वरणगाव आॅर्डिन्स फॅक्टरी येथे तब्बल 40 जागांसाठी भरती सुरू
वरणगाव येथील आॅर्डिन्स फॅक्टरी मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.
जे उमेदवार इच्छुक तसेच पात्र आहेत त्यांनी पदयोग्यतेनुसार आॅफलाईन/ आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
सदर भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.ज्या उमेदवारांची भरती दरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना वरणगाव जिल्हा जळगाव येथे नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
सर्व पात्र उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव –
1)पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार –
एकुण पदसंख्या -40
बॅचलर ऑफ आर्ट्स –
यु आर -7 जागा
एस सी -1
एसटी -1
ओबीसी 3 जागा
बॅचलर ऑफ कॉमर्स –
यु आर -8 जागा
एससी 1 जागा
एसटी 1 जागा
ओबीसी 4 जागा
बॅचलर ऑफ सायन्स –
बीएससी केमिस्ट्री
यु आर 6 जागा
एससी 1 जागा
एसटी 1 जागा
ओबीसी 2 जागा
बीएससी कंप्युटर –
यु आर -1 जागा
ओबीसी -1 जागा
एस सी –
एसटी –
बीएससी इलेक्ट्रॉनिक –
यु आर -1 जागा
ओबीसी 1 जागा
एससी –
एसटी –
शैक्षणिक पात्रतेची अट –
पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठामधुन संबंधित शाखेमध्ये पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराचे बीए,बीकाॅम किंवा बीएससी झालेले असणे आवश्यक आहे.
वयाची अट –
सदर पदासाठी उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.जास्तीत जास्त वयाची कुठलीही अट ठेवण्यात आली नाहीये.
वेतन -ज्या पात्र उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना 9 हजार रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका – भुसावळ, जि. जळगाव [एमएस]-425308.
आॅफिशिअल वेबसाईट –
http://ofbindia.gov.in/
निवडप्रक्रिया –
सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड मेरिट लिस्टमधील गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.
ट्रेनिंगचा कालावधी –
ट्रेनिंगचा कालावधी जाॅईन केलेल्या तारीखेपासुन एक वर्ष इतका असणार आहे.
उमेदवारांनी सहभाग घेण्याआधी https://www.mhrdnats.gov.in ह्या अॅप्रेन्टिएस पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची.अणि कागदपत्रे पडताळणीसाठी नोंदणी नाव नोंदणी करायचा पुरावा देखील आणायचा आहे.
अपुर्ण अर्ज अणि असमर्थित असलेली माहीती स्विकारण्यात येणार नाही.जाहीराती विषयी अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी ddpdoo.gov.in वर जायचे आहे.