फ्रेडरिक टेलर- शास्त्रीय व्यवस्थापन- Frederick Taylor’s 5 Principles of Scientific Management

फ्रेडरिक टेलर – शास्त्रीय व्यवस्थापन ची कौशल्य व तत्व – Frederick Taylor’s 5 Principles of Scientific Management

मित्रांनो मागील एका लेखात आपण हेन्री फायोल यांच्या 14 Principle Of Management विषयी सविस्तर जाणुन घेतले होते.

आता आजच्या लेखात आपण अजुन एक महत्वाचा भागाचा अभ्यास करणार आहोत.ज्यात आपण टेलरच्या साईंटिफिक टेक्निक्स आणि प्रिन्सीपल आँफ मँनेजमेंट विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Taylor चे Scientific Principles Of Management किती आणि कोणकोणते आहेत?

FW Taylor यांना Father Of Scientific Management म्हणुन आपण सर्व जण ओळखतो.

टेलोर यांनी त्यांच्या काही सिदधांतामधुन हे सिदध केले आहे की मँनेजमेंटसाठी साईंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक पदधत लागु केली जाऊ शकते.

FW Taylor यांनी सांगितले आहे की कुठल्याही बिझनेसच्या मध्ये,संस्थेच्या मध्ये जेवढयाही टेक्निक्स असतील त्या साईंटिफिकली प्रूव्ह असायला हव्यात.

म्हणजेच त्या सर्व टेक्निक खुप वेळेस कुठेतरी अँप्लाय केल्या गेल्या असतील आणि त्या अँप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यातुन काही रिझल्ट देखील पाहायला मिळाले असतील.

त्यानुसार Taylor ने आपल्याला पाच प्रिन्सिपल आँफ मँनेजमेंट सांगितले आहेत जे आपण आता जाणुन घेणार आहोत

Taylor चे Principles Of Management एकुण पाच आहेत आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

  1. विज्ञान हा काही ठोकताळा नसतो Science Is Not Rule Of Thumb)
  2. सुसंवाद साधा मतभेद ठेवू नका(Harmony Not Discord ) :
  3. मानसिक क्रांती( Mental Revolution) :
  4. सहकार्याची भावना ठेवा व्यक्तीवादाची नव्हे(Co Operation Not Individualism) :
  5. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या उत्कृष्ठ कार्यक्षमतेनुसार विकास (Development Of Every Person To His Greatest Efficiency) :

1)विज्ञान हा ठोकताळा नसतो (Science Is Not Rule Of Thumb) –

यात Taylor आपल्याला सांगतात सायन्स लावा,Practical Application लावा पण अंगठयाचा नेम/ अंदाजे ठोकताळा लावू नका.

म्हणजेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगत आहात की दोन ते तीन तासात अमुक काम पुर्ण झालेच पाहिजे तर आपण सांगितल्यावर ते काम तेवढया वेळात पुर्ण होऊनच जाईल असा समज धरून बसु नका.अशा भ्रमात राहू नका.

तुम्ही स्वता Practically बघा की ते काम किती आहे?आणि ते पुर्ण व्हायला एकुण किती वेळ लागु शकतो?आणि त्यानुसारच ते काम किती वेळात पुर्ण झाले पाहिजे हे ठरवा.म्हणजेच त्याचे Duration Final करा.

म्हणजेच टेलोर आपल्याला सांगतात की कोणतेही काम दिलेल्या कालावधीत पुर्ण होईल की नाही याचा Practically विचार करा.कोणत्याही कल्पणेच्या विश्वात जगुन कुठलेही काम करू नका.

2) सुसंवाद साधा मतभेद ठेवू नका(Harmony Not Discord –

See also  बेरोजगारीचे प्रकार-Types Of Unemployment In Marathi

टेलोर आपल्याला सांगतात मँनेजरने आणि वर्करने कुठलेही काम एकदम शांततेत करावे,आपापसात समताभाव ठेवावा,कुठल्याही प्रकारची भांडण तंटा करू नये.

कुठलाही मतभेद होऊ नये यासाठी मँनेजर आणि वर्कर या दोघांनी एकमेकांचे मत समजून घ्यावे एकमेकांच्या मताचा दोघांनी आदर करावा आणि मिळुन मिसळुन कोणतेही काम करावे.

म्हणजेच टेलोर हे सांगतात की कामात काही अडचण असेल तर एकमेकांशी व्यवस्थित संभाषण करावे उगाच एकमेकांसोबत वाद घालत बसु नये.

