रिक्रूटमेंट अणि सिलेक्शन मधील फरक – Difference between recruitment and selection in Marathi

रिक्रूटमेंट अणि सिलेक्शन मधील फरक – Difference between recruitment and selection in Marathi

मित्रांनो रिक्रूटमेंट अणि सिलेक्शन हे दोन शब्द आपण नेहमी वर्तमान पत्रात,जाँब विषयी अपडेट देणारया न्युज चँनलमध्ये आँनलाईन पोर्टलमध्ये रोज बघत तसेच वाचत असतो.

जेव्हा आपण हे दोन शब्द वाचत असतो तेव्हा आपल्यातील खुप जणांना असे वाटत असते की रिक्रुटमेंट अणि सिलेक्शन हे दोघेही शब्दांचा एकच अर्थ होतो.पण तसे नाहीये.

आजच्या लेखात आपण या दोघांमधील फरक काय असतो हेच जाणुन घेणार आहोत.

Recruitment -भरती

● रिक्रुटमेंट ही एक नोकर भरतीची प्रक्रिया आहे.ज्यात विविध कंपनींमध्ये वेगवेगळया पदाकरीता पात्र अणि योग्य उमेदवारांची भरती केली जाते.

● रिक्रूटमेंटमध्ये जाँब पोस्टसाठी पात्र ठरत असलेल्या अशा काही योग्य उमेदवारांना जाहीरातीच्या माध्यमातुन शोधले जाते.मग ते उमेदवार नोकरीची जाहीरात वाचुन आपापल्या शैक्षणिक पात्रता नुसार विविध जाँब पोस्टसाठी अँप्लाय करत असतात.

● कुठल्याही पदासाठी निघालेल्या भरतीची एक लास्ट डेट अंतिम तारीख असते ज्यानंतर उमेदवाराला भरतीसाठी आपला अर्ज भरता येत नसतो.अणि ह्या लास्ट डेटच्या आत जेवढे उमेदवार आपापले नोकरीसाठी फाँर्म भरत असतात त्यांचा अर्ज स्वीकारला जात असतो.म्हणजेच त्यांची जाँब पोस्टसाठी रिक्रूटमेंट होते त्यांचे लगेच सिलेक्शन होत नसते.कारण यानंतर त्यांचा एक इंटरव्यू घेतला जातो तोंडी लेखी शारीरीक चाचणी इत्यादी परीक्षा होते मग यात पास झाल्यानंतर त्यांचे सिलेक्शन करून अपाँईटमेंट तसेच जाँईनिंग लेटर त्यांना शेवटी आँफर केले जात असते.

● रिक्रूटमेंटमध्ये त्या सर्व उमेदवारांचा समावेश होतो ज्यांनी जाँब पोस्टसाठी आँनलाईन आँफलाईन पदधतीने अर्ज केला आहे.

● रिक्रूटमेंट प्रक्रियेत विशिष्ट जाँब पोस्टसाठी नवीन उमेदवारांची भरती करत असलेल्या कंपनी एजंसी अणि जाँबसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांमध्ये संपर्क साधला जात असतो.

See also  कोडिंग म्हणजे काय - Career Opportunities ? Coding Information Marathi

● रीक्रुटमेंटमध्ये सदर जाँब पोस्टसाठी शैक्षणिक दृष्टया पात्र आहेत अशा लाखो उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येतो.

● रिक्रूटमेंट ही एक सोपी प्रक्रिया असते कारण यात कंपनीला फक्त जाँब पोस्टसाठी इच्छित उमेदवारांचे अर्ज स्वीकारायचे असतात.

● रिक्रूटमेंट मध्ये उमेदवाराला फक्त नोकरीसाठी जाँब पोस्टसाठी अर्ज करायचा असतो.

● रिक्रूटमेंट प्रक्रियेस जास्त वेळ लागत नाही.

Selection – निवड

● सिलेक्शन ही एक निवड प्रक्रिया आहे.यात जेवढया उमेदवारांनी जाँबसाठी नोकरीसाठी अर्ज केला आहे इंटरव्यू अणि परीक्षा दिल्या आहे त्यांच्यातील काही जाँब पोस्टसाठी योग्य असलेल्या मोजक्याच सक्षम अणि पात्र उमेदवारांची यात निवड केली जात असते.

● जेव्हा जाँब पोस्टसाठी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद होत असते त्यानंतर जेवढयाही उमेदवारांचे भरतीसाठी अर्ज आले आहे त्यांच्यामधील काही निवडक योग्य अणि पात्र उमेदवारांच्या निवडप्रक्रियेला सुरूवात होत असते.

● यासाठी उमेदवाराची परीक्षा रिटर्न टेस्ट फिजीकल टेस्ट ओरल टेस्ट घेतली जाते.तसेच काही ठिकाणी उमेदवारांचा इंटरव्यू देखील घेतला जातो.मग शेवटी इंटरव्यू लेखी तोंडी फिजीकल परीक्षेत पास झाल्यानंतर उमेदवाराचे सिलेक्शन केले जात असते.अणि त्याला जाँईनिंग लेटर पाठविले जाते.

● सिलेक्शनमध्ये लाखो उमेदवारांमधील फक्त काही अशाच मोजक्या अणि निवडक हजार पाचशे योग्य पात्र उमेदवारांचा समावेश होत असतो ज्यांची जाँब पोस्टसाठी निवड करण्यात आली आहे.

● सिलेक्शन मध्ये सदर जाँब पोस्टसाठी अँप्लाय केलेल्या त्यासाठी शैक्षणिक दृष्टया पात्र आहेत अशा लाखो उमेदवारांपैकी काही मोजक्याच उमेदवारांची निवड केली जाते अणि बाकीच्या उमेदवारांना रिजेक्ट केले जात असते.

● सिलेक्शन ही एक थोडी अवघड प्रक्रिया असते कारण यात कंपनीला फक्त जाँब पोस्टसाठी इच्छित उमेदवारांचे फक्त अर्ज स्वीकारायचे नसतात.तर त्या अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांचे अर्ज बघणे त्यांची शैक्षणिक पात्रता चेक करणे,त्यांची परीक्षा घेणे,इंटरव्यू घेणे अणि मग त्या सर्वामधील काही मोजक्या अतिशय सक्षम,पात्र योग्य अशाच उमेदवारांची निवड करणे हे यात समाविष्ट असते.

See also  एम बी बी एस फुलफाँर्म - MBBS full form in Marathi

● सिलेक्शन मध्ये उमेदवाराला फक्त नोकरीसाठी जाँब पोस्टसाठी अर्ज करायचा नसतो.तर त्या जाँब पोस्टसाठी हजारो लाखो उमेदवारांमधुन सिलेक्ट देखील व्हायचे असते.ज्यासाठी उमेदवारास इंटरव्यू मध्ये सर्व लेखी तोंडी शारीरीक चाचणी इत्यादी परीक्षेमध्ये पास व्हावा लागते.म्हणुन सिलेक्शन हे रिक्रूटमेंटपेक्षा थोडे अवघड असते.

● सिलेक्शन प्रक्रियेत रिक्रुटमेंटपेक्षा अधिक जास्त वेळ लागत असतो.कारण यात सर्व उमेदवारांचा इंटरव्यू परीक्षा घेणे डाँक्युमेंट चेक करणे हे होत असते.

रिक्रूटमेंट ही सर्वप्रथम म्हणजे पहिले केली जाणारी प्रक्रिया आहे अणि सिलेक्शन ही रिक्रुटमेंट नंतरची पार पडणारी प्रक्रिया आहे.