इंग्लिश स्पीकिंग संपुर्ण माहीती – साध सोप आणि सरळ – Learn English through Best Apps and course

इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती -Learn English through Best Apps and course

एक काळ असा होता की आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस लावावे लागायचे.दुर चालत जाऊन इंग्लिश स्पिकिंगच्या टयुशन अटेंड कराव्या लागायच्या.पण आता तशी वेळ अजिबात राहिलेली नाहीये.आज आपण डिजीटल युगात मोबाईल इंटरनेटचा वापर करून इंग्लिशच काय तर जगातील कुठलीही भाषा तात्काळ , सहज सोप्या पद्धतीने शिकु शकतो.

आणि इंग्लिश ही एक अशी भाषा आहे जी जगभर बोलली जाते.म्हणजेच ती आंतराष्टीय पातळीवर आज वापरली जाते.तसेच आज इंग्रजी बोलण्याला फार महत्व देखील आहे.

कारण आज आपल्या व्यक्तीमत्वाची छाप देखील कोणत्याही व्यक्तीवर आपल्या भाषेमुळेच पडत असते.कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपण नोकरीसाठी मुलाखतीला जातो तेव्हा आधी मुलाखतीत आपल्याला इंग्रजीचे आणि कंप्युटर आँपरेटींगचे किती ज्ञान आहे? हे विचारले जात असते.

एवढेच नाहीतर आपली परिक्षा घेऊन बघितले देखील जात असते की आपल्याला किती स्पष्टपणे इंग्लिश बोलता तसेच लिहिता वाचता येते.अशा परिस्थितीत आपल्याला उत्तम प्रकारचे इंग्लिश बोलता नही आले तर आपल्याला मिळत असणारी चांगली नोकरी देखील आपल्या हातातुन जात असते.आणि आपली एक वाईट छाप इतरांवर पडत असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण इंग्लिश स्पिकिंग  विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचा आधार घेऊन आपण पुर्ण आत्मविश्वासाने एक उत्तम प्रकारचे इंग्लिश बोलु शकतो.आणि आपल्या व्यक्तीमत्वाची एक चांगली छाप समाजात पाडू शकतो.

इंग्लिश स्पिकिंग आपण कशी शिकु शकतो? इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

आज आपण विविध मार्गाने इंग्लिश स्पिकिंग शिकु शकतो.ज्यात पुढील तीन पदधती फार जास्त प्रमाणात इंग्लिश बोलणे शिकण्यासाठी वापरत असतो.

इंग्लिश स्पिकिंग शिकण्याचे चार प्रमुख मार्ग :

1) इंग्लिश स्पिकिंग मोबाईल अँप्स द्वारे :

 2) इंग्लिश स्पिकिंग विषयीची पुस्तके वाचुन :

3) इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करून :

4) इंग्लिश स्पिकिंगचा क्लास लावुन :

1)इंग्लिश स्पिकिंग मोबाईल अँप्स द्वारे :

इंग्लिश स्पिकिंग शिकण्यासाठी आपण मोबाईल मधील अँप्सचा देखील वापर करू शकतो.आणि यात आपल्याला कुठला खर्चही करावा लागत नसतो.

बेस्ट इंग्लिश स्पीकिंग अँप्स कोणकोणत्या आहेत : इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

आज आपण आपल्या मोबाईलमध्ये अशा अनेक अँप्स बघतो ज्यांचा वापर करून आपण एक उत्तम प्रकारचे इंग्रजी बोलायला शिकु शकतो.पण कधी कधी आपल्याला हा देखील प्रश्न पडतो की ह्या सर्व अँप्समध्ये कोणती अँप्स आपल्याला जास्त उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल.

ह्याचसाठी आज आपण इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या इंग्लिश स्पिकिंगच्या काही टाँप आणि बेस्ट अशा 11 अँप्सची नावे आणि त्यांचे महत्व जाणुन घेणार आहे.ज्या आपल्यासाठी इंटरनेटवर मोफत मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.आणि ज्यांचा वापर करून आपण एक उत्तम दर्जाचे इंग्रजी बोलायला शिकु शकतो.

