फादर्स डे कधी आहे? सर्वप्रथम वडिलांच्या आठवणीत हया एका मुलीने साजरा केला होता हा विशेष दिवस -Father day date 2023 in Marathi

फादर्स डे कधी आहे?- Father day date 2023 in Marathi

दरवर्षी आपल्या आईवडिलांच्या सन्मानार्थ आपण मदर्स डे अणि फादर्स डे हे दोन महत्वाचे दिवस साजरा करीत असतो.

आईचा सन्मान करण्यासाठी आपण मे महिन्यात मदर्स डे साजरा करतो अणि वडिलांविषयी आपल्या मनात असलेला आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी आपण जुन महिन्यात फादर्स डे साजरा करीत असतो.

सर्व वडिलांचा स्वभाव व्यक्तीमत्व हे एकदम नारळाप्रमाणे असते ते दिसायला वरतुन आपल्याला खुप कठोर दिसत असतात पण आतुन तितकेच त्यांचे मन हळवे असते त्यांच्या मनात आपल्यासाठी भरपूर प्रेम देखील असते.

Father day date 2023 in Marathi
Father day date 2023 in Marathi

सर्व मुलांसाठी आपले वडील हे एक सुपरहिरो प्रमाणे असतात.प्रत्येक मुलगी लग्न झाल्यावर आपल्याला आपल्या वडिलांच्या सारखा नवरा मिळावा अशी अपेक्षा करत असते.
ती आपल्या जीवनसाथी मध्ये आपल्या वडिलांचे प्रतिबिंब बघत असते.

फादर्स डे कधी साजरा केला जातो?

दरवर्षी जुन महिन्यामध्ये तिसरया रविवारी फादर्स डे हा दिवस साजरा केला जात असतो.

२०२३ मध्ये फादर्स डे कधी साजरा केला जाणार आहे?

२०२३ मध्ये १८ जुन रोजी साजरा करण्यात येणार आहे.

Father day date 2023 in Marathi

फादर्स डे सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला होता? फादर्स डेचा इतिहास काय आहे?

  • इतिहास कारांचे असे मत आहे की फादर्स डे हा वडिलांना समर्पित केला जाणारा दिवस सर्वप्रथम वाॅशिंगटन मधील स्पोकेन ह्या एका शहरात साजरा करण्यात आला होता.

  • असे देखील सांगितले जाते की हा दिवस साजरा करायची सुरूवात वाॅशिंगटन मधील सोनेरा लुईस स्मार्ट नावाच्या एका मुलीमुळे झाली होती आईचे देहांत झाल्यावर आईचे प्रेम देखील सोनेराला तिच्या वडिलांनी दिल्याने तिने वडिलांच्या सन्मानार्थ तसेच आपले प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला साजरा केला होता.
See also  केंद्र सरकारने राज्यांना ओएम एसएस अंतर्गत केली जात असलेली तांदूळ गव्हाची विक्री केली बंद शासनाच्या हया निर्णयामुळे कर्नाटकची अन्न भाग्य योजना अडचणीत - Anna Bhagya Yojana Scheme - Karnataka

  • पण याचसोबत काही इतिहासकारांचे असे मत आहे की ५ जुलै १९०७ मध्ये वेस्ट व्हर्जिनिया येथे एका खाण दुर्घटनेत खाणीत काम करत असलेले २५० खाण कामगार मृत्यू पावले.

  • मृत्यू झालेले अधिकतम कामगार कोणाचे तरी वडिल होते.हया दुर्घटनेत अनेक लेकरांनी आपल्या वडिलांना गमावले.
  • पुढे जाऊन काही सामाजिक संस्था संघटनांनी पुढाकार घेतला अणि १९०८ मध्ये ५ जून हा दिवस खाण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व मुलांच्या पित्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी पितृ दिवस म्हणून साजरा केला गेला होता.

  • फादर्स डे हा दिवस दरवर्षी भारतासमवेत कॅनडा,अमेरिका, पाकिस्तान,अर्जेंटिना,आयलॅड,इंग्लंड, ग्रीस, इत्यादी देशांत साजरा केला जातो.

  • फादर्स डे वर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडुन एक अधिकृत घोषणा देखील करण्यात आली ज्यात हा दिवस जुन महिन्यात तिसरया रविवारी साजरा करण्यात येईल असे ठरवले गेले.