3) मानसिक क्रांती(Mental Revolution) :

या तंत्राचा वापर करून मँनेजमेंट आणि वर्कस या दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असतो.

यात दोघांनीही एकमेकांचे मुल्य समजुन पुर्ण सहभाग आणि सहकार्याने कुठलेही काम करायला हवे.कंपनीला नफा प्राप्त होणे,कंपनीच्या प्रगतीत वाढ होणे हे वर्कर आणि मँनेजमेंट या दोघांचेही उददिष्ट असायला हवे.

म्हणजेच वर्कर आणि मँनेजमेंट या दोघांमध्ये ऐक्य असायला हवे असे टेलोर आपल्याला सांगतात.

4) सहकार्याची भावना ठेवा व्यक्तीवादाची नव्हे Co Operation Not Individualism :
टेलोर आपणास यात सांगतात की मँनेजर आणि वर्करने एकमेकांसोबत मिळुन मिसळुन कोणतेही काम करायला हवे,

आपापसात सहकार्याची भावना ठेवायला हवी एकटे कोणतेही काम करू नये.

म्हणजे समजा मँनेजर वर्कसला एखादे काम देत असेल तर मँनेजरने वर्करशी बोलुन घ्यायला हवे की हे काम तुम्ही करू शकाल का?यात तुम्ही एक्सपर्ट आहात का?

आणि जर वर्कर नही म्हणत असेल तर त्याच्या एक्सपर्टीजनुसार मँनेजरने त्याला दुसरे काम देण्याची तयारी ठेवायला हवी.याने वर्कर आणि मँनेजर यांच्यात कुठलाही वादविवाद देखील होत नाही आपापसात प्रेम आणि सहकार्याचे नाते तयार होते आणि कंपनीला त्या कामात आऊटपुट देखील चांगला येत असतो.

5) प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या उत्कृष्ठ कार्यक्षमतेनुसार विकास (Development Of Every Person To His Greatest Efficiency And Prosperity)

यात टेलोर आपणास सांगतात की वर्कसची डेव्हलमेंट होणे खुप गरजेचे आहे.कारण मँनेजरने वर्कसमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणली नाही तर तो त्या कंपनीत अजिबात थांबणार नाही.

म्हणजेच वर्कसला असे काम मिळायला हवे ज्यात त्याला काही शिकायला मिळेल,त्याच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने ते काम करून त्याला काहीतरी फायदा प्राप्त होईल

कारण जर त्याला तुम्ही जर एक असे काम दिले ज्यात तो फक्त कामच करतो आहे आणि ते काम करून त्याला भविष्याच्या दृष्टीने कुठला फायदा होत नाहीये तसेच ते काम करून त्याला काही नवीन स्कील देखील शिकायला मिळत नाहीये तर अशा परिस्थितीत तो वर्कर कंटाळुन ते काम सोडुन देईल.

म्हणून फेयोल सांगतात की तुम्हाला जर वर्कसला दिर्घकाळासाठी आपल्या कंपनीत ठेवायचे असेल तर तुम्हाला त्याच्या प्रगतीचा विचार करावा लागेल त्याला आपल्या कंपनीत नवनवीन स्कील, कौशल्य शिकायला मिळतील याची काळजी घ्यावी लागेल.नवनवीन जबाबदारी त्याच्यावर टाकावी लागेल जेणेकरून वर्कसला वाटेल की इथे काम करून आपल्याला आपल्या भविष्याच्या दृष्टीने,करिअरच्या दृष्टीने काही तरी फायदा होतो आहे.

वरील सर्व सिदधांतामधुन टेलोर आपल्याला हेच सांगतात की आपण Science चा Practical Application चा वापर आणि त्यानूसारच कोणतेही काम करा अंदाधुदपदधतीने कुठलेही काम करू नका.

See also  पी ओव्ही चा फुलफाँर्म काय होतो?- Full Form Of POV In Marathi

Taylor’s च्या Management विषयीच्या Scientific Techniques किती आणि कोणकोणत्या आहेत?
टेलोरने आपल्याला Management विषयीच्या काही Scientific Technique सुदधा सांगितल्या आहेत ज्याचे पालन करून आपण आपले काम व्यवस्थित करू शकतो.

