लहान मुलांसोबत घरात इंग्रजी मध्ये कसे बोलायचे? How To Speak English With Kids In Marathi
सध्याच्या माॅडन कल्चर मध्ये सर्व पालक आपल्या मुलांना मराठी माध्ययमातील शाळेत शिक्षणासाठी न टाकता इंग्लिश मेडियम मध्ये शिकायला टाकत असतात.
कारण प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाने मुलीने माझ्या इतर सहकारी नातलग यांच्या मुलांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलावे.आपल्या पाल्याचे इंग्रजी देखील पक्के असावे.
पण बरीच मुले शाळेत असल्यावर टिचर्स समोर थोडफार इंग्रजी मध्ये बोलतात.पण शाळेतुन घरी आल्यावर पुन्हा मराठीत बोलायला लागतात.
पालकांचे असे म्हणने असते की आपले पाल्य जर इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेत आहे तर त्याने घरात देखील इंग्रजी मध्ये बोलायला हवे.
आपल्याला देखील हीच समस्या असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात
कारण आजच्या लेखात आपण आपल्या मुलांना घरात देखील इंग्रजी मध्ये बोलायला लावण्यासाठी इंग्रजी मध्ये बोलण्याची सवय लावण्यासाठी काही छोटीछोटी वाक्ये बघणार आहोत.
ही वाक्ये आपण दैनंदिन जीवनात रोज येता जाता वावरत असताना आपण आपल्या मुलांकडुन बोलुन घ्यायची आहे.दैनंदिन जीवनात रोज आपली मुले जी काही कृती कार्य करतात खेळतात बागडतात.
जे काही वाक्य मराठीत बोलतात त्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात हे त्यांना समजावून सांगायचे आहे.अणि तेच वाक्य इंग्रजी मध्ये बोलायला लावायचे आहे.
जेणेकरून त्यांना रोज इंग्रजी मध्ये संभाषण करण्याची संवाद साधण्याची सवय होईल.अणि आपला मुलगा/मुलगी देखील आपल्या इतर नातलग सहकारी वर्गाच्या मुलांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलु लागेल.
उदा,म्हणजे समजा आपण आपल्या मुलांना इकडे ये असे म्हणत असाल तर अशावेळी इकडे ये असे न म्हणता Come Here असे म्हणायचे आहे अणि त्यांना देखील सांगायचे आहे की आपण एखाद्या व्यक्तीला इकडे ये असे म्हणतो याचा अर्थ इंग्रजी मध्ये Come Here असा होतो.
जेणेकरून पुढच्या वेळी आपण त्यांना Come Here असे म्हटले तर त्यांना लगेच कळेल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो.
आज आपण दैनंदिन जीवनातील रोज वापरात येणारी अशीच काही मराठी वाक्ये बघणार आहोत जी इंग्रजी मध्ये आपण आपल्या मुलांना रोज बोलायला शिकवु शकतो.
1)Come Here -इकडे ये
जेव्हा मुलांना बोलवायचे असेल तेव्हा Come Here असे म्हणायचे आहे अणि आपण जे त्याला कम हिअर बोललो याचा मराठीत अर्थ काय होतो त्यांना हे सुद्धा समजावून सांगायचे आहे.
2) Take This -हे घे
जेव्हा मुलांना एखादी वस्तू हातातुन घे असे म्हणायचे असेल तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत न बोलता इंग्रजीत Take This असे बोलायचे आहे.
अणि याचा इंग्रजी मध्ये काय अर्थ होतो हे देखील त्यांना लगेच समजावून सांगायचे आहे.
3) Get Up-उठ
जेव्हा मुलांना सकाळी झोपेतून उठवायचे असेल तेव्हा Get Up असे म्हणायचे आहे.अणि गेट अप याचा काय अर्थ होतो हे त्यांना समजावून सांगायचे आहे.
रोज मुलांकडुन बोलुन घेता येतील अशीच काही इतर वाक्ये –
१)Wake Up -जागा हो
२) Stand Up – उभा राहा
३) Sit Down – खाली बस
४) keep quite -शांत रह
५) Take Bath -अंघोळ कर
६) Give Me -मला दे
७) Look Here – इकडे बघ
८) Well Done – शाब्बास (मुलांनी एखादे चांगले काम केले आपला रोजचा अभ्यास गृहपाठ पुर्ण केला तेव्हा आपण त्यांना वेलडन असे म्हणत शाबासकी द्यावी.अणि याचा अर्थ शाब्बास असा होतो हे त्यांना समजावून सांगायचे.
९) Do It -ते कर
१०) Right Now – आत्ता लगेच
११) Do It Fast -हे लवकर कर
१२) Listen To Me – माझे ऐक
१३) Look At Me – माझ्याकडे बघ
१४) Show Me – मला दाखव
१५) Speak Loudly – जोरात बोल
१६) Keep Quiet – शांत राहा
१७) Speak Slowly – हळु बोल
१८) Go And Study – जा अणि अभ्यास कर
१९) Don’t Shout – ओरडु नकोस
२०) Move Aside – बाजुला हो तिकडे सरक
२१) Move A Bit – थोड तिकडे सरक
२२) Dont Cry – रडु नकोस
२३) Dont Fight – भांडण करू नका
२४) Dont Jump – उडया मारू नकोस
२५) You Will Fall Down – खाली पडशील
२६) Tell Me – मला सांग
२७) Go To Bed – झोपी जा
२८) Come To Me -माझ्या जवळ ये
२९) Come To My Lap – माझ्या मांडीवर ये
३०) Clean It – हे साफ कर
३१) Throw It Away – हे फेकुन दे
३२) Take A Bite – एक घास घे
३३) Take A Sip – एक घोट पी
३४) Repeat It – हे परत कर हे पुन्हा म्हण
३५) Repeat After Me – माझ्या पाठीमागे म्हण
३६) Stand Stil- सरळ उभा राहा
३७) Give Me A Water – मला पाणी दे
३८) Dont Move -हलु नकोस
३९) Hold It – हे पकड
४०) Get Ready – तयार हो
४१) What Is This – हे काय आहे?
४२) Stop There – तिथेच थांब
४३) Don’t Go Out – बाहेर जाऊ नको
४४) What Is This Called – याला काय म्हणतात
४५) Eat It – हे खा