चालु घडामोडी मराठी 10 मे २०२३- Current Affairs in Marathi

 • १० मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी
 • आशियाई वेटलिफटिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारतीय वेटलिफटर भवानी देवीने रौप्य पदक जिंकले आहे.महिलांच्या ५५ किलो गटात त्यांनी हे रौप्य पदक जिंकले आहे.ही आशियाई वेटलिफटिंग चॅम्पियनशिप दक्षिण कोरिया मध्ये झाली आहे.
 • बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान हा देश सुमारे हजार भारतीय इंजिनिअर्सला प्रशिक्षण देणार आहे.
 • राजस्थान ह्या राज्यामध्ये दुसरा लिथिअमचा साठा सापडला आहे.जिओ लाॅजिकल सर्वे आॅफ इंडिया भारतीय भुगर्भीय सर्वेक्षण मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला आहे.याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये जम्मु काश्मीर मध्ये ५.९ दशलक्ष टन इतका लिथिअमचा साठा सापडला होता.
 • चार्ल्स थ्री हा नुकताच ब्रिटनचा नवा सम्राट बनला आहे.येथील पंतप्रधान रिशी सुनक आहेत.
 • स्पॅनिश टेनिसपटटु कारलोज अलकाराझ ह्या खेळाडुने माद्रिद ओपन २०२३ जिंकली आहे.
 • नासाच्या शास्त्रज्ञांनी सिम्युलेटेड चंद्राच्या मातीतुन आॅक्सिजन हे मुलद्रव्ये काढले आहे.
 • नासाचा फुलफाॅम national aeronautics and space administration असा होतो.नासाची स्थापणा ही २९ जुलै १९५८ रोजी करण्यात आली होती.नासाचे मुख्यालय वाॅशिंगटन डिसी इथे आहे.नासाचे अध्यक्ष बील नेल्सन हे आहेत.
 • मॅक्स वरसतापेनने मियामी फाॅम्युला वन ग्रॅड प्रिक्स २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.२०२३ मध्ये आतापर्यंत पाच ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत.
 • ज्यात तीन ग्रँड प्रिक्स फक्त मॅक्स वरसतापेनने जिंकल्या आहेत.बहरीन ग्रँड प्रिक्स २०२३, आॅस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स २०२३,मियामी फाॅम्युला वन ग्रॅड प्रिक्स २०२३ असे तिन्ही स्पर्धाचे नाव आहे.
 • अणि उरलेल्या दोन स्पर्धा सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स २०२३, अझरबैजान ग्रँड प्रिक्स २०२३ सरजिओ पिराजने जिंकल्या आहेत.
 • ईशान्य दिशेतील मणिपुर येथे अनुसूचित जमाती वादामुळे मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या आहेत.
 • आयसीसी पुरूषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारत देशाचा तिसरा क्रमांक लागतो.
 • केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील प्रथम वायुसेना हेरिटेज केंद्राचे उद्घाटन चंदीगढ येथे केले आहे.
 • देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र उत्तर प्रदेश मध्ये उभारण्यात आले आहे.
 • आय एन एस मगार हे भारतीय नौदलाचे जहाज ३६ वर्षांची विशिष्ट सेवा पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आले आहे.
 • पाकिस्तान ह्या देशाचा बाबर आझम हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात वेगवान पाच हजार धावा करणारा खेळाडु ठरला आहे.
See also  जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day