बी एड अणि डीएड मधील फरक _ Difference between BED and DED in Marathi

बी एड अणि डीएड मधील फरक _ Difference between BED and DED in Marathi

मित्रांनो शिक्षक बनण्यासाठी बी एड अणि डी एड या दोघेही कोर्स करणे खुप गरजेचे मानले जाते.

म्हणुन खुप जण शिक्षक बनण्यासाठी बी एड तसेच डी एडचा कोर्स करत असतात.

पण आपल्यापैकी खुप जणांच्या मनात एक शंका असते ती म्हणजे डी एड अणि बी एड या दोघांमध्ये कुठली समानता असते?कोणकोणते फरक असतात?

बी एड करणे योग्य की डी एड करणे?बी एड करण्याचे फायदे काय असतात डी एड करण्याचे फायदे काय असतात?कुठे चांगले वेतन मिळत असते?

असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या लेखातुन आपण जाणुन घेणार आहोत.

बी एड अणि डी एड दोघांमधील साम्यता –

● हे दोघे कोर्स शिक्षक बनण्यासाठी केले जातात.

● बी एड अणि डी एड दोघे कोर्सेसचा कालावधी एकुण दोन वर्ष इतका असतो.

● डी एडचा कोर्स पुर्ण केल्यानंतर उमेदवारास इंटर्नशिप करावी लागत असते.मगच आपणास डीएडचे सर्टिफिकेट प्राप्त होत असते.तसेच बी एड कोर्स केल्यानंतर देखील उमेदवारास इंटर्नशिप करावी लागते.त्यानंतरच उमेदवाराला बीएडचे सर्टिफिकेट दिले जाते.

● बी एड तसेच डी एड दोघे कोर्स पुर्ण केल्यानंतर आपणास केंद्र सरकार कडुन राज्य सरकार कडुन आयोजित करण्यात येणारया सीटी ईटी,टी ईटी या दोघांपैकी कुठल्याही एका परीक्षामध्ये उत्तीर्ण व्हावे लागते.यात काँलिफाय देखील व्हावे लागते.यानंतरच आपणास शिक्षक म्हणुन कुठल्याही शाळेत विदयार्थ्यांना शिकवता येत असते.आपण त्यासाठी पात्र ठरत असतो.

See also  एल आयसी मध्ये ९४०० पदांसाठी भरती सुरू - LIC ADO Recruitment 2023 In Marathi

● डी एड अणि बी एड हे दोघेही कोर्स उमेदवाराला सरकारी तसेच एखाद्या खाजगी संस्थेतुन देखील पुर्ण करता येतात.

बी एड अणि डी एड मधील फरक –

● डीएडचा फुलफाँर्म diploma in education असा होत असतो.

बी एडचा फुलफाँर्म bachelor in education असा होत असतो.

● डी एड करण्यासाठी विदयार्थ्याला दहावी +बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

बी एड करण्यासाठी आपणास कुठल्याही एका विषयात पदवी प्राप्त करणे आवश्यक असते.

● डी एड पर्यतचे शिक्षण पुर्ण केलेला उमेदवार पहिली ते आठवी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणुन पात्र ठरत असतात.

● बी एड पर्यतचे शिक्षण पुर्ण केलेला उमेदवार पहिली ते बारावी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकविण्यास पात्र ठरत असतो.

● डी एड करण्यासाठी उमेदवाराला दहावी +बारावीमध्ये ५० पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक असते.

बी एड करण्यासाठी उमेदवाराला बँचलर डिग्री मध्ये ५० पेक्षा अधिक गुण असणे गरजेचे असते.

● डी एड मध्ये उमेदवारांची व्हकँन्सी खुप कमी प्रमाणात मर्यादितच निघत असते.

बी एड उमेदवारांच्या व्हँकेन्सी खुप अधिक प्रमाणात निघत असतात.

● जो उमेदवार डी एड कोर्स करतो त्याला अँडमिशनसाठी बी एडच्या तुलनेत कमी फी भरावी लागते.

जो उमेदवार बी एड कोर्स करतो त्याला डी एडच्या उमेदवारापेक्षा अँडमिशनसाठी अधिक फी भरावी लागते.

● डी एड कोर्स करणारया उमेदवाराला विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी बी एड उमेदवाराच्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असते.

बी एड कोर्स करणारया उमेदवाराला विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी डी एड उमेदवाराच्या वेतनापेक्षा अधिक वेतन दिले जात असते.

● बी एड अणि डी एड दोघांमधुन केंद्र सरकार कडुन आयोजित केल्या जाणारया सीटी ईटी परीक्षेत पास झालेल्या उमेदवाराला भारतात कुठेही शिक्षक म्हणुन एखाद्या शाळेत तसेच संस्थेत लागता येते.

बी एड अणि डी एड दोघांमधुन
राज्य सरकार कडुन आयोजित करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला ज्या राज्यात त्याने परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याच राज्यात शिक्षक म्हणुन एखाद्या शाळेत तसेच संस्थेत नोकरी करता येत असते.

See also  NHAI मध्ये विविध रिक्त पदांची भरती | NHAI Recruitment 2023 In Marathi

कोणासाठी बी एड करणे अधिक योग्य आहे?

ज्या उमेदवारांना शिक्षक बनून पहिली ते बारावी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवायचे असेल त्यांनी बी एड कोर्स करायला हवा.

कोणासाठी डी एड कोर्स करणे अधिक योग्य आहे?

ज्या उमेदवाराला पहिली ते आठवी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवायचे आहे अशा उमेदवारांनी डी एड कोर्स करायला हवा.

बी एड करण्याचे फायदे –

● डी एड केलेला उमेदवार फक्त पहिली ते आठवी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवू शकतो पण बी एड केलेला उमेदवार पहिली ते बारावी पर्यतच्या विदयाथ्यांना शिकवू शकतो.

● डी एड मध्ये जाँब व्हँकेन्सी म्हणजेच कमी जागा निघतात पण बी एड मध्ये भरपुर व्हँकँन्सी असते.म्हणजे डी एडच्या तुलनेत नोकरीची अधिक संधी असते.

● डी एड उमेदवारापेक्षा अधिक वेतन प्राप्त होत असते.

बी एड करण्याचे तोटे –

इथे आपणास पदवीचे शिक्षण पुर्ण करावे लागते मग आपणास बीएडला प्रवेश मिळतो.

बँचलर डिग्री मध्ये किमान 50 गुण असावे लागतात.

अँडमिशनसाठी डी एड च्या तुलनेत अधिक फी लागते.

डी एड करण्याचे फायदे –

● आपण पहिली ते आठवी पर्यतच्या प्रायमरी मधील विदयार्थ्यांना शिकवू शकतो.

● डी एड करण्यासाठी आपल्याला फक्त बारावी पास असणे गरजेचे आहे.इथे आपणास पदवी पास असणे गरजेचे नसते.त्यातही बारावीत किमान 50 गुण असणे गरजेचे आहे.

● अँडमिशनसाठी आपणास बीएडच्या तुलनेत कमी फी लागते.

डी एड करण्याचे तोटे –

आपण फक्त पहिली ती आठवी पर्यतच्याच विदयार्थ्यांना हा कोर्स करून शिकवण्यास पात्र ठरत असतो.

यात जाँबची व्हँकँन्सी खुप कमी मर्यादित प्रमाणात निघते.म्हणजे यात नोकरी मिळण्याची संधी मर्यादित आहे.

वेतन देखील बी एडपेक्षा कमी दिले जाते.