हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय? | Hindu Growth Rate Meaning In Marathi

हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय? | Hindu Growth Rate Meaning In Marathi

Hindu Growth Rate Meaning In Marathi

रघुराम राजन जे भारतीय रिझर्व्ह बॅकेचे माजी गर्व्हनर होते त्यांनी हिंदु ग्रोथ रेट कडे आपला इशारा देताना एक वक्तव्य केले आहे.

ज्यात ते म्हणाले की दिवसेंदिवस मंदावत चाललेला जागतिक विकास दर,वाढत असलेले उच्च प्रतीचे व्याजदर अणि प्रायव्हेट सेक्टर मधील होत असलेली कमी इनव्हेस्टमेंट यामुळे आपला भारत देश पुन्हा एकदा हिंदु ग्रोथ रेटच्या जवळ जाताना दिसून येत आहे.

रघुराम राजन यांचे असे म्हणने आहे की एन एस ओने मागील महिन्यात जो राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज सांगितला आहे.त्यात तिमाही वाढीमध्ये वाढ न होता दिवसेंदिवस अधिक घट होताना दिसुन येत आहे.अणि ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे.

आर्थिक आकडेवारी मध्ये सांगितल्यानुसार,चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन(Gross Domestic Product)

म्हणजेच भारत देशाचा जीडीपी हा दुसऱ्या तिमाहीमध्ये ६.३% टक्के आणि पहिल्या तिमाहीमध्ये १३.२% टक्के वरून ४.४ टक्क्यांवर घसरला आहे अणि गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये हाच विकास दर ५.२ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

रघुराम राजन यांचे हे वक्तव्य ऐकुन खुप जणांच्या मनात अशी शंका तसेच गैरसमज निर्माण झाला आहे की हा शब्द हिंदु धर्माच्या विकास दराशी वृदधीशी धर्मशास्त्राशी निगडीत शब्द आहे.

खुप जणांना असेही वाटले असेल की हिंदु धर्मातील वृदधी दर कमी झाला आहे.

पण असे काहीही नाहीये हिंदु ग्रोथ रेट याचा आपल्या हिंदु धर्माशी किंवा धर्मशास्त्र यांच्या सोबत कुठलाही संबंध नाहीये.याचा संबंध अर्थशास्त्राशी आहे.हा शब्द अर्थशास्त्राशी भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत शब्द आहे.

आजच्या लेखात आपण हिंदु ग्रोथ रेट म्हणजे नेमके काय आहे ह्या संकल्पनेविषयी सविस्तरपणे आढावा घेणार आहोत अणि याचा भारतीय अर्थशास्त्राशी असलेला संबंध देखील समजुन घेणार आहे.

ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर 

हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय?

जेव्हा आपल्या भारत देशाला स्वतंत्र प्राप्त झाले तेव्हा आपल्या भारत देशाची आर्थिक स्थिती फार मागासलेली अणि गरीबीची होती.गरीबीमुळे देशामध्ये कुठलेही साधन सुविधा पर्याप्त स्वरूपात उपलब्ध नसायचे.

अशा पद्धतीने १९५१ ते १९८० या कालावधी दरम्यान आपल्या भारत देशाचा विकास दर सलग तीन शतके मंदगतीमध्ये होता.

तेव्हा आपल्या भारत देशातील विकासाचा दर हा चार टक्यांच्या देखील खाली होता.हयाच विकास दराला हिंदु ग्रोथ रेट असे म्हटले गेले.

देशाच्या विकास दरात होत असलेल्या ह्या संथ अणि मंद गतीच्या वाढीस हिंदु ग्रोथ रेट असे नाव राजा कृष्णा यांनी दिले होते.भारत देशाच्या विकास दरासाठी हिंदु ग्रोथ रेट हा शब्द त्यांनी १९७८ मध्ये सगळ्यात पहिले वापरला होता.

पुढे जाऊन १९९१ मध्ये आर्थिक सुधारणा अणि उदारीकरणास प्रारंभ झाला त्यानंतर देशाचा हिंदु ग्रोथ रेट हा जोरात वाढला.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर रघुराम राजन यांनी ज्या हिंदु ग्रोथ रेटचा उल्लेख केला आहे हा शब्द त्यांनी देशाचा विकास दर भारत देशातील जुन्या कमी सरासरी असलेल्या विकास दराकडे पुन्हा जात आहे याविषयी सुचित करण्यासाठी वापरला होता.