अग्नीवीर लेखी परीक्षेसाठी जाताना उमेदवारांना कोणकोणते महत्वाचे कागदपत्र लागणार आहे? । Documents required for Agniveer Recruitment Written exam in Marathi

Documents required for Agniveer Recruitment Written exam in Marathi

नुकतेच अग्नीवीर लेखी भरती परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र हे डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व उमेदवारांची लेखी संगणक आधारीत परीक्षा कधी होणार आहे हे देखील जाहीर करण्यात आले आहे.

अग्नीवीर भरतीसाठी लेखी संगणक आधारीत परीक्षा ही १७ एप्रिल २०२३ ते २६ एप्रिल ह्या तारखेदरम्यान घेण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

सर्व उमेदवारांनी ह्या लेखी परीक्षेसाठी आपापली प्रवेशपत्र देखील अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन डाऊनलोड करून घेतली आहेत.

पण आता अनेक उमेदवारांना हा प्रश्न पडला आहे की परीक्षा कधी आहे परीक्षेची तारीख तर आपल्याला कळली हाॅलतिकिट पण डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे

पण १७ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान अग्नीवीर भरतीसाठी जी संगणक आधारीत लेखी परीक्षा आपली घेतली जाणार आहे तिथे आपणास किती अणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत.

Documents required for Agniveer Recruitment Written exam in Marathi
Documents required for Agniveer Recruitment Written exam in Marathi

परीक्षा गृहात परीक्षा देण्यासाठी जाताना कोणकोणती कागदपत्रे आपणास घेऊन जावी लागणार आहेत.

तुम्हाला देखील हीच चिंता सतावत आहे की परीक्षेसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.

आजच्या लेखात आपण अग्नीवीर भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या संगणक आधारीत लेखी परीक्षेसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हेच जाणुन घेणार आहोत.

अग्नीवीर लेखी परीक्षेसाठी जाताना उमेदवारांना कोणकोणते महत्वाचे कागदपत्र लागणार आहे?

अग्नीवीर भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी परीक्षा गृहात जाताना उमेदवारांना खुप जास्त कागदपत्रे घेऊन जाण्याची आवश्यकता पडणार नाहीये.काही मोजकेच डाॅक्युमेंट आहे जे आपणास घेऊन जावे लागणार आहे.

मंगल पांडे कोण होते? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडे यांनी दिलेले अमुल्य योगदान

ह्या सर्व कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे असणार आहे –

१) प्रवेशपत्र -admit card

अग्नीवीर भरतीसाठी लेखी परीक्षेला परीक्षा गृहात जाताना सर्व उमेदवारांना आपले हाॅलतिकिट म्हणजेच प्रवेशपत्र घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे कारण याशिवाय आपणास परीक्षा गृहात प्रवेश दिला जाणार नाही.

म्हणुन ज्या उमेदवारांनी अजुनही आपले प्रवेशपत्र अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्याची प्रिंट देखील काढुन घ्यायची आहे.

प्रवेशपत्राची प्रिंट आपणास कलर तसेच ब्लँक अॅण्ड व्हाईट दोघे पदधतीने काढता येईल.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रवेशपत्राची प्रिंट ए४ साईज मध्ये काढायची आहे.

कारण आज ८ एप्रिल आहे अधिकृत संकेतस्थळावर सांगितले गेले आहे की उमेदवारांना ८ एप्रिल पर्यंतच आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आॅनलाईन संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.

आॅनलाईन प्रिंट काढल्यावर प्रवेशपत्रामध्ये उमेदवारांना काही माहीती भरायची आहे.

आपले पुर्ण नाव आपल्या वडिलांचे नाव टाकायचे आहे.कुठे पेपर होणार आहे त्या जागेचे नाव लिहायचे आहे अणि परीक्षा कधी आहे ती तारीख टाकुन घ्यायची आहे.

२) बाॅल पाॅईट पेन/वाॅटर बाॅटल-

सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी जाताना एक निळा किंवा काळया रंगाचा बाॅल पाॅईट पेन देखील परीक्षा गृहात जाताना सोबत घेऊन जायचा आहे.परीक्षा गृहात जाताना जेल पेन घेऊन जायचा नाहीये.

उमेदवार परीक्षा गृहात पिण्यासाठी पाण्याची बाटली देखील सोबत घेऊन जाऊ शकतात त्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

३) ओळखपत्र –

परीक्षा गृहात जाताना उमेदवारांना ओळखपत्र घेऊन जाणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट ह्यापैकी कुठलेही एक कागदपत्र आपण सोबत घेऊन जाऊ शकतात.

फक्त जे कागदपत्र आपण परीक्षा गृहात घेऊन जाल ते ओरिजनल असणे आवश्यक आहे फोटोकाॅपी वगैरे नसावी.

४) दोन पासपोर्ट साईज फोटो –

परीक्षा गृहात जाताना दोन पासपोर्ट साईज फोटो देखील सोबत घेऊन जायचे आहेत.तरी देखील उमेदवारांनी जवळ किमान चार फोटो ठेवायचे आहे म्हणजे नजरचुकीने एखादा फोटो हरवला तरी आपली फजिती होणार नाही.

५) मास्क हॅड सॅनिटायझर –

कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे सरकारने जागोजागी मास्क हॅड सॅनिटायझर वापरण्यास सुचित केले आहे

म्हणून उमेदवारांना तोंडावर लावण्यासाठी मास्क अणि हातावर लावण्यासाठी हॅड सॅनिटायझर देखील घेऊन जायचे आहे.

परीक्षा गृहात जाताना काय घेऊन जाऊ नये?

परीक्षा गृहात जाताना कुठलेही मोबाईल कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जायचे नाहीये.अणि समजा काही महत्त्वाच्या कारणास्तव मोबाईल घेऊन जाणे आवश्यक असेल तर तेव्हा अशा परिस्थितीत परीक्षा केंद्राकडुन आपणास आपला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी बॅगची व्यवस्था केली जात असते.