इंग्लिश स्पिकिंग टाँप अँण्ड बेस्ट 11 अँप्स :

1) केक (मोफत इंग्रजी शिका) :

2) हँलो इंग्लिश :

3) गुगल ट्रान्सलेट :

4) इंग्लिश कन्व्हरसेशन प्रँक्टिस :

5) नमस्ते इंग्लिश :

6) ड्युओलिंगो :

7) इंग्लिश स्कील :

8) इंग्लिश कन्हरसेशन :

9) लर्न इंग्लिश लिसन आणि स्पीक :

10) स्कीपी बेटर इंग्लिश बेटर लाईफ :

1) केक (मोफत इंग्रजी शिका) :

See also  शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेत स्वत:चा परिचय - self introduction for school students in English language

ही एक बेस्ट इंग्लिश स्पीकिंग मोबाईल अँप आहे.ह्या अँप्सचा वापर करून आपण इंग्लिश स्पिकिंगचे व्हिडिओ लेक्चर प्राप्त करू शकतो.तसेच ह्या अँपवर आपल्याला प्लुएंट इंग्लिश बोलणारे अनेक स्पीकर दिसुन येतात.

इथे आपण एखादा इंग्रजी शब्द वाचुन त्याची रेकाँर्डिंग करू शकतो.रेकाँर्डिंग केलेल्या शब्दाचा उच्चार व्यवस्थित झाला आहे का नाही हे देखील येथे आपणास चेक करता येते.

2) हँलो इंग्लिश :

ह्या अँपमध्ये आपल्याला 25 पेक्षा अधिक भाषा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.ज्यांचा उपयोग आपण इंग्रजी शिकण्यासाठी करू शकतो.ह्या अपमध्ये आँडिओ तसेच व्हिडिओ लेसन ऐकुण तसेच प्रत्यक्ष बघुन उत्तम इंग्रजी शिकु शकतो.

ह्या अँपमध्ये एक आँडिओ डिक्शनरी देखील असते.जिच्यामध्ये दहा हजार पेक्षा अधिक शब्दांचा अर्थ दिलेला आहे.

ह्या अँपमध्ये आपण मनोरंजक पदधतीने देखील इंग्रजी भाषा बोलायला शिकु शकतो.यासाठी इथे फन गेम्स तसेच रिडिंग गेम देखील लहान मुलांसाठी दिलेले असतात.

3) गुगल ट्रान्सलेट :

 ह्या अँपमध्ये एकुण 103 भाषा दिलेल्या आहेत.ज्या आपण भाषांतरीत करून इंग्लिश स्पिकिंगसाठी देखील वापरू शकतो.

ह्या अँपवर आपण व्हाँईस असिस्टंटचा वापर करून कुठलाही शब्द आपल्याला हव्या त्या भाषेत म्हणजेच इंग्रजीत देखील भाषांतरीत करू शकतो.ज्याने आपल्याला चटकन इंग्रजी शिकता येते.

किंवा आपण कोणत्याही भाषेत दिलेल्या एखाद्या शब्दाचा फोटो काढु शकतो तसेच त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट पण करू शकतो.जेणे आपल्याला त्या वाक्याचा इंग्रजीत काय अर्थ होतो हे समजता येईल.

4) इंग्लिश कन्व्हरसेशन प्रँक्टिस :

ह्या अँपमध्ये आपल्याला शंभर पेक्षा अधिक इंग्लिश स्पिकिंगचे धडे शिकायला मिळतात.ही अँप आपल्याला इंग्लिश ऐकायला,बोलायला तसेच समजायला देखील खुप मदत करत असते.

5) नमस्ते इंग्लिश :

ह्या अँपमध्ये आपल्याला वेगवेगळया भाषेतील गेम्स खेळायला मिळतात.ज्याचा उपयोग आपल्याला इंग्लिश स्पिकिंगसाठी देखील होतो.

ह्या अँपमध्ये एकुण तीन पातळीवर आपण इंग्रजी शिकु शकतो ज्यात पहिली पातळी आहे सुरूवातीपासुन इंग्लिश शिकत असलेल्या व्यक्तींसाठी,दुसरी पातळी अशा व्यक्तींसाठी असते ज्यांना इंग्लिश बर येते.आणि तिसरी पातळी मध्ये असे लोक इंग्रजी शिकु शकतात ज्यांना हायलेव्हल इंग्रजी शिकायचे आहे.

यात आपण आपल्याला इंग्रजी भाषा ज्या पातळीनुसार शिकायची आहे त्या पातळीनुसार शिकु शकतो.

6) ड्युओलिंगो :

 ह्या अँपचा वापर करून आपण आपले इंग्लिश स्पिकिंगच नाहीतर इंग्लिश रीडींग,लिसनिंग तसेच रायटिंग देखील शिकु शकतो.आणि त्यात चांगली सुधारणा करू शकतो.