 

 

हेनरी फायोल यांची व्यवस्थापनाची 14 तत्वे (PDF)- Henri Fayol 14 Principles of Management

Taylor’s च्या Management विषयीच्या Scientific Techniques पुढीलप्रमाणे आहेत :

1)Functional Formation :

या टेक्निकमध्ये टेलोरने Organization ला दोन डिपार्टमेंटमध्ये विभाजित केले आहे.

1)Planning :
2) Operational :

टेलर आपणास सांगतात की एका Organization ला दोन तुकडयांमध्ये विभाजित करा ज्यात एक तुकडा Planning असेल आणि दुसरा Operational

टेलर सांगतात की Planning Department मध्ये चार व्यक्ती हेड असतील आणि त्यांच्या खाली कामाला वर्कस असतील.

  1. यात पहिला असेल Root Clerk जो हे ठरवत जाईल की आपल्याला कोणते काम कुठल्याही पदधतीने करायचे आहे.
  2. दुसरा असेल Instruction Guard Clerk जो जनरल इंस्ट्रक्शन देण्याचे काम करेल की कशा पदधतीने वर्कसला काम करायचे आहे.
  3. तिसरा असेल Time And Cost Clerk जो हे ठरवेल की कोणते काम पुर्ण करायला किती कालावधी लागणार आहे?ते काम करण्यात किती खर्च होणार आहे?
  4. चौथा असेल Discipline जो हे बघत जाईल की सर्व काम प्राँपर पदधतीने आणि डिसीप्लीनमध्ये होते आहे का नाही.

हे सर्व In Office काम करतील.कारण यांचे काम Planning Department मध्ये आहे.

आता आपण Operational Department मधील चार हेडविषयी जाणुन घेऊ.

  1. Gang Boss

    The Principles of Scientific Management Frederick Winslow Taylor Amazon.in Books
    The Principles of Scientific Management Paperback – 1 January 2006
  2. Speed Boss

  3. Repair Boss 

  4. Inspector :

1)Gang Boss : हा पुर्ण टिमवरचा बाँस असतो.

2) Speed Boss : कंपनीतील सर्व काम वेळेत आणि जलदगतीने पुर्ण होत आहे का नाही हे स्पीड बाँस बघेल.

3) Repair Boss : एखाद्या मशिनमध्ये काही फाँल्ट आहे का हे रिपेअर बाँस बघेल आणि काही फाँल्ट असेल तर तो दुरूस्त देखील करेल.
4) Inspector :सर्व काम प्राँपर पदधतीने प्राँपर मार्गाने होते आहे का नाही बघायचे काम Inspector चे असेल.

हे सर्व Operational Field मध्ये करतील.कारण यांचे काम Operational Department मध्ये आहे.

2) Standardization And Simplification In Work :

यात टेलोर सांगतात Standard Maintain करा.म्हणजेच चांगल्या काँलिटीसोबत एक टाईम लिमिट मेंटेन करणे.

ज्यात दिलेले असेली की एवढी Price असायला हवी,एवढी Cost असायला हवी,आणि अशा Standard चे प्रोडक्ट असायला हवे आणि त्यासाठी अशा पदधतीने काम व्हायला हवे.यालाच Standardization Of Work म्हणतात.

म्हणजेच यात टेलोर सांगतात कुठल्याही कामाचे एक प्राँपर स्टँडर्ड मेंटेन करा आणि मग ते पुर्ण करा.कारण कुठलेही ध्येय न ठरवता जर आपण काम करत राहिलो तर कामातुन रिझल्ट येतो आहे किंवा नाही हे आपल्याला कळणारच नाही.

याच सोबत टेलोर आपल्याला हे देखील सांगतात की कुठल्याही कामाला आधी Simplify करा.जर कुठल्याही कामातुन Diversification मुळे आपल्याला लाँस होत असेल तर आपण आधी ते काम Simplify करून घ्यायला हवे.

म्हणजेच आपण आपल्या कामाला पाहिजे तितके सोप्पे बनवायला हवे.म्हणजेच Product मध्ये जास्त व्हरायटी आणण्यापेक्षा आपण काही मोजक्याच प्रोडक्ट मध्ये एक स्टँन्डर्ड मेंटेन करायला हवे.

कारण आपला 80 टक्के रिझल्ट हा आपल्या 20 टक्के कामातुनच येत असतो.सर्व कामातुन येत नसतो.

म्हणुन टेलोर आपल्याला सांगतात की जेवढे होईल तेवढे आपले काम Standardize आणि Simplify करा.

