सेट आणि नेट परीक्षेमधील फरक – Difference between set and net exam in Marathi

सेट आणि नेट परीक्षेमधील फरक- Difference between set and net exam in Marathi

नेट अणि सेट परीक्षा मधील साम्य –

● नेट अणि सेट या दोन्ही परीक्षा आपण सहायक प्राध्यापक बनण्यासाठी देत असतो अणि सहायक प्राध्यापक होण्यासाठी यात प्राध्यापक होऊ इच्छित उमेदवाराला उत्तीर्ण होणे काँलिफाय होणे गरजेचे असते.

● सेट आणि नेट या दोघे परीक्षा देण्यासाठी आपण पदव्युतर पदवी म्हणजे पोस्ट ग्रँज्युएशन पुर्ण करणे त्यात 55 टक्के मिळवून पास होणे गरजेचे असते.नाहीतर आपणास सेट तसेच नेट या दोघे परीक्षांसाठी बसता येत नसते.पण जर आपण राखीव गटात असाल अपंग आहे तर 50 टक्के मिळवणे आपणासाठी आवश्यक आहे.

● सेट आणि नेट दोघांमध्ये एकुण दोन पेपर घेतले जात असतात.

● सेट आणि नेट दोघांच्या पेपर 1 अणि पेपर 2 मधील सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक असते.

● सेट आणि नेट दोघे परीक्षा देण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते.

सेट आणि नेट परीक्षेमधील फरक –

● सेट परीक्षेचा फुलफाँर्म state eligibility test असा होत असतो.ज्याला मराठीत राज्य पात्रता चाचणी असे म्हटले जाते.

नेट परीक्षेचा फुलफाँर्म national eligibility test असा होत असतो.याला मराठीत राष्टीय पात्रता चाचणी असे म्हणतात.

● सेट परीक्षा पास झाल्यानंतर यात काँलिफाय केल्यावर आपण महाराष्ट्रातील कोणत्याही एका विद्यापीठात म्हणजेच ज्या राज्यात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे तिथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागू शकतो.

नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर यात काँलिफाय झाल्यानंतर आपण भारतातील कुठल्याही विद्यापीठात म्हणजेच कुठल्याही राज्यात सहायक प्राध्यापक म्हणुन नोकरीला लागु शकतो.

● सेट परीक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित केली जाते ही परीक्षा महाराष्ट अणि गोवा या दोन राज्यांसाठी आयोजित केली जात असते.ही परीक्षा 1993 पासुन घेतली जाऊ लागली.

● नेट परीक्षा ही केंद्रीय स्तरावर एनटीए national testing agency मार्फत आयोजित केली जाते.जेव्हा पासुन नेट परीक्षा आँनलाईन घेणे सुरू झाले तेव्हापासुन ही परीक्षा एनटीए मार्फत घेतली जाते.याआधी ही परीक्षा यूजीसी तसेच सीबीएसई मार्फत आयोजित केली जात होती.

See also  ओपीडीचा फुल फाँर्म काय होतो? OPD Full Form In Marathi

● सेट परीक्षा राज्य पातळीवर आयोजित केली जाते

नेट परीक्षा ही राष्टीय पातळीवर आयोजित केली जात असते.

● सेट परीक्षा ही इंग्रजी अणि मराठी अशा दोन भाषेच्या माध्यमातुन घेतली जाते.

नेट परीक्षा ही हिंदी अणि इंग्रजी ह्या दोन भाषेच्या माध्यमातुन घेतली जाते.

● सेट परीक्षा मध्ये राज्यस्तरीय पातळीवरचेच प्रश्न विचारले जातात म्हणजेच प्रश्नांची काठिन्यता थोडी सोपी असते.

नेट परीक्षेमध्ये प्रश्नांची काठिन्यता पातळी अवघड स्वरूपाची असते कारण ह्या परीक्षा मध्ये राष्टीय पातळीवरचे प्रश्न विचारले जातात.

● सेट परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीत परीक्षा असते.पण ही परीक्षा आँफलाईन घेतली जाते.यात आपल्या समोर पेपरमध्ये चार पर्याय दिलेले असतात यात निगेटिव्ह मार्कींग नसते.

नेट परीक्षा ही सुदधा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीतच असते पण ही परीक्षा आँनलाईन पदधतीने घेतली जाते.

● सेट परीक्षा ही एका दिवसामध्ये संपुर्ण महाराष्ट्रभरात घेतली जाते.

पण नेटपरीक्षा ही राष्टीय पातळीवरची असते म्हणुन ही परीक्षा संपुर्ण भारतात 15 ते 20 दिवसात विविध राज्यातील ठाराविक केंद्रावर घेतली जात असते.

महाराष्टात सेट परीक्षा ही मुंबई,पुणे,नागपुर,औरंगाबाद,नाशिक,सोलापुर,चंद्रपूर जळगाव तसेच नांदेड अमरावती गोवा इत्यादी केंद्रावर घेतली जाते.

पण नेट परीक्षा ही महाराष्टामध्ये पुणे,मुंबई,औरंगाबाद,नागपुर इत्यादी अशा केंद्रांवर घेण्यात येते.

पेपर 1 हा सामान्य अध्ययन सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.या पेपरमध्ये एकुण 50 प्रश्न विचारले जात असतात.हे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असतात.प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण दिले जातात.
पेपर 1 चा अभ्यासक्रम सेट आणि नेट दोघांसाठी सारखाच असतो.पेपर 1 हा सेट अणि नेट दोघांसाठी अनिवार्य असतो.

पेपर 2 हा एकुण दोनशे गुणांचा असतो.यात दोघांमध्ये 100 प्रश्न विचारले जात असतात.प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण असतात.

फक्त पेपर 2 हा सेट नेट यांचा आपापल्या स्पेशल विषयावर असतो.

सेट अणि नेटला पेपर 1 अणि पेपर 2 दोघांनाही एकुण 300 गुणांची परीक्षा असते.

पेपर 2 हा आपण ज्या विषयात आपले ग्रँज्युएशन पोस्टग्रँज्युएशन पुर्ण केले आहे आपल्या त्या विषयावर असणार आहे.

See also  महागाई म्हणजे काय ?Inflation information Marathi

जे विदयार्थी पदव्युतर शिक्षणाच्या दितीय वर्षात शिकत आहे असे विदयार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात पण पदव्युतर शिक्षणाचे दितीय वर्ष पुर्ण केल्यानंतर तसेच पदव्युतर शिक्षण पुर्ण झाल्याचे सर्टिफिकेट निकाल दाखवल्यानंतरच हे सर्टिफिकेट आपणास दिले जात असते.

सेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे फायदे –

● ज्या राज्यात आपण सेटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तेथील विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणुन आपण नोकरीला लागु शकतो.

नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे फायदे –

आपण ज्या राज्यात नेट परीक्षा उत्तीर्ण झालो आहे त्याराज्यासोबत आपण भारतातील इतर राज्यात देखील विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणुन नोकरीला लागु शकतो.