के एल राहुल विषयी माहिती kl Rahul information in Marathi
आज १८ एप्रिल रोजी के-एल राहुल म्हणजेच कन्नोर लोकेश राहुल ह्या भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडुचा वाढदिवस आहे.
के एल राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
के एल राहुल याचे संपूर्ण नाव कन्नोर लोकेश राहुल असे आहे.के एल राहुल याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटक बॅगलोर येथे झाला होता.
के एल राहुल यांच्या वडिलांचे नाव के एन लोकेश असे आहे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक मध्ये प्राध्यापक तसेच कार्यकारी संचालक आहेत.
अणि त्यांच्या आईचे नाव राजेश्वरी असे आहे.हया देखील बॅगलोर विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
के एल राहुल याला बालपणापासूनच क्रिकेटची खुप आवड होती म्हणून फक्त अकरा बारा वर्षाचे असताना त्यांनी क्रिकेट खेळावयास आरंभ केला होता.के एल राहुल यांच्या मध्ये क्रिकेट विषयीची ही आवड निर्माण करण्यात त्यांच्या वडिलांचा देखील वाटा असल्याचे सांगितले जाते.
असे सांगितले जाते की के एल राहुल याचे वडील सुनील गावस्कर यांचे खुप मोठे फॅन होते म्हणून त्यांना आपल्या मुलाचे नाव सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर यांच्या नावाने ठेवायचे होते तसेच ते ठेवू इच्छित होते.
के एल राहुल यांच्या वडिलांना के एन लोकेश यांना असे वाटले की सुनिल गावसकर यांच्या मुलाचे नाव रोहन नाही राहुल आहे म्हणून त्यांनी देखील त्यांच्या मुलाचे नाव राहुल असे ठेवले.
फक्त अठरा वर्षांचा असताना के एल राहुल त्याच्या क्रिकेट करियरला पुढे नेण्यासाठी तसेच पुढील शिक्षणासाठी बॅगलोर येथे राहावयास आले.
बॅगलोर येथे के एल राहुल जैन युनिव्हसिर्टीतून आपले शिक्षण घेत होते.याचसोबत के एल राहुल यांनी क्रिकेटची देखील प्रॅक्टिस करत होते.
के एल राहुल यांनी २१ कसोटी सामने दहा वन डे अणि ५६ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.के एल राहुल यांनी २०१०-२०११ दरम्यान कर्नाटकातुन आपल्या देशांतर्गत कारकीर्दीस प्रारंभ केला.
हयाच वर्षात के एल राहुल हे अंडर नाईंटी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाकडुन सहभागी देखील झाले होते.
के एल राहुल यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी आॅस्ट्रेलिया संघा विरुद्ध खेळताना कसोटी मध्ये पदार्पण केले होते.
के एल राहुल यांनी ११जुन २०१६ रोजी झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळत ओडीआय मध्ये पदार्पण केले होते.
के एल राहुल यांनी १८ जुन २०१६ झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळत टी टवेंटी मध्ये पदार्पण केले होते.
के एल राहुल यांनी ११ एप्रिल २०१३ रोजी राॅयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स कडुन खेळत आयपीएल सामन्यात पदार्पण केले होते.
के एल राहुल याने ओडिआय मध्ये केलेली सर्वोच्च धावसंख्या १०० रण इतकी आहे.याचसोबत त्याने टी टवेंटी सामन्यात ११० अणि आयपीएल सामन्यात १०० अणि टेस्ट सामन्यात १९९ इत्यादी सामन्यात सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
के एल राहुल यांची २०१३ मध्ये आयपीएल सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज म्हणुन राॅयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघात निवड करण्यात आली होती.
२०१४ मध्ये सनराईज हैदराबाद संघाकडुन के एल राहुल यांना एक कोटी पर्यंत बोली लावून विकत घेण्यात आले होते.
२०१६ मध्ये के एल राहुल याने पुन्हा राॅयल चॅलेंजर्स बंगलोर मध्ये प्रवेश केला.यानंतर २०१८ मध्ये के एल राहुल यांना किंगज इलेव्हन पंजाब संघाकडून सुमारे अकरा कोटी इतकी रक्कमेची बोली लावून विकत घेण्यात आले होते.
के एल राहुल यांचा फेवरीट शाॅट कव्हर ड्राईव्ह हा आहे.के एल राहुल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०१४-२०१५ दरम्यान १०३३ धावा करण्याचे रेकाॅर्ड देखील केले होते.
के एल राहुल हे कर्नाटक राज्य क्रिकेट संघ, सनराईज हैदराबाद,राॅयल चॅलेंजर्स बंगलोर, बॅगलोर बिग्रेडियन कर्नाटक इत्यादी अशा देशांतर्गत राज्य संघाकडून देखील सामने खेळलेले आहे.