गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना २०२३ विषयी माहिती – Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना २०२३ विषयी माहिती – Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना का राबविली जात आहे?

महाराष्ट्र राज्यामधल्या जमिनीच्या सुपीकते मध्ये वाढ व्हावी,धरणांमध्ये तसेच जमिनीमध्ये साचलेला गाळ काढला जाऊन जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून म्हणून गाळमुक्त धरण तसेच गाळमुक्त ही योजना राबविण्यात येते आहे.

महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय घेतला आहे ज्यात ही योजना नव्याने आरंभ केली जाईल असे दिले आहे.

याअगोदर देखील ह्या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करण्यात आली होती पण आता ह्या योजनेला एक नवीन मान्यता दिली जात आहे ज्यामुळे आता ही योजना पुढच्या तीन वर्षांत देखील राबविली जाणार आहे.

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार हया योजनेस कधी अणि केव्हा मंजुरी देण्यात आली?

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ह्या योजनेस ६ मे २०१७ रोजी मंजुरी देण्यात आली होती.२०१७ मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना २०२१ सालापर्यत चालवली गेली होती.
पण आता ह्या योजनेची मुदत संपुष्टात आली आहे

म्हणुन २०२३ पासुन नवीन जिआर नुसार पुढील तीन वर्षांत नव्याने ही योजना राबविण्यात येईल असा एक शासन निर्णय १६ जानेवारी २०१३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचे स्वरूप काय आहे?

गाळ मुक्त धरण गाळमुक्त शिवार ही मृदा अणि जल
संधारण विभागाच्या वतीने राबवली जात असलेली प्रमुख योजना आहे.

See also  क्रिमिनोलॉजी करिअर संधी – Criminology is a career Marathi

गाळमुक्त धरण तसेच गाळमुक्त शिवार ह्या योजनेच्या मार्फत राज्यातील शेतकरी बांधवांना आपल्या जवळच्या धरणातील गाळ काढुन आपल्याच शेतात मोफत रीत्या टाकले जाण्याची सुविधा प्रदान केली जात आहे.

गाळ मुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील धरणांत अधिक प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरणांमध्ये जी पाणी साठवण्याची क्षमता होती ती कमी होते आहे.

गाळयामध्ये तसेच धरणांमध्ये शेतकरयांना जास्त पाणी साठवता येऊ नही राहीले.ज्याचे परिणाम स्वरुप धरणे कोरडी पडु लागली आहेत.

म्हणुनच यावर उपाय म्हणून धरणांमध्ये साठवलेला गाळ काढला जातो आहे.अणि हा काढलेला सर्व गाळ शेतात टाकला जाणार आहे याने जमिनीच्या सुपीकते मध्ये वाढ होईल अणि धरणांच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.

अणि असे झाल्यास शेतकरींचे शेतीमधील उत्पन्न सुदधा अधिक प्रमाणात वाढणार आहे.अणि शेतकरी वर्गाचे दारीद्रय नष्ट होणार आहे.

शासनाची अशी अनेक उद्दिष्ट ही योजना राबविण्यामागे आपणास दिसून येत आहे.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या योजनेत गाळ उपसण्यासाठी जो खर्च येणार आहे तो संपुर्ण खर्च शासनाकडुन केला जाणार आहे.

पण ह्या योजनेअंतर्गत फक्त धरण अणि तलाव या दोघे ठिकाणचा गाळ उपसला जाणार आहे कुठल्याही प्रकारचे वाळु उत्खनन केले जाणार नाहीये.

गाळ मुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा अणि कोठे करायचा आहे?

गाळ मुक्त धरण गाळमुक्त शिवार ह्या योजनेचा लाभ प्राप्त व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार ह्या आॅनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे.किंवा शेतकरी ह्या योजनेसाठी आॅफलाईन पदधतीने सुदधा अर्ज करू शकतात.

आॅफलाईन अर्ज करणारया शेतकरींना आपल्या तालुक्यातील तहसिलदार यांचेकडे तहसिल कार्यालयात आॅफलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.

गाळ मुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचे शेतकरींना होणारे महत्वाचे लाभ कोणकोणते आहेत?

● शेतकरयांच्या धरण तसेच तलावा मधल्या जलसाठ्यात अधिक प्रमाणात वाढ होणार आहे.

See also  NCERT आणि CBSE  अभ्यासक्रम - What is the difference between CBSE and NCERT syllabus?

● जर धरणातील जलसाठा वाढला तर शेतकरींना आपल्या पिकांच्या वाढीकरीता आवश्यक आहे तेवढे पाणी उपलब्ध होणार आहे.

● नापिक जमिनीमध्ये धरणामधील सुपीक गाळ टाकला गेल्यास जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत होईल.

● जमिनीची सुपीकता वाढल्यास शेतकरींचे उत्पन्न देखील अधिक प्रमाणात वाढणार.त्यांचे दारिद्र्य दुर होणार.

● जनावरांना आवश्यक तेवढा चारा तसेच पाणी मिळेल अणि जनावरांच्या चारा पाणीचा जो अतिरीक्त खर्च शेतकरींना करावा लागतो तो शेतकरी वर्गाचा खर्च कमी होईल.

Leave a Comment