ह्या अँपवर आपण इंग्लिश बरोबर विविध भाषा बोलायला शिकु शकतो.ह्या अँपचा वापर करून आपण वेगवेगळया भाषेतील शब्द आणि त्यांचा अर्थ जाणुन घेऊ शकतो.ज्याने आपल्या भाषिक कौशल्यात देखील वाढ होते.

7) इंग्लिश स्कील :

ह्या अँपमध्ये सुदधा आपल्याला नमस्ते इंग्लिश अँपप्रमाणे सुरूवात,मध्यम आणि उच्च ह्या तीन पातळींवर इंग्रजी शिकता येते.

इथे आपण अँडव्हान्स लेव्हल इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे देऊन आपण पाँईण्ट मिळवू शकतो.ज्याने आपल्याला आपले इंग्लिश किती पक्के आहे हे कळत असते.

8) इंग्लिश कन्हरसेशन :

ह्या अँपमध्ये असे अनेक व्हिडिओ दिलेले आहे ज्यात आपल्याला साध्या आणि सोप्प्या भाषेत इंग्रजी शिकता येते.तसेच ते ऐकूण इंग्लिश बोलता तसेच लिहिता देखील येऊ शकते.

इथे आपण आपला आवाज रेकाँर्ड करून शब्दोच्चारण देखील तपासु शकतो.

9) लर्न इंग्लिश लिसन आणि स्पीक :

इथे आपल्याला असे अनेक प्रकारचे इंग्रजी धडे शिकायला मिळतात ज्यात 50 पेक्षा अधिक भाषेतील शब्द इंग्रजीत अनुवादीत करून इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला मदत केली गेली आहे.

See also  पर्यावरण संबंधित इंग्रजी शब्द मराठी अर्थासह - environmental terms with Marathi meaning

ह्या अँपचा वापर करून आपण इंग्रजीमध्ये संदेश लिहुन पाठवायला देखील शिकु शकतो.

10) स्कीपी बेटर इंग्लिश बेटर लाईफ :

स्कीपी ह्या अँपमध्ये इंग्लिश स्पिकिंगचे जेवढेही व्हिडिओ दिले आहेत ते मोठमोठया संस्था तसेच अकँडमी मधील तज्ञ शिक्षकांनी बनवलेले व्हिडिओ आहेत.

इथे आपण इंग्रजी शब्द उच्चारणात काय चुक केली हे देखील सुचित केले जात असते.जेणेकरून पुन्हा आपण तिच चुक करू नये.

 लर्न टु स्पीक इंग्लिश :

 ह्या अँपमध्ये आपल्याला बेसिक लेव्हलपासुन इंग्रजी बोलायला शिकता येते.ह्या अँपच्या मदतीने आपल्या इंग्रजी व्याकरणात सुधारणा होण्यास मदत होते.

इथे आपण वेगवेगळया वर्गानुसार इंग्रजी बोलायला शिकु शकतो.दैनंदिन जीवणात वापरले जाणारे इंग्रजी शब्द,व्यापार व्यवसायात,मुलाखतीच्या वेळी बोलले जाणारे इंग्लिश,इत्यादी.

इथे आपल्याला दोन हजार पेक्षा अधिक शब्दांचा इंग्रजीत अर्थ असणारा शब्दसंग्रह दिलेला असतो.

2) इंग्लिश स्पिकिंग विषयीची पुस्तके वाचुन : इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

आपल्याला प्रश्न पडतो की इंग्लिश स्पिकिंग शिकण्यासाठी उत्तम पुस्तके कोणकोणती आहेत तर आज आपण काही अशा पुस्तकांची नावे जाणुन घेणार आहोत जी इंग्लिश स्पिकिंगसाठी फार उत्तम पुस्तके आहेत.

  • स्पोकन इंग्लिश फाँर माय वर्ड :
  • काँमन इरर इन एव्हरीडे इंग्लिश :
  • बी ग्रामर रेडी :
  • एलिव्हेट सीरीज :

1)स्पोकन इंग्लिश फाँर माय वर्ड  :

काही लोक आज असे देखील आपणास आढळुन येतात जे खुप छान इंग्रजीमध्ये लेखन वाचन करतात पण त्यांना इंग्रजीत कोणाशी बोलण्याची वेळ आली तर त्यांना बोलता येत नसते.हे पुस्तक जर अशा लोकांनी वाचले तर ते इंग्रजी बोलण्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतात.आपल्या दैनंदिन जीवणामध्ये इंग्रजीमध्ये भाषिक देवाण घेवाण करण्यासाठी आपण ह्या पुस्तकाचे वाचन नक्कीच करायला हवे.