3) Methods Study :

कोणत्या पदधतीने टेक्निकने आपल्याला काम करायचे आहे हे ठरवायला टेलोर आपल्याला सांगतात.

यात आपण आपल्या ईच्छेने कुठलीही मेथड सिलेक्ट करू नये सर्व Alternative बघुन घ्यावे.आणि त्यात जी मेथड आपल्याला बेस्ट वाटेल ज्यात काँस्ट कमी आहे आणि काँलिटी जास्त आहे अशी मेथड आपण सिलेक्ट करावी असे टेलोर आपल्याला सांगतात.

4) Fatigue Study :

यात आपल्याला तीन गोष्टी सिलेक्ट करायच्या असतात.किती Rest Interval द्यायचा? किती कालावधीचा Rest Interval द्यायचा? आणि किती कालावधीनंतर Rest Interval मिळेल?

म्हणजेच आपल्याला किती विश्रांती मिळेल किती तासांची विश्रांती मिळेल?आणि किती कालावधीनंतर विश्रांती मिळेल?

यात टेलोर आपल्याला सांगतात की आपण आपल्या ईच्छेनुसार वर्कसला विश्रांती देऊ शकत नाही.आपल्याला हे बघावे लागेल की काम करत असताना कोणत्या वेळेला तो वर्कर थकुन जात असतो तिथे आपण त्याला Rest Interval द्यायला हवा.आणि त्याला Recover करण्यासाठी संधी द्यायला हवी.

कारण समजा आपण एखाद्या मजदुराला बोललो की तुला दिवसभरात फक्त एकच वेळा विश्रांती दिली आणि ती सुदधा दहा मिनिटाची तर तो मजदुर ते काम व्यवस्थित करूच शकणार नाही.

कारण त्याला माहीत आहे काम करताना पायरींवरून आपणास चढ उतार करायची आहे जिथे त्याला थकवा देखील लागणार आहे.म्हणजेच अर्धा तासात पायरीवरून चढ उतार करून त्याची सर्व एनर्जी डाऊन होत जात असते.

आणि अशा परिस्थितीत देखील आपण त्याच्याकडुन लागोपाठ विश्रांती न देता काम करून घेतले तर तो लवकर थकेल आणि बाकीचे काम व्यवस्थित करू शकणार नाही.

म्हणुन आपण कुठल्या वर्करला किती Rest Interval द्यायचा? किती कालावधीचा Rest Interval द्यायचा? आणि किती कालावधीनंतर Rest Interval द्यायचा?
हे त्या वर्करचे काम कशा पदधतीचे आहे हे बघुन ठरवायला हवे असे टेलोर आपल्याला सांगतात.

5) Motion Study :

टेलोर आपल्याला सांगतात की आपण आपल्या कामातुन अशा अनावश्यक Motions ला काढुन टाकायला हवे जे आपल्याला आपल्या कामात Productivity देत नाही आहे.तसेच ज्याच्यापासुन आपल्याला काही Output देखील मिळत नाहीये.

म्हणजे समजा तुम्ही कंपनीचे 50 प्रोडक्ट विकता आहे पण त्या पन्नास प्रोडक्टमध्ये फक्त दहा प्रोडक्टमधुनच तुमच्या कंपनीला उत्तम प्राँफिट मिळतो आहे तर तुम्ही त्या बाकीच्या चाळीस प्रोडक्ट वर वेळ आणि पैसा खर्च करणे सोडुन ज्या दहा प्रोडक्टला कस्टरची अधिक पसंती मिळती आहे त्यावर अधिक फोकस करायला हवे.

6) Differential Peace Wedge System :

टेलोर सांगतात की प्रत्येक कर्मचारीला कंपनीने सारखे वेतन देऊ नये.प्रत्येक कर्मचारीला त्याच्या कामातील Productivity आणि Expertise नुसार वेतन द्यायला हवे.

म्हणजे कर्मचारी किती काम करतो आहे त्याच्यापासुन कंपनीच्या Growth साठी किती इन्पुट दिला जातो आहे आणि त्यातुन कंपनीला काय Output प्राप्त होतो आहे हे बघुन त्या कर्मचारीची त्याच्या कामातील योग्यतेनुसार सँलरी कंपनीने ठरवुन द्यायला हवी.

हेनरी फायोल यांची व्यवस्थापनाची 14 तत्वे (PDF)- Henri Fayol 14 Principles of Management