भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला बसला मोठा झटका ह्या लाईफ इन्शुरन्स कंपनी सोबत केलेली 2 अरब डाॅलरची डिल झाली रद्द – TCS Transamerica deal

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला बसला मोठा झटका ह्या लाईफ इन्शुरन्स कंपनी सोबत केलेली 2 अरब डाॅलरची डिल झाली रद्द

जे गुंतवणूक दार आयटी सेक्टर मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करू इच्छित आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

भारत देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून परिचित असलेल्या टीसीएसला एक मोठा झटका बसला आहे.ज्यामुळे आयटी सेक्टर मधील शेअर्स मध्ये मोठी विक्री होताना पाहायला मिळु शकते.

TCS Transamerica deal
TCS Transamerica deal

भारतातील दिग्दज आयटी कंपनी टीसी एस अणि अमेरिका ह्या देशातील एक विमा कंपनी ट्रान्स अमेरिका यांच्यामध्ये झाला असलेला दोन बिलियन डॉलर्सचा आऊटसोर्सिंग करार आता संपला आहे.

टीसीएस अणि अमेरिकन विमा कंपनी ट्रान्स अमेरिका यांच्यामध्ये 2018 मध्ये हा करार करण्यात आला होता.हा करार 10 वर्षाच्या कालावधीकरीता करण्यात आला होता.

पण आर्थिक परिस्थिती आणि व्यावसायिक प्राधान्यक्रम लक्षात घेऊन हा दहा वर्षांचा प्रकल्प करार अवघ्या साडेपाच वर्षांत संपविण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

टीसीएस अणि अमेरिकन विमा कंपनी ट्रान्स अमेरिकाने एक संयुक्त निवेदन जारी करून आपल्यातील हा करार संपला असल्याची घोषणा केली आहे.

असे सांगितले जाते आहे की दोघे कंपनी अद्यापी नवीन सर्विसिंग माॅडल मध्ये काम सुरळीतपणे करता येण्यासाठी अजुन 30 महिने एकत्रितपणे काम करणार आहे.

ही बातमी समोर येताच निफ्टी आयटी इंडेक्स मधील सात शेअर्स लाल निशाणीवर ट्रेंड करताना दिसुन येत आहे.

ज्यात कोफोर्ज,टेक महिंद्रा,एचसीएल टेक,टीसीएस,विप्रो पर्सिस्टंट इत्यादी आय टी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये कमजोरी कमकुवतपणा पाहावयास मिळत आहे.

टीसीएस कंपनीचे शेअर्स आज दुपारपर्यंत 1.49 टक्के इतके घसरताना दिसुन आले आहे.हया शेअर्सचा 52 आठवड्यातील उच्चांक 3575 आहे अणि निच्चांक 2926.10 रूपये इतका आहे.

अशी बातमी समोर येत आहे की टीसीएस कंपनीची दोन बिलियन डॉलर्सचा करार संपुष्टात आल्याने टीसीएस कंपनीला दोन बिलियन डॉलर इतके नुकसान सहन करावे लागले आहे.

See also  जिओने लाॅच केले ८४ दिवसांच्या वैधतेचे २ नवीन रिचार्ज प्लॅन Jio 84 days new recharge plan in Marathi

टीसीएस कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की सध्याचे मायक्रो वातावरण अणि संबंधित व्यावसायिक प्राधान्यक्रम लक्षात घेता टीसीएस कंपनी अणि ट्रान्स अमेरिका ह्या कर्मचारी लाभ,जीवन विमा, वार्षिकी पुरक आरोग्य विमा उत्पादनांसाठी प्रशासकीय व्यवस्था संपुष्टात आणण्यास परस्पर सहमती दर्शवली आहे.

तज्ञांकडून असे सांगितले जाते आहे की अमेरिका येथील मायक्रो वातावरणातील आयटी क्षेत्रात ज्या पद्धतीने कमी खर्च केला जातो आहे त्यामुळे भारतातील आयटी कंपनीच्या रेव्हेन्यू अणि व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

अणि येणारया काळात आयटी कंपन्या आपल्या किंमतीमध्ये घट देखील करू शकतात.

भारतातील आयटी क्षेत्राला जास्तीत जास्त रेव्हेन्यू हा अमेरीका अणि युरोप मधुन येतो.पण अमेरिकेने आयटी क्षेत्रातील करारात घट केल्याने आयटी क्षेत्रातील येणारया रेव्हेन्यू वर प्रभाव पडु शकतो.