Ethics म्हणजे काय – नैतिक समिती- Ethics meaning in Marathi
Ethical म्हणजे सदवर्तन, नैतिकता किंवा नीतिमत्ता ,आपण समाजात वावरताना कसे वागल पाहिजे याचे काही लिखित अलिखित तत्त्व, संकेत, सूचना ,मानक ठरलेली असतात. या तत्व आणि संकेत वरून ठरवले जात की आपलं आचरण योग्य आहे की चुकीचे आहे की वाईट आहे.
आपले नैतिकतेला धरून वागणं याचा आपल्या जीवनात मोठा प्रभाव पडत असतो, नितीमता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवा.
नैतिकता म्हणजे योग्य आणि चुकीचे वर्तन ठरविण्यासाठी वापरले जाणारे तत्त्वे आणि मानके. नैतिकता ही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आपण जीवनात नैतिक मूल्यांचे पालन केल्याने आपल्याला समाजात योग्य रीतीने जगण्यास मदत होते, इतकेच नाही तर आपल्या कामकाजात यशस्वी होण्यासही मदत होते.
नैतिकतेची भूमिका
व्यक्तिगत जीवनात: नैतिकता व सदवर्तन आपल्याला योग्य आणि चुकीचे वर्तन ओळखण्यास आणि त्यानुसार निर्णय घेण्यास मदत करते. नैतिक मूल्यांचे पालन केल्याने आपले स्वतःचे आणि इतरांच्याबद्दल आदर राखण्यास मदत होते. आपल्याला समाजात सन्मान मिळतो आणि आपले नातेसंबंध दृढ होतात.
व्यावसायिक जीवनात: नैतिकता आपल्याला आपल्या ऑफिस मध्ये, उद्योगात सहकाऱ्यांशी, ग्राहकांशी आणि इतर व्यवसायांशी सन्मानाने वागण्यास मदत करते. नैतिक मूल्यांचे पालन केल्याने आपल्या व्यवसायाची प्रतिमा चांगली राहते आणि आपला व्यवसाय वाढीची व शस्वी होण्याची शक्यता वाढते.
नैतिक समिती
मोठ्या उद्योग व्यवसायिक संस्था , कॉलेज शैक्षणिक संस्था मध्ये तसेच अनेक इतर क्षेत्रात नैतिक मुद्द्यांवर मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठो एक तज्ञा समिती असते तिला नैतिक समिती म्हटले जाते.
नैतिक समित्यांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, जसे की वैज्ञानिक, डॉक्टर, वकील मानसोपचार तज्ञा आणि धार्मिक नेते. नैतिक समित्या संशोधन प्रस्ताव, व्यावसायिक योजना आणि इतर नैतिक मुद्दे असलेल्या बाबींची पुनरावलोकन करतात आणि आपला अहवाल मांडतात..
Ethics मराठीत उदाहरणे
वैयक्तिक जीवनात: Personal life ethics
- एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करणे
- आपल्या आई वडिलांची सेवा करणे
- कुणाला शब्द दिला असल्यास त्याच पालन करणे
- जीवनात चोरी लबाडी ,खोट्या पासून दूर राहणे
व्यावसायिक जीवनात: Bussiness Ethics
- आपल्या सहकाऱ्यांशी सन्मानाने वागणे
- आपल्या ग्राहकांना योग्य उत्पादने आणि सेवा देणे,फसवणुक होणार नाही याची काळणी घेणं
- आपल्या व्यवसायात भ्रष्टाचार पासून दूर राहणे
- आपल्या व्यवसायाची आवश्यक तिथे गुप्तता पाळणे
नैतिकता ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नैतिक मूल्यांचे पालन केल्याने, जीवनात योग्य आचरण तुमाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास नक्कि मदत करते.