Hydroponics – हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान -चारा

माती चा वापर न करता  फक्त पाण्याचा वापर करून पिकांचे उत्पादन घेणे म्हणजे हायड्रोपोनिक्स-Hydroponics तंत्रज्ञान होय.

प्रतिकूल वातावरणमुळे जनावरांना वर्षभर चांगला चारा उपलब्ध करून देणे ही समस्या ठरू लागली आहे. पण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्‍य आहे.

पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. मुळात या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी बचत होते. हायड्रोपोनिक्स या तंत्रज्ञानात मातीशिवाय बियाण्याला योग्य तेवढी आर्द्रता, पाणी व पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य पुरवून पिकाची वाढ केली जाते.

कमीत कमी पाण्यामध्ये व कमीत कमी क्षेत्रावर नियंत्रित वातावरणात मका, गहू या बियाण्यापासून २० ते २५ सें.मी. उंचीचा चारा उत्पादन करणे होय. हा चारा मुळासकट जनावरांना देता येतो.

काही भागात अत्यल्प पर्जन्यमानामुळे हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते . चारा उत्पादनात लक्षणीय घट होते तसेच कमी पावसामुळे पिकाची वाढ खुंटन चाऱ्याची टंचाई निर्माण होत असते .शेडनेटमध्ये ही चारा निर्मिती करता येते.

हायड्रोपोनिक्स-Hydroponics चारा तयार करण्याची पद्धत

  • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका, गहू व बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारानिर्मिती करता येते.
  • परंतु या पद्धतीद्वारे ज्वारीचा उपयोग करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या ताटामध्ये हायड्रोसायनिक अँसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.
  • बियाणे निवडताना, बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे. टपोरे दाणे, किमान ८ टक्के उगवणक्षमता, रोगमुक्त व बुरशीमुक्‍त असावे.
  • तसेच बियाणे कोणतीही बीजप्रक्रिया केलेले नसावे. असे केल्यामुळे जनावरांना होणाऱ्या विषबाधेचा धोका टाळू शकतो.
  • सर्वप्रथम बियाणे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन घ्यावे. त्यानंतर ते बियाणे मोड येण्यासाठी १२ ते २४ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावे.
  • यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या बारदान्यात पुढील४८ तासांसाठी कोंबून ठेवावे. यामुळे बियाण्यास मोड येण्यास सुरुवात होते. वातावरणाच्या अंदाजानुसार बारदान्यावर सकाळ व संध्याकाळी पाणी शिंपहून ते सतत ओलसर ठेवावे.
  • कोंब फुटण्यास सुरुवात झालेल्या बियाण्यावर ५ टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. यामुळे ओलसर असलेल्या वातावरणात वाढणाऱ्या बुरशीची वाढ होत नाही. बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करता येईल.
  • यानंतर २x १.५ x २ इंच या आकाराचे ट्रे घ्यावेत. ट्रे स्वच्छ पाण्यात धुऊन चांगले वाळवून घ्यावेत. पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य १ कि.ग्रॅ. प्रति ट्रे मध्ये याप्रमाणे पसरवून द्यावे व असे ट्रे शेडमध्ये लाकडाच्या किंवा बांबूच्या ताट्यांवर ठेवावेत
  • शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रोस्प्रिकलरचा वापर करता येतो. फॉगर्सचा वापर केल्यास दिवसातून ७ वेळेस २ तासाच्या अंतराने प्रत्येक वेळेस ५ मिनिटे याप्रमाणे पाणी द्यावे. पूर्ण २४ तास फॉगर्सचा उपयोग केल्यास वीजपंपाला टायमरचा वापर करावा.
  • अशा पद्धतीने ११ ते १२ दिवसात २० ते २५ सें.मी, उंचीचा हिरवा चारा तयार होतो. त्यातून जवळपास १० ते १२ कि.ग्रॅ. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति ट्रे घेऊ शकतो.
  • दुभत्या जनावरांना १५ ते २० कि.ग्रॅ. चारा प्रति दिवस लागतो व भाकड जनावरांना ६ किलो प्रतिदिवस प्रति जनावर यानुसार आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रेचे नियोजन करावे.
See also   पैसे चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेत ? काय करावे?

हायड्रोपोनिक्स-Hydroponics चाऱ्याचे फायदे

  • कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती करता येते.
  • हायड्रोपोनिक्स या तंत्रज्ञानात पाण्याचा अतिशय कपी वापर होत असल्यामुळे उन्हाळ्यात, पाणी टंचाईत व दुष्काळसदृश परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा पशुपालकांना खूप मोठा आधार होऊ शकत.
  • जनावरांच्या आहारात पशुखाद्याच्या वापराच्या खर्चाचा विचार केला असता, त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो. यामुळे पशुखाद्यावरील सरासरी २५ ते ४० टक्के खर्च कमी करता येऊ शकतो व दुधाच्या प्रमाणात देखील याढ होते.
  • सुरुवातीला ट्रेचा खर्च वगळता यात खूप कमी खर्चात चारा उत्पादित करू शकतो. ३ ते ४ रुपये प्रति कि.ग्रॅ. चारा याप्रमाणे उत्पादन खर्च येतो.
  • दुधाच्या प्रमाणात तसेच फॅटमध्ये वाढ होते.
  • जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ होते.
  • प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडट्स, फॉलिक ऐंसिड, ओमेगा-3,स्निग्ध पदार्थ हरितट्रव्यात मोठ्या प्रमाणात असतात.
  • या पद्धतीद्रारे चारा उत्पादित करताना कोणतेही खत किंवा रसायनांचा वापर होत नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक किंवा जैविक चारा जनावरांस मिळतो.

अधिक माहिती

द्रव्य जैविक खते –