धनिष्ठा नक्षत्राविषयी माहीती | DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI

धनिष्ठा नक्षत्राविषयी माहीती | DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI

धनिष्ठा हे एक राक्षसगणिक नक्षत्र आहे म्हणून याला अशुभ नक्षत्र मानले जाते.म्हणुन नैमित्तिक कामाशिवाय विवाह वगैरे सारख्या कुठल्याही शुभ कामाला हे नक्षत्र अनुकुल मानले जात नाही.

याचे दोन चरण मकर राशीत अणि बाकीचे दोन चरण कुंभ राशीत येत असतात.

धनिष्ठा नक्षत्रावर शनी ग्रहाचा विशेष प्रभाव असतो.याचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे.हया नक्षत्राचे बोधचिन्ह मृदुंग,ढोल आहे.ह्या नक्षत्राचे नामाक्षर गा,गी,गु,गे या अक्षरावरून येत असते.

धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर संगीत क्षेत्रातील निगडीत कला क्षेत्राचा विशेष प्रभाव असतो.धनिष्ठा नक्षत्रातील व्यक्तींना कला कौशल्य क्षेत्रात विशेष आवड असते.

धनिष्ठा नक्षत्राची देवता अष्टवसु ही आहे.अष्टवसु ही प्रतिष्ठा सौभाग्य धनधान्य समृद्धी मान सन्मान यांची कारक देवता मानली जाते.अपह,ध्रूव,धारा,अनिल,सोम,अनल,प्रत्युक्षा, प्रवाह या एकुण आठ वसु असतात ज्यांना देवाप्रमाणे शुभकारक देवता म्हणून ओळखले जाते.

अणि ह्याच सर्व गोष्टींचा प्रभाव ह्या धनिष्ठा नक्षत्रातील जन्मलेल्या व्यक्तींवर असतो.म्हणुन हे दृढ विचारी आणि उर्जावान असतात.

यांच्या वर मंगळाचा प्रभाव असल्याने साहस नेतृत्व गुण तसेच गतीशीलता यांच्या स्वभावामध्ये असते.मंगळाचा प्रभाव यांच्यावर असल्याने रागीटपणा अभिमानी नेतृत्व कुशलता स्वता जे बोलतो तेच खरे अशा वृत्तीचे हे व्यक्ती असतात.

धनिष्ठा नक्षत्राचा अर्थ धनवान असा होतो म्हणून ह्या नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती धनवान असलेले आपणास पाहावयास मिळते.

जागतिक लठ्ठपणा दिवस २०२३ : या सवयी तुमचे जीवन बदलू शकतात!

शनिची व्यवहार कुशलता अणि मंगळाची उर्जा यांच्या अंगात असल्याने हे व्यक्ती सतत आपल्या कार्यात मग्न राहत असतात.

यांची स्वभाव वृत्ती कष्टाळु असल्याने यांना कुठल्याही कामात यश मिळताना दिसते.यांना उद्योग व्यवसाय करण्याची देखील आवड असते.

धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे मुख्य संगीत कला हे आहे यात त्यांना विशेष रूची असते अणि यात त्यांना गती यश अणि प्रगती देखील प्राप्त होताना दिसुन येते.

यामुळे धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती गायक,कलाकार,नाटककार संगीतकार होण्याची अधिक शक्यता असते.

बॅकिंग क्षेत्रात देखील यांना चांगला वाव असतो यात ते अकाऊंटंट फायनान्शिअल अॅडवाईझर अशा विविध पदांवर काम करू शकतात.

याचसोबत वाहनाशी संबंधित मॅकेनिक,कंप्युटर इलेक्ट्रीकल इलेकट्रीसिटी ह्या क्षेत्रात देखील यांना चांगले यश प्राप्त होताना दिसते.

पेट्रोलियम पदार्थ लोखंड विद्युत पदार्थांशी निगडीत कार्यक्षेत्रात यांना विशेष आवड असते.आधुनिक विज्ञानात देखील यांना चांगली रूची असते.

पोलिस मिलिटरी इत्यादी अशा संरक्षण विभागात कार्य करण्यात देखील यांना चांगले यश मिळते.क्रिडा क्षेत्रात देखील यांना चांगले यश मिळु शकते.

अध्यात्मिक गुरू,शल्य चिकित्सक,समुपदेशक,ज्योतिष, वास्तु सल्लागार तसेच अघोरी विद्येचे जाणकार म्हणुन देखील यांना चांगले ख्याती किर्ती प्राप्त होऊ शकते.यांचे हास्य एकदम मोहक स्वरुपाचे असते.

DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI