TAIT स्कोअर कार्ड डाऊनलोड करताना इनवॅलिड लाॅग इन क्रेडेनशिअल येत असल्यास काय करायचे?Invalid login credentials problem solution in Marathi

स्कोअर कार्ड डाऊनलोड करताना इनवॅलिड लाॅग इन क्रेडेनशिअल येत असल्यास काय करायचे?Invalid login credentials problem solution in Marathi

खुप उमेदवारांना स्कोअर कार्ड डाऊनलोड करताना invalid login credentials हा प्राॅब्लेम येत असल्याचे उमेदवारां कडुन सांगितले जाते आहे.

ज्या उमेदवारांना रेजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर अणि खाली पासवर्ड टाकुन लाॅग इन वर ओके केल्यावर invalid login credentials असे सांगत असेल

अशा उमेदवारांनी सर्वप्रथम वर इंग्लिश सिलेक्ट करायचे आहे.

रेजिस्ट्रेशन नंबर तसेच रोल नंबर तुम्ही व्यवस्थित बरोबर टाकला आहे का ते बघुन घ्यायचे आहे.

यानंतर पासवर्ड मध्ये जन्मतारीख टाकताना तुमचा डेट आॅफ बर्थ बरोबर टाकला आहे का हे चेक करायचे आहे

डेट आॅफ बर्थ मध्ये आपणास सर्वप्रथम आपली जन्मतारीख टाकायची आहे मग यानंतर पुढे मायनसचे वजाबाकीचे चिन्ह द्यायचे आहे.हे चिन्ह प्रत्येक मोबाईल तसेच कंप्युटर मध्ये उपलब्ध आहे.

ज्यांची जन्मतारीख 1आहे त्यांनी 01 असे टाकायचे आहे.ज्यांची जन्मतारीख 9 आहे त्यांनी 09 अशा स्वरूपात इथे टाकायची आहे.

थोडक्यात ज्यांची जन्मतारीख 1 ते 9 आहे त्यांनी झिरो टाकुन आपली जन्मतारीख टाकायची आहे.

अणि ज्यांची जन्मतारीख 9 च्या पुढची आहे अशा स्वरुपात 10,11,16,21 अशी त्यांनी झिरो न वापरता डायरेक्ट जन्मतारीख टाईप करायची आहे.

Month मध्ये देखील date of birth मध्ये जो फाॅरॅमॅट टाईप करताना वापरला तोच सेम वापरायचा आहे.

Year मध्ये वर्ष टाकताना शेवटचे दोन अंक आपणास टाकायचे आहे

म्हणजे समजा 1998 हे वर्ष टाकायचे असेल तर 98 टाकायचे आहे अणि समजा 1995 टाकायचे असेल तर 95 असे टाकायचे आहे.

password format

याचसोबत कॅपच्या कोड व्यवस्थित आहे तसाच भरायचा आहे अणि कॅपच्या भरताना कुठलाही स्पेस न देता भरायचा आहे.

मग शेवटी लाॅग इन वर क्लिक करायचे आहे ज्यांना हा invalid login credentials इशु येत होता तो साॅल्वह होऊन जाईल.

See also  ब्लाॅक चेन इंजिनिअर कसे बनावे?How to become blockchain Engineer

रोल नंबर टाकुन ज्यांचे लाॅग इन होत नाहीये अशा उमेदवारांना रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

महत्वाची सूचना

(रेजिस्ट्रेशन नंबर हा आयबीपीएसने प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एस एम एस दवारे टेक्स्ट मॅसेज दवारे पाठवलेला आहे तोच रेजिस्ट्रेशन नंबर लाॅग इन करताना उमेदवारांनी टाकायचा आहे.

यानंतर पासवर्ड मध्ये ज्या उमेदवारांनी जन्मतारीख टाकुन देखील त्यांचे लाॅग इन होत नाहीये

अशा उमेदवारांना पासवर्ड म्हणुन टेटचा फाॅम भरताना रेजिस्ट्रेशन करताना जो टेक्स्ट मॅसेज उमेदवारांना पाठविला गेला होता त्यात रेजिस्ट्रेशन आयडी सोबत एक सिस्टम जनरेटेड पासवर्ड देखील दिला गेला होता तो पासवर्ड टाकायचा आहे.