शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेत स्वत:चा परिचय – self introduction for school students in English language

शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेत स्वत:चा परिचय – self introduction for school students in English language

मराठीतुन माध्यमातुन शिक्षण घेतलेले मराठी कुटुंबातील खुप विद्यार्थी असे असतात ज्यांना शिक्षकांनी इंग्रजी भाषेत वर्गात सर्वासमोर स्वताचा इंग्रजीत परिचय द्यायला सांगितल्यावर जमत नसते.तसेच इंग्रजीत परिचय देताना खुप अडचण येत असते.

इंग्रजीत स्वताचा परिचय कसा द्यायचा हे त्यांना समजत नसते.

म्हणुन आज आपण इंग्रजी भाषेत स्वताचा परिचय कसा द्यायचा हे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून विदयार्थ्यांना वर्गामध्ये तसेच इतर कोणाही समोर इंग्रजीत स्वताचा परिचय देताना कुठलीही अडचण येणार नही.

नमुना परिचय :Sample introduction 1

● Good morning/good afternoon all teachers and my dear friends-सुप्रभात/शुभ दुपार सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो.

(सकाळ असल्यास good morning म्हणायचे अणि दुपार असल्यास good afternoon असे म्हणायचे.)

● My name is prakash Shewale -माझे नाव प्रकाश शेवाळे आहे.

(माय नेम इजच्या पुढे स्वताचे पुर्ण नाव द्यायचे असते)

● I am sixteen years old -मी सोळा वर्षांचा आहे.

आय अँम च्या पुढे आपले जे सध्याचे वय असेल ते सांगायचे असते.उदा,सोळा वय असेल तर sixteen years old,पंधरा वय असेल तर fifteen years old

● I am in class 7 th -मी इयत्ता 7 वी मध्ये आहे.

आय अँम इनच्या इनच्या नंतर आपण ज्या इयत्तेत शिकत आहात ती इयत्ता कोणती आहे ते सांगायचे.

उदा,सातवीत शिकत असाल तर class 7 th standard ,आठवीत शिकत असाल तर class 8 इत्यादी

● There are seven members in my family -माझ्या कुटुंबात सात सदस्य आहेत.

There are च्या नंतर आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे सांगायचे.उदा,five,six,seven,eight etc

See also  100 English words to Marathi

● They are my father,mother, brother two sisters, one of which is elder/smaller than me and my grandparents. ते माझे वडील,आई,भाऊ दोन बहिणी आहेत,त्यापैकी एक बहिण माझ्यापेक्षा मोठी/लहान आहे अणि माझे आजोबा.

There are च्या पुढे आपल्या कुटुंबात कोण कोण आहे ते सांगायचे.बहिण भाऊ असतील तर ते आपल्यापेक्षा लहान आहे का मोठे हे देखील सांगायचे.

● I live in NASHIK with my parents, brother,sister and grandparents -मी नाशिकमध्ये माझे आई-वडील, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबांसोबत राहतो.

I live in च्या नंतर तुम्ही कुठे राहता?कोणासोबत राहता आईवडिलांसोबत का कोणी नातलगांसोबत राहता हे सांगायचे असते.

● My father is a shopkeeper and my mother is a housewife -माझे वडील दुकानदार आहेत आणि माझी आई गृहिणी आहे.

My father is च्या पुढे आपले वडील काय काम करतात त्यांची नोकरी व्यवसाय सांगायचा असतो.my mother is च्या पुढे तुमची आई काय करते नोकरी करते व्यवसाय करते की घरगृहिणी आहे हे सांगायचे असते.

● My favorite subject is English-माझा आवडता विषय इंग्रजी आहे.

My favorite subject is च्या पुढे आपला आवडता विषय कोणकोणता आहे हे सांगायचे असते.

● My hobbies are book reading, traveling and dancing -पुस्तक वाचन, प्रवास आणि नृत्य हे माझे छंद आहेत.

My hobbies are च्या पुढे आपल्याला कोणकोणते छंद आहेत ते सांगायचे असते.

● I am also very interested in sports and I love to play cricket-मला खेळातही खूप रस आहे .मला क्रिकेट खेळायला खूप आवडते.

I am also interested in च्या पुढे आपल्या सांगितलेल्या आवडत्या छंदा व्यतीरीक्त आपल्याला अजुन कशात रूची रस आहे ते सांगायचे असते.

● I am a very punctual and determined student.and my ambition is to become a Doctor-मी खूप वक्तशीर आणि दृढनिश्चयी विद्यार्थी आहे. आणि माझी महत्वाकांक्षा डॉक्टर बनण्याची आहे.

See also  English to Marathi sentence -इंग्रजी मराठी संवाद- पती पत्नी दिवाळी खरेदि निम्मित

I am very च्या पुढे आपण किती वक्तशीर दृढनिश्चयी अणि कशा स्वभावाचे आहोत हे सांगायचे असते.सोबत आपली महत्वकांक्षा काय आहे आपल्याला मोठे होऊन काय बनायचे आहे हे सांगायचे असते.

● That’s all about me thank you-हे सर्व माझ्याबद्दल आहे धन्यवाद

शेवटी आपले बोलणे थांबवून सर्वाचा निरोप घ्यायचा असतो.

नमुना परिचय -Sample introduction 2

● Hello my name is prashant desale-नमस्कार माझे नाव प्रशांत देसले आहे.

● My father name is Mr,manohar desale and my mother name is Mrs,archana desale -माझ्या वडिलांचे नाव श्री, मनोहर देसले आणि माझ्या आईचे नाव सौ, अर्चना देसले आहे.

● My elder brother name is rohit and my younger sister name is sukanya-माझ्या मोठ्या भावाचे नाव रोहित आणि माझ्या लहान बहिणीचे नाव सुकन्या आहे.

● My elder brother rohit studies in nineth standard-माझा मोठा भाऊ रोहित नववीत शिकतो आहे.

● My Younger sister sukanya studies in fourth class -माझी धाकटी बहीण सुकन्या चौथीत शिकते.

● I study in class sixth -मी सहावीत शिकतो.

● The name of my school is kbh vidyalaya -माझ्या शाळेचे नाव केबीएच विद्यालय आहे.

● I am ten years old -मी दहा वर्षाचा आहे.

● My date of birth is 20-2-1993 my birthday is on 20 February-माझी जन्मतारीख 20-2-1993 आहे माझा वाढदिवस 20 फेब्रुवारीला आहे.

● My favorite color is green-माझा आवडता रंग हिरवा आहे.

● I like banana fruit very much-मला केळीचे फळ खूप आवडते.

● My best friend name is Mahesh -माझ्या जिवलग मित्राचे नाव महेश आहे.

● I live in NASHIK panchwati.-मी नाशिक पंचवटी येथे राहतो.

● My father is civil engineer-माझे वडील सिव्हिल इंजिनिअर आहेत.

● My mother is business woman -माझी आई व्यावसायिक स्त्री आहे.

See also  Good words to describe someone-लोकांचे वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्द

● Thank you -धन्यवाद