दैनंदिन जीवनात स्वयंपाक घरात रोज वापरले जाणारे 80 इंग्रजी वाक्ये Daily use English sentence in kitchen in Marathi
1)Peels the potatoes before cutting them
-बटाटे कापण्याच्या आधी सोलून घे
2) cut the tomato into five pieces
-टोमँटो पाच भागात कापुन घे
3) cut the tomato in half
-टोमँटो अर्धा कापुन घे
4) halve the tomatos
-टोमँटोचे दोन समान भाग कर
5) slice the cucumber in circular shape
-काकडीचे गोल आकाराचे काप करून घे
6) chop the vegetables
-भाजी कापुन घे
7) peel and dice the carrot
-गाजर सोलून घे अणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घे
8) grate the carrot
-गाजर किसुन घे
9) sift the flour
-पीठ चाळुन घे
10) knead the dough
-कणिक मळ
11) the milk is boiling over
-दुध ओतु जात आहे.
12) the milk has curdled
-दुध फाटलेले आहे.
13) saute the onion in oil for 3 minutes
-कांदे तेलात तीन मिनिटे परतुन घे
14) squeeze a bit of lemon juice onto the curry
आमटीवर थोडासा लिंबाचा रस पिळ
15) rolling out the chapati
-पोळया लाटुन घे
16) bake the chapati
-पोळी शेकुन घे किंवा पोळी भाजुन घे
17) flip the chapati/turn the chapati upside down
पोळी पलटव/पोळी उलथव
18) grind the spice
-मसाले बारीक करून घे किंवा मसाले वाटुन घे
19) mash the potatos
-बटाटे कुस्करून घे
20) spread the butter on bread.
-ब्रेडवर बटर पसरवुन घे किंवा ब्रेडवर लोणी लावुन घे
21) sprinkle coriander leaves on it
थोडी कोथिंबीर घाल
22) squeeze the lemon
लिंबु पिळ
23) strain the tea.
-चहा गाळुन घे
24) roast the peanuts.
शेंगदाणे भाजुन घे
25) dissolve sugar in the water
-पाण्यात साखर विरघळव
26) fry the potatos
-बटाटे तळुन घे
27) adding seasoning to daal
-वरण तसेच दाळीला फोडणी दे
28) melt the chocolate
चाँकलेट वितळवुन घे
29) peel the carrot
गाजर सोलुन घे
30) chop the onion
-कांदा बारीक चिरून घे
31) pour the tea into the cup
-चहा कपमध्ये ओत
32) pour the juice into the glass
-ज्युस ग्लासमध्ये ओत
33) add one teaspoon of salt
-एक चमच मीठ टाक
34) boil the egg
-अंडी उकळव
35) boil the milk
-दुध उकळून घे किंवा दुध गरम करून घे
36) burn the stove
-गँस पेटवून घे
37) turn down the heat
-गँस कमी कर
38) turn up the heat
-गँस वाढव
39) put the pan over heat
-तवा गँसवर ठेवून घे
40) boil the water
-पाणी उकळव
41) warm up the water
-पाणी गरम कर
42) curdle the milk
-दही लावुन घे
43) remove the pan over heat
-गँसवरून तवा काढुन घे
44) I am kneading the dough
मी पीठ मळत आहे.
45) cook chapati
-चपाती बनव
46) I am cooking the chapati
-मी चपाती बनवत आहे.
47) I am rolling out the chapati
-मी पोळया लाटत आहे.
48) cook it over the low heat/flame
-बारीक गँसवर शिजव
49) cover it
-झाकुन ठेव
50) serve the food
-जेवायला वाढ
51) salt is less in vegetable
भाजीत मीठ कमी आहे.
52) salt is less in food
-जेवणात मीठ कमी आहे.
53) add salt in vegetable
भाजीमध्ये मीठ टाक
54)wash the dishes
भांडी घासुन घे
55) I wash the dishes
-मी भांडी घासत आहे.
56) dry the dishes
भांडी सुकवून घे किंवा भांडी वाळत टाक
57) wipe the dishes
भांडी पुसुन घे
58) mince the spices
मसाले बारीक वाटुन घे
59) cook it till boil
जो पर्यत उकळत नाही तोपर्यत शिजव
60) saute the onion in oil
-कांदा तेलात परतून घे
61) stir it
-हे ढवळुन घे
62) stir it continuesly
हे सारखे ढवळत राहा
63) your food is ready
तुमचे जेवण तयार आहे.
64) Cooking is done
स्वयंपाक झाला आहे
65) serve the hot meal/serve the hot dishes
गरमागरम जेवण वाढ
66) let the food cool down
-जेवण थंड होऊ द्या
67) the food is getting cold
जेवण थंड होत आहे.
68) vegetable is very salty
-भाजी खुप खारट झाली आहे/भाजीत मीठ जास्त आहे.
69) vegetable is too much salty
-भाजी खुपच खारट आहे.
70) it’s very spicy.
हे खुप तिखट आहे.
71) it’s too much spicy
-हे खुपच तिखट झालेले आहे.
72)grate the coconut
नारळ किसुन घे
73) fry the puri
पुरया तळ
74) I am frying puries
-मी पुरया तळते आहे.
75) vegetable is over cook
भाजी जास्त शिजली आहे.
76) tea is getting cold
चहा थंड होत आहे.
77) salt is less in the food
जेवणात मीठ कमी आहे.
78) potato’s are overcook
बटाटे जास्त शिजले
79) mix the spices
मसाले मिसळुन घे
80) curry is salty
-आमटीत मीठ जास्त आहे.