IMEI Number म्हणजे काय   IMEI Number information in Marathi

IMEI नबर माहिती –  IMEI Number information in Marathi

आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलचा एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर असतो ज्याला (International Mobile Equipment Identity)आय एम ई आय असे म्हटले जात असते.

आणि ह्या नंबरचे वैशिष्टय हे असते की प्रत्येकाच्या मोबाईलचा आय एम ई आय क्रमांक हा वेगळा असतो..

 ज्याने आपल्याला जर आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर माहीत असल्यास आय एम ई आय नंबरद्वारे आपण सहज आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तरी देखील ओळखु शकतो.इतका महत्वाचा हा नंबर असतो.

 म्हणुन मोबाईलचा वापर करत असलेल्या आपल्या प्रत्येकाला याच्याविषयी माहीती असणे फार गरजेचे आहे.

 याचसाठी आज आपण आय एम ई आय नंबर काय असतो? त्याचे महत्व काय आहे?या विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

 

IMEI Number म्हणजे काय असतो?IMEI Number information in Marathi

आय एम ई आयचा फुल फाँर्म हा (International Mobile Equipment Identity) असा होत असतो.

सर्वसाधारणपणे कोणत्याही मोबाईलचा आय एम ई आय नंबर हा 15 अंकांचा असतो.

 

  • पण काही वेळा हाच नंबर 16 ते 17 अंकाचा देखील असलेला आपणास पाहायला मिळतो कारण अशा वेळी यात आपण जो मोबाईल खरेदी केला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे,तो कुठे बनवण्यात आला होता इत्यादी सर्व माहीती यात दिलेली असते.
See also  विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी ५ महत्वाच्या टिप्स Personality development tips for students

 

  • आय एम ई आय नंबर हा प्रत्येक मोबाईलचा अलग अलग असतो.म्हणजेच आय एम ई आय नंबर हा प्रत्येक मोबाईलची आपली एक वेगळी ओळख सांगणारा युनिक नंबर असतो.

 

  • आय एम ई आय नंबर द्वारे एखादा मोबाईल सध्या कोणत्या लोकेशनवर आहे आपण हे जाणुन घेऊ शकतो?

 

  • याचसोबत समजा आपला मोबाईल प्रवासादरम्यान अचानक हरवला किंवा चोरीला गेला तर आपण त्याच्या लोकल सर्विस प्रोव्हाईडरशी संपर्क साधून त्या नंबरची सेवा कायमची बंद देखील करू शकतो जेणेकरून त्या मोबाईलचा काही गैरवापर होणार नाही.

 

  • पोलिसांकडुन आय एम ई आय नंबरचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो कारण ह्या नंबरच्या साहाय्याने पोलिस चोरी झालेला मोबाईल ट्रेस करून तो कोणत्या लोकेशनवर आहे हे शोधुन काढत असतात.

 

आय एम ई आय नंबरचे प्रमुख काम काय असते?

 

  • आय एम ई आय नंबरचा वापर करून आपण कुठला मोबाईल सध्या कोणत्या लोकेशन मध्ये आहे हे जाणुन घेऊ शकतो.
  • आय एम ई आय नंबरचा वापर मुख्यकरून पोलिस प्रशासनाकडुन चोरीला गेलेला तसेच हरवलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी केला जात असतो.
  • आय एम ई आय नंबर द्वारे आपण आपला मोबाईल चटकन ओळखु शकतो.कारण हा नंबर प्रत्येक मोबाईलचा युनिक असतो म्हणुन आपल्याला चटकन आपला मोबाईल ओळखता येत असतो.
  • याचसोबत हँकर देखील एखाद्याची लोकेशन ट्रँक करण्यासाठी याचा वापर करत असतात.

 

आपण आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर कसा जाणुन घेऊ शकतो?

  •  कोणत्याही मोबाईमध्ये आय एम ई आय नंबर हा मुख्यकरून त्या मोबाईलच्या बँटरी लावेल असलेल्या ठिकाणाच्या खाली किंवा बाजुला दिलेला असतो.
  • याचसोबत आपल्याला जर आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर अजुन वेगळया पदधतीने जाणुन घ्यायचा असेल तर आपण दोन पदधतीने जाणुन घेऊ शकतो.
  • एक जर आपला मोबाईल जुना असेल तर आपण आपल्या मोबाईलवर *#06# हा नंबर डायल करून आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर आपण जाणुन घेऊ शकतो.
  • याचसोबत आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन System Management वर ओके करायचे असते त्यात पहिल्याच नंबरला आपल्याला About Phone चे आँप्शन दिसुन येत असते.
  • या About Phone आँप्शनवर आपण प्रेस करावे मग त्यात आपल्याला आपल्या मोबाईलचे Model Number,Android Version,Processor,Ram,Phone Storage तसेच खाली IMEI Number देखील दिलेला असतो.
  • गुगल फोन असल्यास इथे आपण IMEI माहिती वाचू शकता
See also  जी सेव्हन शिखर परिषद 2023 महत्वाचे प्रश्न - G7 summit 2023 important questions in Marathi

 

आय एम ई आय नंबर कसा असतो?

  •  आय एम ई आय नंबर हा एकुण 14 ते 15 अंकी नंबर असतो.जो आपल्याला पुर्ण नंबरच्या स्वरूपातच दिला जात असतो.
  • उदा,850949045169178

 आपण आपल्या मोबाईलचा आय एम ई आय नंबर बदलू शकतो का?

  •  आय एम ई आय हा प्रत्येक मोबाईलचा एक युनिक नंबर असतो ज्यात बदल करण्यास कायदेशीर मनाई आहे.पण समजा काही महत्वाच्या कारणामुळे आपल्याला आपला आय एम ई आय नंबर चेंज करायचा असेल तर आपण आपल्या मोबाईलला रूट करून आपला आय एम ई आय नंबर चेंज करू शकतो.
  • रूट करण्यासाठी आपल्याला किंगरूट सारख्या अँपचा उपयोग होऊ शकतो.फक्त एक गोष्ट लक्षात असु द्यावी की रूट करण्याआधी आपल्याला काही महत्वाची कायदेशीर कारवाई देखील पुर्ण करणे गरजेचे असते.

 चोरीला गेलेला तसेच हरवलेला मोबाईल पोलिस कसा शोधुन काढतात?

  •  सर्वप्रथम पोलिस जो मोबाईल चोरीला गेला आहे त्याचा आय एम ई आय नंबर प्राप्त करत असतात.
  •  मग त्यानंतर तो आय एम ई आय नंबर ट्रँक करतात आणि तो मोबाईल सध्या कोणत्या लोकेशनवर आहे हे जाणुन घेत असतात.
  •  आणि मग त्या लोकेशनला ट्ँँक करत पोलिस चोराला पकडत असतात.

मोबाइलफोन स्टोरेज स्पेस कमी झाला ? How to Clean mobile Marathi