्याची प्रायव्हेसी आपल्याजवळ ठेवावी.

● आपली कुठलीही वैयक्तिक गोपनीय माहीती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर इंटरनेट वर सार्वजनिक रीत्या पब्लिश करू नये कारण याने अनोळखी व्यक्ती सुदधा आपली पर्सनल डिटेल सहज प्राप्त करू शकतो.अणि आपल्याला त्रास देऊ शकतो.कुठल्या ना कुठल्या प्रकारे हानी पोहचवू शकतो.

● कुठल्याही असुरक्षित मोबाइल अँपला वेबसाइट वगैरेला आपली पर्सनल इनफरमेशन अँक्सेस करण्याची परवानगी देऊ नये.किंवा तिथे आपली पर्सनल डिटेल टाकणे टाळावे.