Importance of Liquid Bio-Fertilizers – द्रव्य जिवाणू खते

आपण मागच्या लेखात थोडी काही द्रव्य जिवाणू खत (Liquid Bio-fertilizers) बद्दल माहिती करून घेतली , आपण जाणतो की हयब्रिड  बियाणांच्या वारेमाप  रासायनिक खतांचा आणि पाण्याचा वापर करून अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ केली जात  आहे. ह्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होवून ,अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत  जावून उत्पादनक्षमते वर वाईट परिणाम होत आहे.  

महाग रासायनिक खतांच्या किंमतीमुळे खर्च वाढूनही पिकांचे उत्पादन हवे तेवढे मिळत नाही जमिनीचा पोत खराब होत आहे. अशा परिस्थितीत जिवाणू खताचा वापर हा खूप फायदेशीर ठरणार आहे॰

सध्या शेतकरी सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने द्रवरूप जिवाणू खते वापरणे अधिक फायद्याचे ठरते.

‘जिवाणू खत”  म्हणजे काय ?

प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची स्वतंत्र्यरित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून तयार होणाऱया खताला ‘जिवाणू खत” असे म्हणतात. या जिवाणू खताला जिवाणू संवर्धन, बॅक्टेरिअल कल्चर म्हटले जाते.

द्रवरूप जिवाणू – Liquid Fertilizers- खतांच्या वापराने होणारे फायदे

 • नत्रयुक्त जिवाणू खतांमुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
 • अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून  दिला जातो.
 • सेंद्रिय पदार्थ लवकर  विघटन होते
 • बियाण्याच्या उगवण क्षमता वाढते
 • पिकांची जोमदार वाढ होते तसेच त्याच्या रोगप्रतिकार शक्‍तीतही वाढ होते.
 • धान्य, फुले व फळे याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन होते.
 • जमिनीचा पोत सुधारतो.
 • रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.
 • ही जिवाणू खते नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्याच्या जास्त मात्रेने देखील जमिनीवर किंवा पिकावर दुष्परिणाम होत नाही.
 • द्रवरूप जिवाणू खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास मजुरी खर्चात बचत होते.

जिवाणू खतांचे प्रकार

नत्र स्थिर करणारे – जिवाणू खते

रायझोबियम

या जिवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जिवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीद्वारे हवेतील नत्रवायू (नायट्रोजन) शोषून घेऊन मुळावाटे पिकांस उपलब्ध करून देतात. रायझोबियम जिवाणू खत फक्त शेंगवर्गीय द्विदल पिकासाठीच वापरावे. एकच रायझोबिअम जिवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे गट आहेत.

प्रमाण

 • बीजप्रक्रिया २५ किलो प्रती किलो बियाणे
 • ठिबक सिंचनाद्वारे : २ लीटर प्रती एकर
 • जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणु खत ५० किलो
 • शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे.

अँझोटोबॅक्टर :

हे जिवाणू जमिनीमध्ये पिकाच्या मुळीभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. हे जिवाणू मुख्यत: उदासीन किंवा किंचित विम्ल जमिनीत आढळून येतात. ते हवेतील मुक्‍त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात. हे जीवाणूखत, शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडते.

उदा. वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल इ. साठी तसेच टोमॅटो, वोगी, मिरची, बटाटा, कोबी इ. भाजीपाला पिकासाठी आणि सर्व फळझाडासाठी व फुलझाडासाठीही वापरता येते.

प्रमाण

 • बीजप्रक्रिया : २५ मि.ली. प्रती किलो बियाणे
 • ठिबक सिंचन : २ लीटर प्रती एकर
 • पुनर्लागवड (रोपे बुडविणे) : ५०० मि.ली. प्रती एकर
 • जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणुखत ५० किलो शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे.

 

 अझोस्पिरिलम :

हे जिवाणू पिकांच्या मुळात किंवा मुळाच्या सभोवतालच्या मातीत राहून नत्र स्थिर करतात म्हणून त्यांना नत्रस्थिर करणारे जिवाणू असे म्हणतात. हे जिवाणू अँझोटोबॅक्टर जिवाणूपेक्षा पिकांना जास्त नत्र पुरवितात.