सबिना पिलाई यांनी लिहिलेले हे पुस्तक आँडिओ तसेच व्हिडिओ मध्ये सुदधा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

2)काँमन इरर इन एव्हरीडे इंग्लिश :

सौमय्या शर्मा यांनी लिहिलेल्या ह्या पुस्तकात आपण दैनंदिन तसेच व्यवहारासाठी वापरत असलेल्या इंग्रजी भाषेचा आणि त्यात नेहमी करत असलेल्या सर्वसामान्य चुकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

3)बी ग्रामर रेडी  :

जाँन इस्टवुड यांनी लिहिलेल्या ह्या पुस्तकात आपल्याला व्याकरणाचे नवीन नियम समजावून सांगिण्यात आले आहे.व्याकरणाचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे देखील आपल्याला ह्या पुस्तकातुन शिकायला मिळते.

4) एलिव्हेट सीरीज :

ह्या पुस्तकात प्रारंभीक मध्यम स्वरुपी तसेच अँडव्हान्स लेव्हल अशा तिन्ही स्तरावर इंग्लिश स्पिकिंगची माहीती दिलेली आहे.

3) इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करून : इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

आपण इंग्लिश बोलणे शिकण्यासाठी खालील दिलेल्या प्रमाणे इंग्लिश स्पिकिंगचा एखादा चांगला कोर्स देखील पुर्ण करू शकतो.

यासाठी आपण आँनलाईन तसेच आँफलाईन सुदधा एखादा चांगला कोर्स करू शकता.

इंग्लिश स्पिकिंगचे काही महत्वाचे कोर्स :

1) स्पीक इंग्लिश प्रोफेशनली : हा कोर्स ज्योरेज्या इंस्टिटयुट आँफ टेक्न्नाँलजीकडुन आपणास आँफर करण्यात आला आहे.

ह्या कोर्सची वेळ मर्यादा ही 16 तास इतकी आहे. हा कोर्स करण्यासाठी आपण कोर्सेरा ह्या वेबसाईटला भेट देऊ शकता.आणि ह्या कोर्सला आँनलाईन जाँईन करू शकतात.

2) 14 दिवसांचा इंग्रजी भाषा उत्तम पणे प्लुएंटली बोलण्याचा कोर्स : (english language fluently speaking )ह्या कोर्सचा कालावधी 14 दिवसांचा आहे आणि रोज हा दोन तास 55 मिनिटांचा असा ठेवण्यात आलेला आहे.आणि हा कोर्स जोल सोर्थ यांच्याकडुन आपल्याला आँफर करण्यात आला आहे.87000 पेक्षा अधिक मुलामुलींनी हा कोर्स केलेला आपणास दिसुन येतो. ह्या कोर्ससाठी आपण युडेमी ह्या वेबसाईटला भेट देवून हा कोर्स जाँईन करू शकतो.

See also  रोज बोले जानेवाले अंग्रेजी वाक्य Daily use English sentences with hindi meaning

3)इंट्रुडक्शन टु इंग्लिश ग्रामर : हा कोर्स आपल्यासाठी खान अकँडमीच्या डेव्हिड रिनस्ट्रोम यांच्या वतीने तयार करण्यात आला आहे. ह्या कोर्सचा कालावधी दहा तास इतका असा ठेवण्यात आला आहे.

4) इंग्लिश स्पिकिंगचा क्लास लावुन : इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

आपण इंग्लिश स्पिकिंगचा एखादा प्रायव्हेट क्लास तसेच टयुशन लावून सुदधा उत्तम इंग्रजी बोलायला शिकु शकतो.

आपण इंग्लिश स्पीकिंग अँप्सचा योग्य पदधतीने वापर कसा करावा?

1)इंग्लिश स्पिकिंग अँपचा वापर करताना आपण कधीही इतर अँपचा उपयोग करू नये.कारण येणे आपल्याला एकाग्रतेने अँप मध्ये काय दिले आहे ते वाचता तसेच ऐकता येत नसते.ज्यामुळे आपल्याला ती अँप कशी वापरायची हे कळत नसते.म्हणुन आपण कधीही इंग्लिश स्पिकिंग अँपचा वापर करताना इतर अँपचा वापर करणे टाळावे.

2) आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचे इंग्रजीमधील अर्थ कळावे म्हणून आपण नियमित अँप मध्ये दिलेल्या टेस्ट तसेच सराव प्रश्न सोडवायला हवे.जेणेकरून आपण जे अभ्यासले आहे ते आपल्याला किती व्यवस्थित समजले आहे हे आपल्या लक्षात येते.

3) आपल्याला इंग्लिश स्पिकिंग अँपचा वापर कधी आणि केव्हा करायचा आहे?हे आपण आधीपासुन ठरवुन घ्यायला हवे.जेणेकरून आपल्याला वेळेत अभ्यास करण्याची शिस्त लागते.

4) अँपमध्ये दिलेले इंग्लिश स्पिकिंगचे सर्व आँडिओ तसेच व्हिडिओ आपण व्यवस्थित ऐकायला हवेत.आणि समजून देखील घ्यायला हवे.ज्याने आपण लवकर इंग्रजी बोलायला शिकण्यास हातभार लागतो.

आपले इंग्लिश स्पिकिंग सुधारण्यासाठी आपण काय करायला हवे? इंग्लिश स्पीकिंग विषयी संपुर्ण माहीती

1) आपले इंग्लिश स्पिकिंग सुधारण्यासाठी आपण नियमित इंग्रजी बोलायचा सराव करायला हवा.

कारण सराव केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट व्यवस्थित जमत नसते.म्हणुन आपण रोज आपल्या आजुबाजुच्या लोकांशी इंग्रजीत बोलण्याचा सराव करायला हवा.

2) रोज घरात एकटे असताना आरशासमोर उभे राहुन इंग्रजी बोलण्याचा सराव करावा याने आपला आत्मविश्वास आणि स्टेज डेअरींग देखील वाढते.

3) सुरूवातीला आपण सोपे इंग्रजी शब्द बोलण्याचा सराव करावा.आणि मग जसजसे आपल्या इंग्रजीत सुधारणा होईल तसतसे अवघड वाक्ये शब्द बोलायचा प्रयत्न करावा.

4) आपण दैनंदिन जीवणात जसे मातृभाषा मराठीत बोलतो तसेच आपण रोज इतरांशी इंग्रजीत देखील बोलायला हवे.याने आपण लवकर इंग्रजी बोलायला शिकण्यास मदत होईल.

5) इंग्रजी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन देखील आपण करायला हवे.

6) इंग्लिश बोलत असलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात आपण राहायला हवे जेणेकरून त्यांच्या संगतीत राहुन आपण देखील हळुहळु चांगले इंग्लिश बोलायला सुरूवात करू.

7) जे शब्द तसेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही.तसेच आपल्यासाठी नवीन आहे त्यांची एका वहिमध्ये नोंद करावी.

इंग्लिश स्पिकिंग शिकण्याचे फायदे कोणकोणते?

1) आपण कुठेही परदेशात गेलो तरी तेखील लोकांशी विचारांची देवाण घेवाण करू शकतो.त्यांच्याशी बोलू शकतो मैत्री करू शकतो.

2)इंग्लिश स्पिकिंग शिकुन आपण समाजात आपला एक उच्च दर्जा निर्माण करू शकतो.कारण इंग्लिश बोलणारे व्यक्ती सभ्य,प्रतिष्ठीत आणि उच्चशिक्षित असतात असे आज मानले जाते.

3) जेव्हा आपण कोणाशी इंग्रजीत बोलतो तेव्हा त्या व्यक्तीवर आपली एक वेगळी छाप पडत असते.

4) इंग्लिश स्पिकिंग शिकुन आपण परदेशातील लोकांसोबत बिझनेस करू शकतो तसेच परदेशातील कंपनीत उच्च वेतन असलेली नोकरी प्राप्त करू शकतो.

5) जेव्हा आपण चारचौघात इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा लोक आपल्याकडे एक आदर आणि सम्मानाच्या भावनेने बघत असतात.

6) उत्तम इंग्लिश स्पिकिंग शिकल्याने आपण इतरांना इंग्लिश स्पिकिंग शिकवू शकतो.त्यांचे क्लासेस घेऊ शकतो.एखादा कोर्स बनवून विकु शकतो.

अंतिम निष्कर्ष : अशा पदधतीने आज आपण इंग्लिश स्पिकिंग ह्या कोर्सविषयी सविस्तर माहीती जाणुन घेतली आहे.आशा करतो की तुम्हाला आम्ही दिलेली ही माहीती नक्कीच आवडेल.आमचे लेख आपल्याला कसे वाटतात याबाबद आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

मुलांकरता कोडिंग वर्ग