ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे – Document required for driving license in Marathi

ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे Document required for driving license in Marathi

जेव्हा आपण ड्राईव्हिंग लायसन तयार करण्यासाठी आरटीओ कडे आँफिस मध्ये जात असतो तेव्हा आपल्याकडुन ड्राईव्हिंग लायसन बनवण्यासाठी काही महत्वाच्या कागदपत्रांची मागणी केली जाते.

आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या कागदपत्रांविषयी जाणुन घेणार आहोत.

नवीन ड्राईव्हिंग लायसन बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागत असतात?

जेव्हा आपण आपले नवीन लर्निग ड्राईव्हिंग लायसन बनवायला जातो तेव्हा आपणास वेगळे डाँक्युमेंट लागत असतात.अणि जेव्हा आपण परमनंट लायसन साठी अर्ज करतो तेव्हा आपल्याला वेगळे डाँक्युमेंट लागत असतात.हे लायसन्स बनविताना आपण नेहमी लक्षात ठेवावे.

जेव्हा आपण लर्निग लायसन बनवत असतो तेव्हा पुढील कागदपत्रांची आपणास आवश्यकता असते-

● Acknowledgement receipt -पोचपावती -जेव्हा आपण लर्निग लायसन काढायला जात असतो तेव्हा आपण आपल्याला मिळालेली अँक्नाँलेजमेंट पावती सोबत घेऊन जावी.

● दोन पासपोर्ट साईज फोटो -लर्निग करताना स्कँन करून आपण जे फोटो अपलोड केले आहे तेच दोन फोटो इथे द्यायचे आहे.

● आधार कार्ड -लर्निग लायसन बनविण्यासाठी आपल्या जवळ आधार कार्डची ओरिजनल प्रत अणि झेराँक्स काँपी असणे अनिवार्य आहे.

● अँड्रेस प्रूफसाठी आपण मतदान कार्ड,राशन कार्ड,पासपोर्ट पँन कार्ड यापैकी कुठलेही एक डाँक्युमेंट घेऊन जावे.याच्या दोन झेराँक्स नेणे गरजेचे आहे.

वरील सर्व डाँक्युमेंट नवीन लर्निग लायसन बनविण्यासाठी आपणास लागत असतात.

परमनंट ड्राईव्हिंग लायसन बनवण्यासाठी महत्वाची कागदपत्रे

● फाँर्म तसेच फी भरल्याची पावती

See also  Whip म्हणजे नेमकं काय ? राजकारणातील व्हिप - What Is A Whip In Politics ?

● जुन्या लर्निग लायसनची सत्य प्रत

● पासपोर्ट साईज फोटो दोन

● आधार कार्ड

अँड्रेस प्रूफसाठी आपण खालील कागदपत्र घेऊन जाऊ शकतो –

● जन्मदाखला

● पँनकार्ड

● राशन कार्ड

● वीजेचे बील

● वोटर आयडी कार्ड

2022 मध्ये लर्निग लायसन बनवायला अर्ज कसा करायचा आँनलाईन की आँफलाईन?

2022 मध्ये लर्निग लायसन बनवायला आपणास आँनलाईन अर्ज करावा लागणार आहे.यासाठी आपण एखाद्या सायबर कँफेवर जाऊन फाँर्म भरू शकतो.किंवा स्वता देखील आपल्या पीसी वरून आँनलाईन फाँर्म भरु शकतो.

किंवा आपण आँफलाईन पदधतीने सुदधा अर्ज करू शकतो.

नवीन लर्निग लायसनचा कालावधी किती असतो?

नवीन लर्निग लायसनचा कालावधी सहा महिना इतका असतो.यानंतर आपणास परमनंट लायसनसाठी अर्ज करावा लागतो.

1 thought on “ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे – Document required for driving license in Marathi”

Comments are closed.