आयकर विभाग भरती मध्ये भरती सुरू- दहावी पास, पदवीधर व खेळाडू करता संधी – Income tax recruitment 2023 in Marathi

आयकर विभाग भरती मध्ये भरती सुरू – Income tax recruitment 2023 in Marathi

आयकर विभागाच्या वतीने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ ह्या तीन पदांकरीता भरती करण्यात येत आहे.या भरतीसाठी पुरूष तसेच महिला उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६/२/२०२३ आहे.म्हणुन इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज आँनलाईन पदधतीने सादर करायचा आहे.

या भरतीसाठी आँनलाईन अर्ज करायची लिंक खाली दिलेली आहे.या लिंकवरून आपण अर्ज करू शकतात.

https://tnincometax.gov.in/sportsquota/application2022.php

अधिक माहितीसाठी आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट –

https://www.tnincometax.gov.in/home

Income tax recruitment 2023 पदाचे नाव –

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर एकुण जागा -२८

टॅक्स असिस्टंट एकुण जागा -२८ जागा

मल्टी टास्किंग स्टाफ एकुण जागा -१६

एकुण -७२ जागा

 Income tax recruitment 2023 वेतन –

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना इथे मुळ वेतन ९३०० ते३४८०० इतके असणार आहे.सोबत ४६०० इतके ग्रेड पे देखील दिले जाणार आहे.

टॅक्स असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार २०० ते २० हजार २०० इतके मुळ वेतन दिले जाणार आहे.सोबत २४०० इतका ग्रेड पे देखील दिला जाणार आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ ह्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुळ वेतन ५ हजार २०० ते २० हजार २०० इतके दिले जाणार आहे.सोबत १८०० रूपये इतका ग्रेड पे देखील दिला जाणार आहे.

See also  दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना विषयी माहीती - Antyodaya welfare scheme Information

Income tax recruitment 2023 वयाची अट –

टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी वयाची अट इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असणे आवश्यक आहे.

टॅक्स असिस्टंट तसेच मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी वयोमर्यादा अट १८ ते ३० दरम्यान ठेवण्यात आली आहे.

वयात सुट –

जनरल अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे अणि एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना दहा वर्षे इतकी वयात सुट दिली गेली आहे.

शैक्षणिक पात्रतेच्या अटी –

  • जे उमेदवार टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे.
  • जे उमेदवार टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करता आहेत त्यांच्याकडे सुदधा पदवीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.तसेच डेटा एंट्री येणे आवश्यक आहे तसेच त्याचे सर्टिफिकेट जवळ असणे गरजेचे आहे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • ही व्हॅकॅन्सी स्पोर्ट्स कोटयामधून निघालेली आहे म्हणून उमेदवारांकडे स्पोर्ट्स शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
  • अॅथलिटिक्स, बास्केटबॉल,बॅटमिंटन,कॅरम,चेस,बाॅडी बिल्डिंग, क्रिकेट, फुटबॉल, फुटबॉल,हाॅकी,कबडडी,स्विमिंग,टेबल टेनिस व्हाॅलीबाॅल इत्यादी
  • अशा एकुण १५ खेळांपैकी कुठल्याही एका खेळात नॅशनल,इंटरनॅशनल,इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट,नॅशनल स्पोर्ट्स गेम फाॅर स्कुल,फिजिकल इफीशन्सी ड्राईव्ह यापैकी कुठल्याही एका स्पर्धेत सर्टिफिकेट प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.ही भरती सेंट्रल गव्हमेंटची आहे.