Duolingo app विषयी माहीती – Duolingo app Marathi information

Duolingo लर्निंग app विषयी माहीती – Duolingo app Marathi information

आज असे खुप विदयार्थी आहेत ज्यांचे इंग्रजी फार कच्चे आहे आणि त्यांना इंग्रजीत लिहायला,बोलायला तसेच वाचायला अवघड जात असते.चार चौघात जेव्हा कोणी त्यांच्याशी इंग्रजीत बोलले तर त्यांना त्या व्यक्तीसोबत इंग्रजीत संभाषण करता येत नसते.

याचसोबत आज कुठल्याही जाँब इंटरव्युहमध्ये तसेच मोठमोठया कंपनीमध्ये सर्व जण इंग्रजीतच एकमेकांशी संवाद साधत असतात.अशा वेळी आपली फार फजिती होत असते.

मग असे विदयार्थी तसेच नोकरदार उमेदवार आपले इंग्रजी सुधारण्यासाठी इंटरनेटवर नेहमी एक असे माध्यम शोधत असतात ज्याचा उपयोग करून त्यांना लवकरात लवकर इंग्रजीत उत्तम लिहिता,बोलता,तसेच वाचता येईल.

आज इंटरनेटवर अशा अनेक अँप्स आहेत ज्याचा वापर करून आपण सहज इंग्रजी लिहायला,बोलायला तसेच वाचायला देखील शिकू शकतो.

आज मी तुम्हाला अशाच एक महत्वाच्या अँपविषयी माहीती देणार आहे जिचा वापर करून आपण इंग्रजीत लिहायला, बोलायला,वाचायला तर शिकुच शकतो याचसोबत आपण इतर 15 ते वीस भाषेत तसेच यापेक्षा जास्त भाषेत ह्या अँपच्या साहाय्याने लिहायला,बोलायला,वाचायला शिकु शकतो.

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया ह्या ड्युलिंगो अँपविषयी अधिक सविस्तरपणे.

Duolingo app काय आहे?

डयुलिंगो हे एक निशुल्क भाषा शिकण्याचे व्यासपीठ आहे.(charge free language learning platform).डयुलिंगोच्या आँफिशिअल वेबसाईटद्वारे तसेच अँपदवारे आपण कुठलीही भाषा शिकु शकतो.

फक्त यासाठी आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा आणि चांगले कनेक्शन असणे गरजेचे असते.मोबाईलसोबत आपण लँपटाँप,कंप्युटरचा वापर करून देखील डयुलिंगो अँपवरून कुठलीही भाषा शिकु शकतो.

Duolingo लर्निंग app विषयी माहीती - Duolingo app Marathi information

डयुलिंगो ह्या प्लँटफाँर्मवर आपल्याला कुठलीही भाषा शिकण्यासाठी चार्ज तसेच फी देण्याची आवश्यकता नसते.इथे आपण कोणतीही भाषा फ्री मध्ये शिकु शकतो.

See also  टीबीएच चा फुल फॉर्म काय होतो ? TBH full form in Marathi

ज्यांना प्रिमियन चार्ज घेऊन एखादी भाषा एकदम सखोल शिकायची असेल त्यांच्यासाठी यात प्रिमियम चार्जची सुविधा देखील उपलब्ध आहे.300 कोटीहुन अधिक युझर्स आज ह्या अँपचा भाषा शिकण्यासाठी वापर करीत आहे.

डयुलिंगो वर आपण 35 विविध भाषेत बोलायला शिकु शकतो ज्यात अशा काही महत्वपुर्ण भाषांचा देखील समावेश आहेत ज्यात पुर्ण जगभरातील विविध देशात मोठया पातळीवर बोलले तसेच संभाषण केले जातात.

 

 

 

● इंग्रजी

● हिंदी

● स्पँनिश

● जर्मन

● इटालियन

● फ्रेंच

● जापनीज

● चायनीज

● कोरियन

● लँटिन

● रशियन

इत्यादी.

Duolingo हे आपणास iOS,Android,Windows 8 आणि windows10 ऑपरेटिंग सिस्टमवर देखील use करता येत असते.Duolingo आपणास 23 भाषांमध्ये 50 पेक्षा जास्त भिन्न भाषांचा अभ्यासक्रम शिकण्याची परवानगी देखील देते.

डयुलिंगोने केलेल्या एका अभ्यासात असे देखील सिदध झाले आहे की डयुलिंगोचा भाषा अभ्यासक्रम हा पुर्ण एक विदयापीठीय सेमिस्टरच्या समान आहे.

यात सर्व भाषेतील अभ्यासक्रम अत्यंत सर्जनशील आणि मजेशीर पदधतीने आपणास शिकवले जात असतात.

आपला इंग्रजीचा शब्दसाठा आणि उच्चार सुधारण्यासाठी लहान चँप्टर यात दिले आहेत.ज्याने आपल्याला बोलणे,लिहिणे,वाचणे इत्यादींचा सराव करण्यास मदत होत असते.आपणास यात दररोज नवनवीन शब्द देखील शिकायला मिळतात.

Duolingo app ची काही इतर वैशिष्टये :

● इथे भाषा शिकण्यासाठी आपण विविध गेम्सचा देखील वापर करू शकतो.

● यात जे प्रश्न विचारले जात असतात त्याचे उत्तर देऊन आपण आपल्या पुर्ण केलेल्या सर्व भाषेच्या आणि व्याकरणाच्या अभ्यासक्रमाचे रिव्हीजन देखील करू शकतो.

● डयुलिंगोमध्ये इंग्रजी भाषिकांसाठी हिंदी भाषा शिकण्याचा एक कोर्स देखील उपलब्ध आहे.

 

150 English sentences used in daily life with Marathi meaning

150 English sentences used in daily life with Marathi meaning – दैनंदीन वापरातले इंग्रजी शब्द व वाक्य मराठी अर्थासह