LIC जीवन आझाद पॉलिसी २०२३ विषयी माहिती – Lic jeevan Azad policy 2023 information in Marathi  

LIC जीवन आझाद पॉलिसी – Lic jeevan Azad policy 2023 information in Marathi 

एल आयसी जीवन आझाद पॉलिसी ही एक पारंपरिक जीवन विमा योजना आहे.हया योजनेच्या अंतर्गत आपणास आर्थिक संरक्षण अणि गुंतवणूक हे दोन्ही लाभ प्राप्त होतात.

याव्यतिरिक्त ह्या योजनेअंतर्गत आपणास राईडर लाभ,कर लाभ असे अनेक इतर फायदे देखील मिळतात.

अणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही योजना सध्या खुप चर्चेत आहे.कारण ह्या योजनेने सुरूवातीलाच फक्त दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत पन्नास हजार पेक्षा जास्त पाॅलिसींची विक्री केली आहे.त्यामुळे ही योजना खुप लोकप्रिय होत आहे.

ही योजना एल आयसी ह्या सर्वांचा अधिकतम विश्वास असलेल्या विमा कंपनीने बाजारात आणली आहे.म्हणुन ही योजना सर्व जण अधिक प्रमाणात खरेदी करताना दिसुन येत आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने एल आयसी जीवन आझाद ही पाॅलिसी कधी सुरू करण्यात आली होती?

भारतीय आयुर्विमा महामंडळाने एल आयसी जीवन आझाद पाॅलिसी ही योजना १९ जानेवारी २०३३ रोजी सुरू करण्यात आली होती.

एल आयसी जीवन आझाद पाॅलिसीचे उद्दिष्ट काय आहे?

सर्व एल आयसी मधील गुंतवणुकदारांना हया योजनेअंतर्गत संरक्षण अणि बचत असे दुहेरी लाभ प्राप्त व्हावे यासाठी ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडुन‌ सुरू करण्यात आली आहे.

एल आयसी जीवन आझाद पाॅलिसीचे स्वरुप

जर एल आयसी जीवन आझाद पाॅलिसी विकत घेणारया पाॅलिसीधारकाचा पाॅलिसीची मुदत संपण्याच्या आत मृत्यू झाला तर त्याच्या नाॅमिनीला यात मृत्यू लाभ दिला जातो.

अणि समजा पाॅलिसी धारक पाॅलिसीची मुदत संपण्याच्या कालावधी पर्यंत जीवंत राहीला तर त्यास परिपक्वता लाभ देखील दिला जातो.

एल आयसी जीवन आझाद पाॅलिसी पात्रतेचे निकष –

● प्रवेश वय किमान ९० दिवस कमाल ५० वर्ष 

● मॅच्योरीटी वय किमान अठरा वर्षं अणि जास्तीत जास्त ७० वर्ष

● पाॅलिसी अवधी १५ ते २० वर्ष

● प्रिमियम भरण्याची् मुदत पाॅलिसी टर्म वजा ८ वर्ष

● मुळ विमा रक्कम २ लाख ते ५ लाख 

एल आयसी जीवन आझाद पाॅलिसीचे फायदे –

● एल आयसी जीवन आझाद पाॅलिसीमध्ये पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास,ही योजना मृत्यूवर विम्याची रक्कम देते ही मृत्यूवरील विम्याची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या किंवा मूळ विमा रकमेच्या 7 पट जास्त असते.

● पॉलिसीची ठरलेली मुदत यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर,पाॅलिसीधारकाला मॅच्युरिटीवर विमा रक्कम दिली जाणार आहे.

● एल आयसी जीवन आझाद अंतर्गत भरलेला प्रीमियम कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे.  तसेच,प्राप्तिकर कायदा,1961 च्या कलम 10D(D) अंतर्गत परिपक्वता आणि मृत्यू लाभाची रक्कम देखील करमुक्त आहे.

योजने अंतर्गत मिळणारे इतर पर्यायी फायदे –

एलआयसी जीवन आझाद पाॅलिसी अंतर्गत पाॅलिसी धारकास अनेक पर्यायी फायदे प्राप्त होतात ज्याद्वारे पॉलिसीधारक अतिरिक्त प्रीमियम भरून त्यांचे कव्हरेज वाढवू शकतात.

एल आयसी जीवन आझाद योजना पाॅलिसीधारकास तीन अतिरीक्त रायडर आॅफर करते.

● अपघात झाल्यास,अपघाती लाभाची विमा रक्कम हया योजनेअंतर्गत लाभार्थीला एकरकमी दिली जाते.

● अपघाताच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत अपघातामुळे अपंगत्व आल्यास,अपघाती लाभाच्या रकमेइतकी रक्कम 10 वर्षांसाठी समान मासिक हप्त्यांमध्ये दिली जाते.  

● अपघातामुळे अपघाती अपंगत्व आल्यास, भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जातात.

● अपघाती मृत्यू झाल्यास, मूळ योजनेच्या मृत्यू लाभासह अपघाती लाभाची विमा रक्कम एकरकमी दिली जाईल.

●  एल आयसी प्रीमियम माफी लाभ रायडर या रायडर अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर,मूळ पॉलिसीचे प्रलंबित प्रीमियम्स जे मृत्यूच्या तारखेला देय आहेत आणि त्यानंतर रायडरची मुदत संपेपर्यंत माफ केले जातील.

● पॉलिसी अंतर्गत,एखाद्याला एकरकमी पेमेंटऐवजी 5 वर्षांपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ मिळण्याचा पर्याय आहे.वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक भरावे लागणारे हप्ते विविध पेमेंट निकषांसाठी किमान हप्ता रक्कम म्हणून दिले जाऊ शकत नाहीत.

हप्ता भरण्याची पद्धत अणि किमान हप्त्याची रक्कम –

मासिक -५ हजार

त्रैमासिक १५ हजार

सहामाही -२५ हजार

वार्षिक -५० हजार 

●  पॉलिसी अंतर्गत,पॉलिसीधारक 5 वर्षांपेक्षा जास्त हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट प्राप्त करणे निवडू शकतो. यात वार्षिक,अर्धवार्षिक,त्रैमासिक किंवा मासिक निवडलेल्या अंतराने हप्ते आगाऊ भरले जातील.

हप्ता भरण्याची पद्धत अणि किमान हपत्याची रक्कम –

मासिक -५ हजार

त्रैमासिक १५ हजार

सहामाही -२५ हजार

वार्षिक -५० हजार 

एल आयसी जीवन आझाद पाॅलिसी विषयी जाणुन घ्यायच्या काही महत्त्वाच्या बाबी-

१८ वर्षासाठी पाॅलिसी विकत घेतल्यावर पाॅलिसी धारकास १० वर्ष प्रिमियम भरावा लागेल.यात २ लाख ते ५ लाख इतकी विम्याची रक्कम प्राप्त होते.ही पाॅलिसी आपणास १५ ते २० वर्षासाठी खरेदी करता येईल.