कोविन पोर्टल वरील डेटा टेलिग्रामवर लीक झाल्याचा दावा लाखो लोकांची आधार कार्ड,पॅन कार्ड वोटर आयडी कार्ड डिटेल धोक्यात – Cowin portal data leakage in Marathi

कोविन पोर्टल वरील डेटा टेलिग्रामवर लीक झाल्याचा दावा लाखो लोकांची आधार कार्ड,पॅन कार्ड वोटर आयडी कार्ड डिटेल धोक्यात cowin portal data leakage in Marathi

कोविन पोर्टलवर रेजिस्ट्रेशन केलेल्या नागरीकांची खाजगी गोपनीय माहिती लीक झाली आहे असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

Cowin portal data leakage
Cowin portal data leakage

ह्या अहवालात असे देखील सांगितले गेले आहे की कोविन पोर्टलवर रेजिस्ट्रेशन केलेल्या नागरीकांची आधार,पॅन कार्ड मतदान कार्ड इत्यादी महत्वाची डिटेल टेलिग्रामवर लीक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की मिडिया रिपोर्ट नुसार मल्याळ मनोरमा वृत्तपत्रात असे दिले आहे की कोविड पोर्टलवर लसीकरणासाठी आपले नाव नोंदणी करत असताना जी काही पर्सनल डिटेल लोकांनी ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती ती लीक झाली आहे.

ह्या पर्सनल डिटेल मध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट डिटेल इत्यादी महत्वाच्या माहीतीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

२०२२ दरम्यान असाच एक दावा करण्यात आला होता पण शासनाकडुन त्या दाव्याला फेटाळून लावण्यात आले होते.

शासनाने या विषयी प्रत्युत्तर देत सांगितले आहे की लोकांची कुठलीही वैयक्तिक माहिती डेटा हॅकर्स कडुन हॅक तसेच टेलिग्रामवर लीक झाली नाहीये.

कोविन ह्या पोर्टल वर रेजिस्ट्रेशन करण्यासाठी युझरने इंटर केलेली माहीती सुरक्षित आहे अणि भविष्यात देखील ही माहिती सुरक्षित राहावी यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

कोविन पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करताना इंटर केलेल्या नागरीकांच्या खाजगी गोपनीय माहितीला टेलिग्रामवर तसेच इतर सोशल मिडिया साईटवर लीक करण्यात आले आहे ह्या केल्या जात असलेल्या दाव्याला कुठलाही आधार पुरावा नाहीये.

ही एक निव्वळ अफवा आहे जिच्याकडे लोकांनी लक्ष देऊ नये असे केंद्र सरकारने सांगितले आहे.अणि प्रौढ नागरीकांचे लसीकरण करताना फक्त जन्म वर्षांची माहीती त्यांच्याकडुन घेण्यात आली होती.

अणि टेलिग्राम बाॅटवर जन्मतारीख देखील लीक झाल्याचा दावा केला जातो आहे तसेच कोविन पोर्टलवर कुठल्याही नागरीकाचा पत्ता घेण्यात आला नव्हता तरी टेलिग्राम बाॅटवर तो कोविन पोर्टलवरून लीक झाला असल्याचे दावे केले जात आहे असे केंद्र सरकारचे मत आहे.

See also  भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला बसला मोठा झटका ह्या लाईफ इन्शुरन्स कंपनी सोबत केलेली 2 अरब डाॅलरची डिल झाली रद्द - TCS Transamerica deal

कोविन पोर्टल काय आहे?हे पोर्टल का तयार करण्यात आले होते?

कोविन पोर्टल हे एक शासनाने तयार केलेले अधिकृत संकेतस्थळ आहे हे पोर्टल निर्माण करण्याचा शासनाचा मुख्य हेतु हा कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस अल्पावधीत जास्तीत जास्त लोकांना मिळावे हा होता.

ह्या पोर्टलचे अॅप देखील आहे.हया अॅप अणि पोर्टलच्या माध्यमातुन लाखो लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आपली आॅनलाईन घरबसल्या नावनोंदणी केली होती.

अणि नाव नोंदणी करताना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड इत्यादी महत्वाची माहिती लोकांनी ह्या पोर्टलवर भरली होती.

पण नागरीकांची हीच वैयक्तिक गोपनीय माहिती सार्वजनिक रीत्या टेलिग्राम बाॅटवर लीक केली गेली असल्याचा दावा सोमवारी १२ जुन २०२३ रोजी केला गेला आहे.

खरोखर डेटा लीक झाला आहे का?

  • इंडिया टुडे ह्या इंग्रजी वृतपत्रात असे सांगितले गेले आहे की टेलिग्राम बाॅटवर मोबाईल नंबर दिल्यानंतर आपले नाव,आधार कार्ड नंबर,पासपोर्ट क्रमांक,वोटर आयडी डिटेल डेट आॅफ बर्थ,आपण लस घेतलेले ठिकाण ही सर्व माहिती उपलब्ध होत आहे.
  • अनेक विरोधी पक्षनेत्यांची माहीती देखील यात लीक झाली असल्याचे साकेत गोखले यांनी टविटर वरून सांगितले आहे.
  • ह्यावर प्रतिक्रिया देत हया प्रकरणाची विशेष दखल घेतली जाईल अणि डेटा नेमकी कुठून लीक झाला आहे कोविन पोर्टल वरून की इतर कुठल्या ठिकाणाहून याची देखील चौकशी केली जाणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक माहीती तंत्रज्ञान अधिकारी म्हणाले आहे.