बीई अणि बी-टेक मधील फरक _ Difference between BE and BTech in Marathi

बीई अणि बी-टेक मधील फरक _ Difference between BE and BTech in Marathi

मित्रांनो आपले बारावी सायन्सपर्यतचे शिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर भरपुर विदयार्थी हे इंजिनिअरींगकडे वळत असतात.

पण अशा वेळी आपण बी ई करायचे की बी टेकला अँडमिशन घ्यायचे?काय केल्यानंतर आपणास चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होणार?दोघांपैकी कोणता कोर्स आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल हा प्रश्न खुप विदयार्थींना पडत असतो.

कारण बी ई अणि बी टेक या दोघांमधील फरक खुप विदयार्थींना माहीतच नसतो म्हणुन हा गोंधळ सर्व विदयार्थ्यांचा होत असतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण बी ई अणि बी टेक या दोघांमधील फरक जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून विदयार्थीच्या मनात बी ई अणि बी टेक मध्ये काय फरक आहे यात कुठला पर्याय अधिक उत्तम आहे याबाबत कुठलीही शंका राहणार नाही अणि त्यांना दोघांपैकी एक योग्य पर्याय हमखास निवडता येईल.

बी ई अणि बी टेक मधील साम्य –

● बी ई अणि बी टेक हे दोघेही इंजिनिअरींगचे कोर्स आहेत.

● या दोघे इंजिनिअरींगच्या कोर्ससाठी आपणास चार वर्षाचा कालावधी लागत असतो.ज्यात एकुण आठ सेमिस्टरचा समावेश असतो.

● बी ई बी टेकच्या अभ्यासक्रमास प्रवेश प्राप्त करण्यासाठी विदयार्थीला बारावी पास असणे गरजेचे आहे.त्यातही विदयार्थ्याने सायन्स हा विषय घेऊन बारावी पुर्ण केलेली असावी.तसेच विदयार्थ्याला बारावी सायन्समध्ये फिजिक्स,केमिस्ट्री,मँथ या तिघे विषयांत किमान 60 गुण असायला हवेत.

● दोघेही कोर्सेसला जेईई,अँडव्हान्सड जेईई,ह्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.या दोघांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आपल्याला इंजिनिअरींगची इंट्रान्स एक्झाम पास करावी लागते.

See also  एस एससी बोर्डाच्या दहावीच्या शाळा एप्रिल महिन्यातच सुरू होणार SSC school start from.April

● एआयसीटीने असे सांगितले आहे की बी ई अणि बी टेक या दोघे पदवींना समान मान्यता प्राप्त आहे.दोघा डिग्रींमध्ये विदयार्थ्यांना समान करिअरची संधी आहे.कुठलीही डिग्री छोटी तसेच मोठी नाहीये.

● ज्या विदयार्थ्याने अगोदर आपले बी ई चे शिक्षण पुर्ण केलेले असेल तो नंतर बीटेक साठी अँडमिशन घेऊ शकतो.तसेच ज्या विदयार्थ्याने सर्वप्रथम बी टेकचा अभ्यासक्रम पुर्ण केलेला आहे तो बी टेकचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर देखील बी ई साठी अँप्लाय करू शकतो.

● बी ई बी टेक दोघे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर आपण जाँब करू शकतो किंवा उच्च शिक्षण प्राप्त करू शकतो जसे की बी ई नंतर आपण मास्टर डिग्रीसाठी एम ई करू शकतो.बी टेक नंतर एमटेक करू शकतो.

बी ई अणि बी टेक या दोघांमध्ये काय फरक आहे?

● बी ई चा फुलफाँर्म हा बँचलर आँफ इंजिनिअरींग असा होत असतो.

बी टेकचा फुलफाँर्म बँचलर आँफ टेक्नाँलाँजी असा होत असतो.

● बीईच्या अभ्यासक्रमात थेअरीचा अधिक समावेश असतो.यात विदयार्थींना थेअरी नाँलेज अधिक प्रमाणात दिले जात असते.

बी टेकच्या अभ्यासक्रमात सुरूवातीपासुनच विदयार्थ्यांना प्रँक्टिकल नाँलेज देण्याला त्यांचे स्कील डेव्हलप करण्याला विशेष प्राधान्य दिले जात असते.

● बी ई नंतर आपण मास्टर डिग्रीसाठी एम ई मास्टर आँफ इंजिनिअरींग करू शकतो.एमबीए करू शकतो.एम एससी,एम एस करू शकतो.

ज्यांनी बी टेकचे शिक्षण घेतले आहे ते पुढे मास्टर डिग्रीसाठी एमटेक मास्टर आँफ टेक्नाँलाँजी करू शकतात.

● बी ई नंतर आपणास नोकरी मिळवण्यासाठी इंटर्नशिप करण्याची कुठलीही सक्ती बंधन नसते.

● बी-टेकचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपणास इंटर्नशिप करणे तसेच इंडस्ट्रीयल सर्वे करणे अनिवार्य आहे.

● बी ई मध्ये आपणास इतर विषयांचा देखील अभ्यास करावा लागतो याने आपले इतर विषयांमधील नाँलेज देखील वाढते.

बी टेक मध्ये आपणास आपली फील्ड सोडुन इतर कुठल्याही विषयांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते.

See also  वरणगाव ओर्डीनन्स फॅक्टरी येथे तब्बल 40 जागांसाठी भरती सुरू Varangaon Ordinance factory recruitment

जर आपण बारावीनंतर डिप्लोमा केला तर डिप्लोमा नंतर आपणास बी ईच्या डायरेक्ट दुसरया वर्षात अँडमिशन मिळत असते.

बी ई कोणासाठी योग्य आहे?

असे विदयार्थी ज्यांना हार्डवेअर प्रोडक्शनशी निगडीत क्षेत्रामध्ये आपले करिअर करायचे आहे.असे विदयार्थी बी ई फिल्डची निवड करू शकतात.

बी टेक कोणासाठी अधिक योग्य आहे?

असा विदयार्थी ज्याला हार्डवेअर अधिक कार्यक्षम बनविणारया क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे असे विदयार्थी बी टेकची निवड करू शकतात.

विदयार्थ्यांनी बी ई अणि बी टेक दोघांमधील एकाची निवड कशी करावी?

कुठल्याही विदयार्थ्याने त्याचे फ्युचर करिअर प्लँनिंग काय आहे त्यानुसार तसेच त्यांच्या आवडीनुसार अंगात असलेल्या कला कौशल्यानुसार या दोघांपैकी एका क्षेत्राची निवड करायला हवी.

Leave a Comment