हिट स्ट्रोक म्हणजे काय?हिट स्ट्रोक का होतो?
हिट स्ट्रोक सन स्ट्रोक यालाच आपण उष्माघात किंवा सुर्यघात असे देखील म्हणु शकतो.
ही एक अशी जीवघेणी अवस्था आहे.यात प्रखर तापमानास जेव्हा आपण सामोरे जातो तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता संतुलन संस्था अपयशी ठरते.
हिट वेव्ह कशाला म्हणतात?
उष्णतेच्या लाटांना झळांना हिट वेव्ह असे म्हटले जाते.
हिट स्ट्रोक होण्याची कारणे तसेच परिणाम
वातावरणातील जास्त तापमान मानवी शरीर सहन करू शकत नसेल तेव्हा उष्माघात होत असतो.वातावरणात असलेल्या जास्त तापमानामुळे शरीरातील महत्वाचे अवयव देखील निकामी होण्याची शक्यता असते.उष्माघात हा उष्णतेमुळे घडुन येत असतो.
अतिकाम अति व्यायाम केल्याने जास्त जड काम केल्याने तसेच प्रमाणबद्ध तरल पदार्थांचे सेवन न केल्याने उष्माघात होत असतो.
अनेक दिवस कडाक्याच्या उन्हात काम केल्यास उष्मापात होतो त्यातुनच उषमाघाताची समस्या निर्माण होते.जेव्हा आपले शरीर प्रमाणापेक्षा जास्त उष्णता शोषून घेते तेव्हा हायपर थरमिया हा अतिउच्च तापमानाचा आजार आपणास जडत असतो.अणि उष्माघात देखील याचाच एक प्रकार आहे.
यात शरीराच्या बाहेरील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा कोलमडु लागते.
यात अतिउष्णतेमुळे आपल्या शरीरातील प्रोटीन्स वर दुष्परिणाम होऊ लागतो पेंशीमधील जीवन प्रक्रिया देखील थांबु लागते.
मानवी शरीरातील सर्व अवयवांच्या पेशींवर हा परिणाम घडुन येत असतो.यात उष्माघातामुळे मेंदुला सुज येऊन व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
मानवी शरीरातील मेंदुचे तापमान अचानक अतिउच्च पातळीवर गेल्याने तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने व्यक्तीच्या मेंदुला गंभीर इजा पोहोचते यात तो कोमात जाऊ शकतो किंवा उष्मा घाताने दगावण्याची देखील शक्यता असते.
हिट स्ट्रोक कोणाला होऊ शकतो?
उष्माघात हा कोणाला पण होऊ शकतो पण जास्तीत जास्त करून उष्माघात हा उन्हात खेळणारी लहान मुले, पाण्याचे कमी सेवन करणारे व्यक्ती,वृद्ध व्यक्ती,दारू पिणारा व्यक्ती,प्रखर उन्हात अणि गर्मित काम करत असतात दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तींना हा होत असतो.
याचसोबत ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर,डायबिटीस,हदयाशी संबंधित फुप्फुसांशी संबंधित आजार असणारे लोक,मुत्रपिंडाचा लठ्ठपणाचा आजार असणारे व्यक्ती देखील उष्माघाताचा बळी ठरू शकतात.
हिट स्ट्रोकची प्रमुख लक्षणे-
हिट स्ट्रोकचे पहिले लक्षण असते प्रमाणाच्या बाहेर वाढलेले आपल्या शरीराचे तापमान हे असते.
याचसोबत मानसिक बदल भ्रम कोमा
हिट स्ट्रोक मध्ये घाम बाहेर पडत नसल्याने आपली शरीराची
त्वचा कोरडी किंवा गरम पडत असते काहीवेळा उष्माघात ताणतणावामुळे घडुन येत असेल तेव्हा त्वचा नरम देखील पडत असते.
चक्कर येऊ लागणे
- मळमळ किंवा उलटी होणे
- थकवा जाणवणे
- दरदरून अंगाला घाम फुटणे किंवा घाम न येणे
- श्वसाचा वेग वाढणे
- नाडीचा वेग वाढणे
- हात पातात आकडी येऊ लागतात
- चिडचिड करू लागणे
बेशुदधावस्थेत जाणे
हिट स्ट्रोकवर करावयाचे प्रथमोपचार-
- सर्वप्रथम आपणास त्या व्यक्तीला सुर्यापासुन दुर एखाद्या झाडाखाली सावलीच्या ठिकाणी घेऊन जाणे आवश्यक आहे.
- व्यक्तीला खाली झोपवून त्याचे हातपाय सरळ करायचे.
- त्याच्या अंगातील कपडे ढिल्ले सैल करावीत किंवा काढुन घ्यायची आहे.
- सदर व्यक्तीस थंड पाणी प्यायला देणे
- त्या व्यक्तीचे सर्व अंग शरीर थंड पाण्याच्या बोळयाने पुसुन काढायला हवे.किंवा त्याला कुलर पंख्याखाली बसवले तरी चालेल.सदर व्यक्तीची काळजी घ्यायला एक व्यक्ती जवळ असणे आवश्यक आहे.
- जर त्या व्यक्तीला १०२ फॅरेनाईट पेक्षा अधिक ताप आढळून आला तसेच बेशुद्ध भ्रम आक्रमकता अशी लक्षणे त्याच्यात दिसून येत असल्यास ताबडतोब मेडिकल सेवेचा लाभ घ्यायला हवा.
उष्माघातापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यायची आहे?
- भर कडक उन्हात म्हणजे दुपारी १० ते ४ वाजेच्या दरम्यानच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळावे.लहान मुलांना देखील ह्या वेळेत उन्हाळ्यात खेळायला जाऊ देऊ नये.
- मटन,मासे,शिळे अन्न तेलगट पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
- चहा काॅफी दारू तसेच साॅपट ड्रिंक ही साखर अलकोहोलयुक्त पदार्थ पेये घेणे टाळायला हवे.याने आपल्या शरीरातील पाणी कमी होत असते.
- भर उन्हातुन घरात आल्यावर लगेच फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे.
- दिवसभरात पुरेशा पाण्याचे सेवन करणे अत्यावश्यक आहे.
- सौम्य रंगाचे खादीचे सैल कपडे उन्हाळ्यात वापरावे.जिन्स वगैरे सारखे टाईट कपडे परिधान करणे टाळावे.
- घराबाहेर पडताना उषणतेचा डोळयांना शरीराला त्रास होऊ नये म्हणून गाॅगल टोपी रूमाल किंवा छत्री सोबत ठेवावी.प्रवासादरम्यान नेहमी पाणी जवळ ठेवावे.
- शरीरात अशक्तपणा जाणवत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- ओआर एस,लिंबु पाणी,दही ताज्या ताक फळांचा रस अशा शरीरात थंडावा निर्माण करणारया पदार्थांचे सेवन करायला हवे.
- आपले घर देखील थंड राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी रात्री घराच्या खिडक्या उघड्या करून झोपायला हवे.
- जेवण करताना आहारात लिंबु कलिंगड संत्री काकडी अशा अन्न पदार्थांचा ताटात समावेश करावा.