बेकिंग पावडर अणि बेकिंग सोडा या दोघांमधील फरक Difference between baking powder and baking soda in Marathi
आपण जेव्हाही काही पदार्थ बनवत असतो तेव्हा आपण बेकिंग सोडा अणि बेकिंग पावडरचा वापर नक्कीच करत असतो.
पण कोणता पदार्थ बनवायला बेकिंग पावडर वापरावी अणि कोणता पदार्थ बनवताना बेकींग सोडा वापरावा हे आपणास माहीत नसल्याने आपला फार गोंधळ उडत असतो.
कारण आपल्याला हे दोघेही वेगवेगळे घटक आहे हेच माहीत नसते.अणि यांच्यात काय फरक असतो हे देखील आपणास माहीत नसते.
म्हणुन आजच्या लेखात आपण बेकिंग पावडर अणि बेकींग सोडा या दोघांमधील फरक समजुन घेणार आहोत.
जेणेकरून कोणता पदार्थ बनवायला बेकींग सोडा वापरायचा अणि कोणता पदार्थ बनवायला बेकींग पावडरचा वापर करायचा याबाबत आपल्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही.
बेकिंग सोडा म्हणजे काय?
बेकिंग सोडाला सोडिअम बायकार्बोनेट असे देखील म्हटले जाते.याला आपण साध्या आणि सोप्या भाषेत खाण्याचा सोडा असे म्हणत असतो.जो किचनमध्ये स्वयंपाक करताना वापरला जातो.बेकिंग सोडा हा चवीने आंबट असतो.बेकिंग सोडयाचा कलर व्हाइट असतो.
ढोकळा,इडली,समोसा भजे बनवताना आपण बेकिंग सोडा वापरत असतो.हा खाण्याचा सोडा कोणत्याही किराणा दुकानात सुटटा विकत मिळत असतो.
बेकिंग सोडा हा दिसायला दाणेदार प्रकारचा असतो.हा बोटांवर ठेवला तरी देखील अजिबात चिटकत नसतो.
बेकिंग सोडा हा अल्काईन स्वरूपाचा असतो अणि हा सोडा अँसिटिक म्हणजेच आंबट पदार्थासोबत रिअँक्ट करत असतो.
लिंबाचा रस,ताक,दही,व्हिनेगार यासारखे पदार्थ जर आपण वापरत असु तर बेकिंग सोडा यावर रिअँक्ट करतो अणि त्यातुन कार्बन डायाँक्साईड हा वायु बाहेर पडत असतो.ज्याने पीठ तसेच बेकिंगचा गोळा फुगुन जात असतो.
बेकिंग पावडर म्हणजे काय?
बेकिंग पावडर ही आपणास बंद पँकेटमध्ये मिळत असते.ही दिसायला बेकिंग सोडा सारखीच व्हाईट कलरची असते.
बेकिंग पावडर ही बेकरी प्रोडक्ट म्हणजे केक ब्रेड इत्यादी तयार करायला केला जात असतो.बेकिंग पावडर ही बोटांवर ठेवली की हाताला चिटकत असते.
बेकिंग पावडरमध्ये बेकिंग सोडा असतो अणि यात काही अँसिटिक घटक पदार्थ देखील असतात.यामुळ पदार्थ वेगळा अणि सुका व्हायला मदत होत असते.
सध्या बाजारात जी बेकिंग पावडर विकली जात आहे ती दुपट्टीने काम करते.प्रथमत जेव्हा आपण त्यात पाणी मिसळत असतो.तेव्हा अणि दुसरयांदा तो पदार्थ जेव्हा आपण गँसवर ठेवतो अशा दोन वेळेस.
बेकिंग सोडा ऐवजी बेकिंग पावडर वापरणे कितपत योग्य आहे?
बेकिंग सोडा व्यतीरीक्त आपण बेकिंग पावडर सुदधा वापरू शकतो.फक्त इथे प्रमाणात कमी जास्तपणा होऊ शकतो.
म्हणजे बेकिंग सोडा वापरताना कमी वापरायला हवा.अणि त्यात अँसिटिक म्हणजेच आंबट घटकांचा वापर करून पदार्थ फुगवायला हवे.
जर आपण बेकिंग सोडा ऐवजी बेकींग पावडरचा वापर पदार्थ बनवताना केला तर बेकिंग पावडर ही आपल्याला बेकिंग सोडयाच्या तिप्पट वापरावी लागते.
म्हणजे समजा एखादा पदार्थ बनवताना आपणास एक चमचा बेकिंग सोडा वापरणे आवश्यक आहे.पण आपल्याकडे बेकिंग सोडा नाहीये अशा वेळी आपण बेकिंग पावडरचा वापर करू शकतो पण ती आपणास बेकिंग सोडयाच्या तिप्पट प्रमाणात वापरावी लागते.
पदार्थात एक टेबल स्पुन बेकिंग पावडर जर आपण बेकींग सोडयासोबत रिप्लेस केली तर तिचा आपण फक्त एक टिस्पुन इतकाच वापर करायला हवा.सोबत त्यात दोन टिस्पुन लिंबाचा रस मिसळायला हवा किंवा आवश्यकतेनुसार आपण इतर अँसिटिक आंबट पदार्थ त्यात मिसळले तरी देखील चालत असते.
बेकिंग सोडा अणि बेकिंग पावडर यादोघांचा आहारात समावेश करायचा की नाही?
बेकिंग सोडा अणि बेकिंग पावडर यांचा आहारात वापर करण्यापेक्षा आपण नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला हवा.
म्हणजे बेकिंग सोडा अणि बेकींग पावडर या दोघांचा वापर करून पीठ न आंबवता नैसर्गिकरीत्या ते आंबवण्याचा प्रयत्न करायला हवा.
म्हणजेच जेव्हा आपण इडली बनवू तेव्हा उडीद दाळ हे रात्रभर भिजत घालायला हवे.पदार्थ हे शिजवताना अणि बनवताना भारतीय अणि प्राचीन पदधतीचाच वापर करायला हवा.
जेव्हा आपण केक अणि चा़ँकलेट असे गोड पदार्थ बनवतो तेव्हा त्यात आपण क्रिम अणि बटर मिक्स करायला हवे.याने हे पदार्थ हलके होत असतात.
बाहेर असे पदार्थ खाताना रोजपेक्षा थोडे कमी खाणे कधीही चांगले ठरते.याने आपणास त्रास देखील होत नसतो.