क्रिएटिनिन ब्लड टेस्ट विषयी माहीती – Creatinine blood test information in Marathi

क्रिएटिनिन  ब्लड टेस्ट विषयी माहीती -Creatinine blood test information in Marathi

Table of Contents

क्रिएटिनिन म्हणजे काय?Creatinine meaning in Marathi

आपल्या शरीरातील निर्माण होणारया अतिरीक्त घटकांमुळे आपल्या शारीरीक आरोग्यास हानी पोहचत असते.एवढेच नव्हे तर आपणास अनेक शारीरिक विकार अडचणींना सामोरे जावे लागते.

क्रिएटिन सुदधा हा एक असाच घटक तसेच एक रासायनिक कचरा आहे ज्याची निर्मिती आपल्या मानवी शरीरामधल्या स्नायुंच्या क्रियेमधुन होत असते.

हा मानवी शरीरामध्ये तयार झालेला क्रिएटिनीन रक्तप्रवाहातुन वाहत असतो.त्याला स्वच्छ करत असते आपली किडनी.

किडनीमधुन फिल्टर झाल्यानंतर आपल्या शरीरात जे काही बाकी राहत असते ते आपल्या शरीरातुन लघवीच्या वाटेने म्हणजेच मुत्रमार्गाने बाहेर पडत असते.

शरीरातील क्रिएटिनिनचे प्रमाण वाढणे हे कशाशी संबंधित आहे?

आपल्या शरीरातील क्रिएटीनचे प्रमाण वाढणे हे आपल्या किडनीशी संबंधित आहे.

शरीरातील क्रिएटिनीनची पातळी अधिक वाढल्यावर काय होत असते?

जेव्हा आपल्या शरीरातील क्रिएटिनची पातळी धोकादायक मार्गाने अत्यंत जास्त प्रमाणात वाढत असते.तेव्हा आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक अडचणी समस्या उदभवू शकतात.

शरीरातील क्रिएटीनची पातळी अधिक वाढल्यास आपली किडनी काळी पडु शकते.

क्रिएटीनचे प्रमाण वाढल्यामुळे आपली किडनी नीट काम करत नही.किडनी निकामी सुदधा होत असते.किडनीशी संबंधित वेगवेगळे भयंकर आजार आपणास जडु शकतात.

See also  Education Loan विषयी संपूर्ण माहीती , प्रकार , कागदपत्रे - Education Loan detail information in Marathi  

शरीरातील क्रिएटिनिनची पातळी कमी जास्त होणे कशाचा संकेत मानले जाते?

आपल्या शरीरातील क्रिएटिनीनची पातळी कमी किंवा जास्त होणे हा किडनीच्या गंभीर आजाराचा संकेत मानले जाते.

शरीरातील क्रिएटिनिनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करते?

आपल्या शरीरातील क्रिएटीनीनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपली किडनी करत असते.

आपली किडनी ही शरीरातील क्रिएटीनीनला फिल्टर करत असते.अणि त्यांचे संतुलन निर्माण करून अतिरीक्त किएटीनीनला मुत्रमार्गाने शरीराच्या बाहेर फेकण्याचे काम देखील करते.

शरीरातील क्रिएटिनिनची पातळी कशावर अवलंबुन असते?

आपल्या शरीरातील क्रिएटीनीनची पातळी आपले वय,लिंग अणि आपली शरीरयष्टी या तीन गोष्टींवर अवलंबुन असते.

पुरूषांच्या शरीरामध्ये क्रिएटिनिन चे प्रमाण किती असणे गरजेचे आहे?

पुरूषांच्या शरीरामध्ये क्रिएटीनीनचे प्रमाण 0.6 ते 1.2 एमजी/डीएल इतके असणे गरजेचे आहे.

महिलांच्या शरीरामध्ये क्रिएटिनिनचे प्रमाण किती असणे गरजेचे आहे?

महिलांच्या शरीरामध्ये क्रिएटीनीनचे प्रमाण 0.5 ते 1.1एमजी/डीएल इतके असणे गरजेचे आहे.

तरूणांच्या शरीरामध्ये क्रिएटिनिनचे प्रमाण किती असणे गरजेचे आहे?

तरूणांच्या शरीरामध्ये क्रिएटीनीनचे प्रमाण 0.5 ते 1.0एमजी/डीएल इतके असणे गरजेचे आहे.

लहान मुलांच्या शरीरामध्ये क्रिएटिनिनचे प्रमाण किती असणे गरजेचे आहे?

लहान मुलांच्या शरीरामध्ये क्रिएटीनीनचे प्रमाण 0.3 ते 0.7 एमजी/डीएल असणे गरजेचे आहे.

कोणता आजार असलेल्या व्यक्तींनी आपली क्रिएटिनिन  लेव्हल टेस्ट करायला हवी?

खालील आजार असलेल्या व्यक्तींनी आपल्या शरीरातील क्रिएटीनीन पातळीची तपासणी करायला हवी-

● ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे.

● ज्यांना मधुमेह आहे.

● ज्यांची शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी आहे असे व्यक्ती

● ज्यांना किडनीचा आजार आहे.

इत्यादी.

आपल्या शरीरामधील क्रिएटीनीनची पातळी संतुलित राखण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो?

● ज्यांच्या शरीरात क्रिएटीनीनची पातळी वाढली आहे त्यांनी प्रथिनांचे सेवण कमी करायला हवे.

● फायबरचे सेवण करणे वाढवायला हवे.याने आपल्या शरीरातील क्रिएटीनीन कंट्रोल मध्ये राहते.

● नेहमी हायड्रेट राहायला हवे.म्हणजेच शक्य तितके अधिक पाण्याचे सेवण करायला हवे.

See also  हिमोग्लोबिन शरीरातील महत्व - Hemoglobin Importance Marathi Information

● मद्यसेवन करणे विडी सिगारेट ओढणे टाळायला हवे.

● आहारातील मीठाचे प्रमाण कमी करायला हवे.

हे घरगुती उपाय करूनही आपल्या शरीरातील क्रिएटीनीनची पातळी संतुलित नही राहीली तर आपण एकदा तरी तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.

क्रिएटिनिन  ब्लड टेस्ट म्हणजे काय?क्रिएटिनिनचे ब्लड टेस्ट का केली जाते?

क्रिएटीन ब्लड टेस्ट आपल्या शरीरातील क्रिएटीनीनचे प्रमाण,पातळी जाणुन घेण्यासाठी तसेच त्याची मोजणी करण्यासाठी केली जात असते.आपली किडनी व्यवस्थित कार्य करते आहे की नाही हे जाणुन घेण्यासाठी ही टेस्ट केली जात असते.

आपल्या शरीरातील क्रिएटीनीनची पातळी युरिन टेस्टदवारे देखील मोजली जात असते.

क्रिएटिनीन ब्लड टेस्ट कशी घेतली जाते?

क्रिएटीन टेस्ट मध्ये आपले ब्लड सँपल घेतले जात असते.

क्रिएटिनिन  ब्लड टेस्टसाठी आपणास काय पुर्वतयारी करावी लागते?

● क्रिएटीन ब्लड टेस्ट करण्याअगोदर हेल्थ केअर प्रोव्हाईडर आपल्याला काही औषध घेणे बंद करायला सांगत असतात.
उदा, सिमेटिडाइन, फॅमोटीडाइन आणि रॅनिटिडाइन इत्यादी

● आपण याआधी कुठली औषधे घेत होतो हे आपल्या हेल्थ केअर प्रोव्हाईडरला टेस्टच्या अगोदर सविस्तर सांगावे लागते.

क्रिएटीन ब्लड टेस्ट देताना आपणास कसे जाणवते?

क्रिएटीन ब्लड टेस्ट करताना जेव्हा रक्ताचे सँपल घेण्यासाठी आपल्याला इंजेक्शन दिले जाते तेव्हा आपल्याला थोडी मध्यम प्रमाणात इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना जखम होऊ शकते.ती जागा थोडी निळी पडु शकते.

तर कधी कधी डंख मारल्यासारखी संवेदना जाणवू शकते.

कोणामध्ये आपणास क्रिएटीनीनची पातळी सर्वाधिक प्रमाणात दिसुन येते?

पुरुषांमध्ये क्रिएटीनीनची पातळी सर्वाधिक प्रमाणात असते कारण पुरूषांमध्ये महिलांपेक्षा अधिक स्नायुंचे प्रमाण असते.

क्रिएटिनिन  ब्लड टेस्ट मधील काही जोखिम –

क्रिएटीनीन ब्लड टेस्ट दरम्यान जास्त रक्तस्राव होणे,चक्कर येणे बेहोश होणे,त्वचेच्या खाली रक्त गोठणे हे रक्त काढण्याशी संबंधित काही किरकोळ जोखिम उदभवू शकतात.

Leave a Comment