प्रमाण

 • बीजप्रक्रिया : २५ मि.ली. प्रती किलो बियाणे
 • ठिबक सिंचन : २ लीटर प्रती एकर
 • पुनर्लागवड (रोपे बुडविणे) : ५०० मि.ली. प्रती एकर
 • ७ जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणुखत ५० किलो शेणखतात
 • मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे.

अँसीटोबॅक्टर :

हे एक मुक्‍त नत्र स्थिर करणारे जिवाणू ऊस पिकामध्ये मुळाद्वारे प्रवेश करून उसामध्ये नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. या जिवाणूद्रारे कार्यक्षमरित्या ५० टक्के नत्र स्थिरीकरण होऊन ऊस पिकाची चांगली वाढ होते तसेच उत्पादनातही १५ ते २० टक्के वाढ होते.

प्रमाण

 • बेणे प्रक्रिया : १ लीटर प्रती एकर
 • ठिबक सिंचन : २ लीटर प्रती एकर
 • जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणुखत ५० किलो शेणखतात
 • मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे,

 

स्फुरद विरघळविणारे जिवाणू खते

 • उदा. बुरशी – अँस्परजीलस अवमोरी, पेनिसिलीयम डीझीरटेटम, जिवाणू- ब्रॅसिलस पॉलीमिक्झा, प्स्युढोमोनस  स्ट्रियाटा हे जिवाणू पी.एस.बी, या संक्षिप्त नावानेही ओळखले जातात. ज
 • मिनीत स्थिर झालेला स्फुरद विरघळविला जाऊन पिकांना उपलब्ध करून दिला जातो. तसेच वापरलेला स्फुरद कार्यक्षपरीत्या उपयोगात आणला जातो. हे जिवाणू खत सर्व प्रकारच्या पिकांना वापरता येते.

प्रमाण

बीजप्रक्रिया : २५ मि.ली. प्रती किलो बियाणे

 • ठिबक सिंचन ; २ लीटर प्रती एकर
 • पुनर्लागवड (रोपे बुडविणे) : ५०० मि.ली. प्रती एकर जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणुखत ५० किलो शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे,

जिवाणू खते- Liquid Fertilizers वापरण्याच्या पद्धती

 • बीजप्रक्रिया : द्रवरूप जिवाणू संवर्धक पाण्यामध्ये मिसळून बियाण्याला हळुवारपणे लावावे की,
  • सर्व काळजी घूयावी की बियांवर सारख्या प्रमाणात लेप कसेल व
  • क्रियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही किंवा बियाणे ओलसर करून घेऊन संवर्धन सारख्या प्रमाणात लावावे.
  • जिवाणू संवर्धन लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी.
 • रोपाची लावण करताना एक बादली पाण्यामध्ये जिवाणू संवर्धक टाकावे. असे मिश्रण चागले ढवळावे व रोपाची मुळे या मिश्रणात बुडवून लावण करावी. उदा, भात, मिरची, वोगी, टोमॅटो, कोबी,
 • मृदा: काही कारणामुळे जिवाणू खताची बियाण्याला प्रक्रिया करावयाची राहून गेल्यास जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणूखत ५० किलो शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात देता येतात.
 • ठिबक सिंचन : द्रवरूप जिवाणुखत २ लीटर प्रती एकर या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे सर्व प्रकारच्या पिकांना समप्रमाणात देता येतात.

जिवाणू खत वापरताना घ्यावयाची काळजी :

 • द्रवरूप जिवाणू संवर्धकाच्या बाटलीचे सूर्यप्रकाश व उष्णता यापासून संरक्षण करावे, ते नेहमी सावली ठेवावे.
 • जिवाणू संवर्धन लावलेले बियाणे रासायनिक खतात मिसळू नये.
 • बुरशीनाशक किंवा कीटकनाशक लावावयाची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जिवाणू खत लावावे.
 • ठिबक सिंचनाद्रारे द्रवरूप जियाणू संवर्धके रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नयेत.
 • बाटलीवर दिलेल्या अंतिम तारखेच्या आतच त्यांचा वापर करावा, अशाप्रकारे वेगवेगळ्या नत्र स्थिर करणार्‍या, स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंचा वापर शेतीसाठी केला तर कमी खर्चामध्ये जास्तीतजास्त उत्पादन घेता येईल.

1 thought on “Importance of Liquid Bio-Fertilizers – द्रव्य जिवाणू खते”

Leave a Comment