Doping in sports म्हणजे काय?- Doping in sports meaning in Marathi

Doping in sports म्हणजे काय?- Doping in sports meaning in Marathi

डोपिंग ही एक टेस्ट असते.ज्यात एखादा खेळाडु दोषी आढळुन आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जात असते.

डोपिंग टेस्ट का केली जाते?

क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडुंपैकी कुठल्याही खेळाडुने खेळताना कुठल्याही मादक द्रव्याचे सेवन तर केले नाहीये ना या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी खेळाडुंची डोपिंग टेस्ट घेतली जात असते.

कुठलीही स्पर्धा सुरू होण्याअगोदर प्रशिक्षण शिबिरामध्ये सर्व संशयित खेळाडुंची ही टेस्ट घेतली जात असते.

अनेक असे खेळाडू असतात जे खेळादरम्यान शरीर उत्तेजित राहण्यासाठी आपली कामगिरी परफाँर्मन्स चांगला राहण्यासाठी विविध मादक द्रव्यांचे सेवन करत असतात.याने त्यांना स्पर्धेमध्ये उत्तेजित राहण्यासाठी साहाय्य प्राप्त होत असते.

डोपिंग हा एक चुकीचा मार्ग आहे.जो काही स्पर्धक अवलंबित असतात.

खेळाडुंची डोपिंग टेस्ट घेण्याचे काम कोण करते?

सर्व खेळाडुंची स्पर्धा सुरू होण्याच्या आधी प्रशिक्षण शिबिरामध्ये डोपिंग टेस्ट घेतली जात असते अणि ही टेस्ट घेण्याचे काम विश्व तसेच राष्टीय डोपिंग संस्था करत असते.

डोपिंग टेस्ट कशा पदधतीने घेतली जाते?

● डोपिंग टेस्टदरम्यान सर्वप्रथम खेळाडुंचे ब्लड अणि लघवीचे सँपल चेक अपसाठी संग्रहित केले जातात.हे सँपल ज्याचे सँपल घेतले आहे त्या खेळाडुच्या समोरच सिल पँक केले जात असते.

● मग ह्या संग्रहित केलेल्या सँपल्सला नाडा येथील लँबरोटरी मध्ये टेस्टींग म्हणजेच चाचणी करण्यासाठी नेले जाते.

● सर्वात पहिले लँबमध्ये खेळाडुंच्या सँपलची ए टेस्ट घेतली जाते ज्यात एखादा खेळाडु दोषी आढळला म्हणजे त्याने मादक पदार्थाचे सेवन केले आहे असे आढळुन आल्यास त्या खेळाडुला तात्पुरता खेळातुन निलंबित केले जात असते.

See also  संत कबीर यांच्याविषयी माहीती- Sant Lord Kabir Information In Marathi

● यानंतर आपल्यावर केलेल्या आरोपाविरूदध अपील करण्यासाठी खेळाडु बी टेस्ट करू शकतो.यात खेळाडुने अपील केल्यावर पुन्हा त्याच्या सँपलची टेस्ट घेतली जाते.

● पण बी टेस्ट मध्ये देखील तो खेळाडु पुन्हा दोषी आढळुन आला तर त्याच्याविरूदध कडक कारवाई केली जात असते.म्हणजे त्याला स्पर्धेतुन कायमचे बाद देखील केले जाऊ शकते.तसेच त्याला खेळातुन मिळालेले सर्व पुरस्कार काही वर्षाकरीता त्याच्याकडुन दंड स्वरूप हिरावून घेतले जाऊ शकतात.

वाडा अणि नाडा काय आहेत?

वाडा अणि नाडा ह्या दोन संस्था आहे ज्यांच्याकडे ज्या खेळाडुने मादक पदार्थाचे सेवन केले आहे असा संशय आहे त्याची उत्तेजक द्रव चाचणी करण्याची जबाबदारी सोपविली जात असते.

वाडा ह्या संस्थेची स्थापणा मादक उत्तेजक पदार्थाचे सेवन करण्यास बंदी आणण्यासाठी त्याला मनाई करण्यासाठी केली गेली होती.

वाडाची स्थापणा कधी करण्यात आली होती?

वाडा ही एक उत्तेजक मादक द्रवपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध करणारी संस्था आहे जीची स्थापणा 1999 मध्ये करण्यात आली होती.

डोपिंगचे काही अत्यंत महत्वपूर्ण नियम ज्याचे प्रत्येक खेळाडुने पालन करायलाच हवे –

● खेळाडुंनी कुठल्याही मादक उत्तेजक द्रवपदार्थाचे सेवन करून खेळात भाग घेता कामा नये.

● जी औषधे खेळाडुंना घेण्यास मनाई करण्यात आली आहे अशा औषधांचे सेवन करू नये.

● डोपिंग समितीने खेळाडुला टेस्ट साठी बोलावल्यावर कुठलाही खेळाडु चाचणी करण्यासाठी नकार देऊ शकत नही तसेच टेस्टला गैरहजर देखील राहु शकत नाही जर त्याने असे केले तर त्याला खेळातुन बाद करण्यात येईल.

● अणि समजा काही कारणास्तव खेळाडु टेस्टसाठी हजर नही राहु शकला तर त्याला त्याचे कारण सादर करावे लागेल.