पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check

पीआयबी फॅक्ट चेक काय आहे

आज जागोजागी सरकारच्या नावाखाली फेक न्युज तसेच योजनांच्या अफवा पसरवल्या जात आहेत आत्ताच काही काही दिवसांपूर्वी सोशल मिडिया वर एक मेसेज व्हायरल होत होता.

ज्यात असे दिले होते की केंद्र सरकारच्या म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या वतीने सर्व भारतीय नागरीकांना २८ दिवसांसाठी २३९ रूपयांचा मोफत मध्ये मोबाईल रिचार्ज उपलब्ध करून दिला जात आहे.

अणि मॅसेजच्या खाली मोफत रिचार्ज करण्यासाठी एक लिंक देखील देण्यात आली होती जिथे आपला मोबाईल नंबर टाकुन केंद्र सरकार कडुन मोफत रिचार्ज प्राप्त करा असे सांगितले जात होते.

पण जेव्हा ह्या मॅसेजच्या मागची सत्यता तपासण्यात आली तर असे समोर आले की ही एक खोटी न्युज तसेच अफवा होती.

पीआयबी फॅक्ट चेक काय आहे
पीआयबी फॅक्ट चेक काय आहे

MSSC- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र विषयी सविस्तर माहिती 

काही सायबर चोरटे तसेच हॅकर्स नागरीकांच्या मोबाईल मधील डेटा चोरण्यासाठी त्यांचे बॅक खाते कायमचे रिकामे करण्यासाठी हे खोटे मोफत रिचार्जचे आमिष दाखवत होते.

जेणेकरून लोक ह्या लिंकवर जाऊन क्लिक करतील आपला मोबाईल नंबर इंटर करतील आपल्या मोबाईल मधील डेटा अॅक्सेस करण्याची परमिशन ह्या अॅप तसेच वेबसाईटला देतील मग सायबर चोरटे आपला डाव साधतील.लोकांचे बॅक खाते रिकामे करतील.

आज सोशल मिडिया इंटरनेटवर अशा अनेक फेक न्युज शासनाच्या नावाखाली व्हायरल होताना दिसुन येतात

दैनंदिन जीवनात अशा फेक न्युज तसेच खोटया अफवा मॅसेज पसरवून नागरीकांची फसवणुक दिशाभूल करत असलेल्या स्पॅमर्सला रोखण्यासाठी यावर कायमची बंदी घालण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

सरकारने नुकतीच एक संस्था नेमलेली आहे.जिचे नाव पीआयबी फॅक्ट असे आहे.

काय आहे हे पीआयबी फॅक्ट चेक?

पीआयबी ही एक फॅक्ट चेक करणारी संस्था आहे.

ही संस्था सोशल मिडिया तसेच इंटरनेट वर सरकारी योजनांच्या नावाखाली व्हायरल होत असलेल्या सर्व संदेश तसेच न्युज इत्यादींची तपासणी करण्याचे काम करते.

सोशल मिडिया इंटरनेट वर व्हायरल होत असलेल्या फेक न्युज,तसेच संदेशामागची खरी सत्यता काय आहे यात किती तथ्य आहे हे खरे आहे की खोटे हे तपासण्याचे काम हे पीआयबी फॅक्ट चेक करत असते.

सरकारच्या नावाने खोटया अणि फेक न्युज अफवा ज्या इंटरनेट तसेच सोशल मिडिया वर पसरवल्या जात आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ही संस्था नेमलेली आहे.

पीआयबी फॅक्ट चेक ही संस्था सोशल मिडिया इंटरनेट वर वेबसाईट युटयुब इत्यादी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पसरवल्या जात असलेल्या फेक न्युज वर संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम करेल.

यात सर्वप्रथम सोशल मिडिया वर इंटरनेट वर व्हायरल होत असलेल्या फेक न्युज तसेच मॅसेजची पडताळणी पीआयबी फॅक्ट दवारे केली जाईल.

सदर न्युज,संदेश फेक असल्यास पीआयबी फॅक्ट कडुन हा संदेश ही न्यूज फेक आहे असे आपल्या संकेतस्थळावर फेक न्युज म्हणुन स्टॅम्प लावून सुचित केले जाईल

यानंतर संबंधित प्रसारमाध्यमांना हा मॅसेज न्युज फेक आहे हे सरकारने पीआयबी फॅक्ट दवारे जाहीर करताच डिलीट करावा लागेल

अन्यथा संबंधित व्यक्तीने आपल्या वेबसाईटवरून युटयुब चॅनल वरून ही फेक न्युज बनावट खोटा संदेश डिलीट केला नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

याबाबत फेसबुक टविटर, यांसारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या फेक न्युज संदेशांवर देखील पीआयबी कडुन तपासणी केली जाणार आहे जेणेकरून सोशल मिडिया वर चुकीची अणि खोटी माहिती पसरवली जाऊ नये.

सोशल मिडिया इंटरनेटच्या माध्यमातून जी चुकीची खोटी माहिती पसरवली जात आहे तिला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आयटी अणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी असे सांगितले आहे की सरकारचा यामागचा हेतू खोटया अफवा फेक न्युज संदेश यांना आळा घालणे हा आहे.न्युज चॅनलवर त्यांच्या फ्रीडम वर बंधन लादणे हे नाहीये.