गौतम बुद्ध यांचे २५ प्रेरणादायी विचार -२५ Inspirational thoughts of Gautam Buddha in Marathi

गौतम बुद्ध यांचे २५ प्रेरणादायी विचार २५ inspirational thoughts of Gautam Buddha in Marathi

Inspirational thoughts of Gautam Buddha in Marathi
Inspirational thoughts of Gautam Buddha in Marathi
 • एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतावर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे.कारण स्वता वर विजय प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळवता येते.
 • पाण्याकडुन हे शिका जोराच्या लाटेने कदाचित झुडुपे विखुरली जाऊ शकतात.पण समुद्राची खोली मात्र शांत राहते म्हणून शांत राहायला शिकायला हवे.
 • कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच बघत नाही कोणते काम करायचे बाकी आहे याकडेच माझे नेहमी लक्ष असते.
 • तुम्ही तीच गोष्ट गमवता ज्या गोष्टीला तुम्ही जास्त चिकटून बसतात.
 • भुतकाळ आधीच निघून गेला आहे भविष्यात काय होईल हे तुम्हाला माहीत नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे वर्तमानकाळ म्हणुन वर्तमानात जगायला शिका.
 • तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे.कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कोणालाच सांगता येणार नाही.त्यामुळ जी वेळ हातात आहे तिचा व्यवस्थित उपयोग करून घ्या.
 • जीभ ही एखाद्या धारदार शस्त्रा प्रमाणे असते.त्यातुन आलेले शब्द घायाळ करतात फक्त रक्ताचा सडा घालत नाहीत एवढाच फरक असतो.
 • ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसे सोडुन जाण्याचे किंवा नसण्याचे दुःख आहे.पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास होत नाही.
 • रागाला प्रेमानेच संपवले जाऊ शकते.हा एक अविश्वसनीय कायदा आहे.ज्यांना द्वेष करणे थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणे शिकायला हवे.
 • प्रेमाचा मार्ग हा हदयात असतो तो इतर कुठेही शोधु नका.तुम्हाला प्रेम हवे असेल तर त्याची जागा हदयात आहे इतर ठिकाणी नाही.
 • लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहेत अणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात हे तुमचे कर्म आहेत.त्यामुळ कोणाशीही वागताना चांगले वागायला हवे.तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच भेटेल.
 • तुमच्या बरोबर घडुन आलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वताचे कर्मच जबाबदार आहेत.हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल.तुमच्या कर्माची फळे तुम्हाला इथेच भोगावी लागत असतात.
 • आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणुस म्हणून जगतो.आपण आपल्या विचारानुसाराच माणूस म्हणून जगत असतो.आपल्या विचारांनीच जग बनत असते.
 • दुख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही पण त्यात किती रमुन राहायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
 • रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा.अन्यथा आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल.
 • एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एक चांगल्या शब्दाने मनःशांती लाभते.त्यामुळे नेहमी चांगले बोलायला हवे.
 • स्वताच्या मनावर विजय प्राप्त करणे हे इतरांवर विजय प्राप्त करण्यापेक्षा अधिक कठिण आहे.त्यामुळे सर्वात आधी आपण आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे.
 • प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो तसाच शेवटही असतो.ही गोष्ट मनात ठेवली तर आपल्या मनाला नक्कीच शांतता प्राप्त होईल.
 • दुखाचे मुळ कारण हे आसक्ती आहे.तुम्ही कोणाशी तरी खुपच जोडले गेले असता त्यामूळे तुम्हाला दुख अधिक होते.
 • आपल्या आयुष्याशी इतरांच्या आयुष्यासोबत तुलना केल्याने आपणास कधीच मनःशांती लाभत नाही.त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला हवे.
 • एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्तींना उजळवू शकता आनंदाचे पण तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तेवढा तो वाढत जाणार आहे.आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नाही.
 • आनंद मिळविण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.
 • तुम्ही कोण आहात अणि तुमच्याकडे काय आहे यावर तुमचा आनंद अवलंबून नाही.तर तुम्ही नक्की काय विचार करता अणि काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.
 • बरंच काही असण्यात आनंद नसतो तर असलेल्या गोष्टी वाटण्यात खरा आनंद आहे.
 • प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म आहे.त्यामुळे काल काय झाले हे विसरून नव्याने सुरुवात करायला हवी.
 • आदर हा आरशा प्रमाणे असतो जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला अधिक परत मिळेल.
 • समजुन घेणे ही एक कला आहे.ही कला प्रत्येकाला जमते असे नाही.
See also  जीवनावर प्रेरणादायी मराठी विचार -30 Life Quotes