दगडू ची इंग्रजी

दगडू हा पृथ्वीतलवार आढळणारा घन पदार्थ आहे हे आपणास माहीत असले तरी ते नेमके काय असते हे लेखक लांकांना सांगायची सवयच असते. त्या सबयीनुंसार आपणास सांगुन एक छोटासा विनोद निमीतीचा प्रयत्न केला आहे. पण मला ज्या दगडाचे वर्णन करावयाचे आहे तो या पृथ्वीबरचा दगड नसून या पासून तयार झालेले ते एक, चिखलदरा या कार्यक्षेत्रावरील मजूराचे नांब आहे कारण त्याचे नांब ‘दगडू’ असे होते. हा दगडू अगदी वैशिष्टपूर्ण स्वभावाचा होता असे म्हणावयास हरकत नाहो. तो जरी आदिवासी भागातला असला तरी त्यास अधूनमधून इंग्रजी बोलण्याची हृक्को येत असे. तसे त्यास त्या चिखलदरा परिसरात कोण्या एका पाद्रयाने इंग्रजी शिकविले होते असे म्हणतात.

याने इंग्रजी शब्द बापरला की खरा इंग्रजीतील शब्द काय आहे याचा सोयिस्कर विसर पडत असे. एकदा त्याला विचारले – “काय रे तुझे इतरांशी पटत नाही काय ?”

तेंव्हा तो चटकन म्हणाला, “सर त्यांचे ब माझे बजेटच जुळत नाही. मौ म्हटले कां

बरं! कारण की मो केंव्हाही त्यांच्याशी कांरसपॉन्डस केला को ते माझ्यापासून दूर पळतात.”

“मग तुझे बायांशी कसे पटते?”

“त्याचं काय आहे सर मी प्रत्येक बाइच्या घरी जावू जावू कॉरसपांन्डस करत

असतो.”

‘बरं जा आता बाजारात जा. आणि भाजीचं घेवून ये.

“सर मी कशाने जाव्‌?”

“पेदल किंबा दूचाकीने जा.”

दूचाकी समजण्याएवढी मराठी त्यास येत नसल्यामुळे तो मला म्हणाला, “सर

आपण सायकल असा साधा मराठो शब्द कां बापरत नाही?”

‘बरं जा आता. सर शॉर्ट कटोंगनं जावू की टावर रोडने जावू?

मी म्हटले “जा टायर रोडने जा नाहीतर टायगर रोडने जा पण भाजीचं आणं..”

“भाजीचं काय आणू ?”

“जे स्वस्त आहे ते घेवून ये या साइंटबर आपल्याला इनकम नाही आउटगोईंगच आहे.”

तो सर्वांत स्वस्त भाजी म्हणजे नेहमी कांबडीच आणायचा. तो गेल्यानंतर मात्र मी त्याने वापरलेल्या सर्व शब्दांचा अभ्यास करीत असे. तो टायर रोड नसून इंग्रजीतील टी ए आर, टार म्हणजे डांबर, टार रोड म्हणायचे असेल असा उगीच तर्क करोत होतो.

See also  आँक्शन म्हणजे काय? Auction meaning in Marathi

कटींग म्हणजे आखूड रस्ता, जसे की आपण कटांग करतो म्हणजे केस आखूड करतो वगेरे, नानाप्रकारचे तर्क वितरक तो मला करायला लावून माझ्या टाळक्यास विनाकारणच त्रास देत असे.

टाळक्‍्या ऐवजी मी डोके म्हटलेले नाही कारण त्याचे समोर मला नेहमी डोके नसल्याचाच भास होत असे. आता यात बिचा-या दगडूचा मला कधीच दोष वाटत नव्हता कारण सुशिक्षीत महिला सूध्दा कधीकधी ती पसं मला परवडेबल नव्हती असेच म्हणतांना आढळते.

वास्तविक एबल हा प्रत्यय इंग्रजीतला आहे तो मराठीला लावता येतो म्हणून काय लावत सुटायचे. ब हे सोंडा आपण मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतो. मग ती मुले बंग भरतांना चक्क म्हणतात, कामाकामाची पुस्तके बंगमध्ये भरतो व अनकामाची घरीच ठेवतो. मलाही सुरूवातीला इंग्रजी बाचनाची फार आवड होती त्यामुळे एखादे इंग्रजी वाक्य चूकून ओघाओघाने बॉस समोर वापरल्या गेले तर त्यांना उगीच वाटायचे कौ मीत्यांचे समोर शिष्टपणा करतो. तेंव्हापासनू शक्‍यतोंबर इंग्रजी बोलणे टाळतो. पण माझा दगडू मात्र माझ्याशी नेहमी इंग्रजी शब्दामध्येच बोलतो.

काय होतं को आपल्या भारतात काही शब्द इंग्रजीमध्ये म्हटले तर मग भाषेमध्ये काहीतरी प्रभाव टाकल्या सारखे वाटते.

आता बघा ना… एकदा एका लग्नात मी गेलो. त्यांना वाटले असावे की ही व्यक्‍ती इंजिनिअर आहे मग हयांचे समोर इंग्रजी शब्द वापरायला काही हरकत नाहो.. ती व्यक्‍ती माझ्याशी बोलतांना फार इंग्रजी शब्द वापरत होती.

जसे को …. साहेब माझे बेडिंग लास्ट इयरला झाले … आपण डावरी वगेरे घेतली नव्हती पण मुलगी फॉप्टीन्थ शिकली होती …. बय तसे बिलो एजच होती…लवकरच आम्हाला डयुएट झाले त्यात एक बाय झाला ब दुसरी डॉटर मग मौ सूध्दा त्यांना सजेशन दिले …म्हटले एकाला वार्डबॉय  करा व दुसरीला डॉक्टर करा. पण त्यास सजेशन न समजल्याने त्याने दोन्ही बाळास इंजेक्शन दयायला नेले.

See also  महाराष्ट्र राज्या विषयी जाणुन घ्यायची काही रोचक तथ्ये Amazing facts about Maharashtra state in Marathi

ब मला दुस-या दिवशी म्हणाला, साहेब तुमच्या म्हणण्यानुसार मी बोथ मुलांना सजेशन देवून आणले. कसे काय दिले तर म्हणे … फस्ट टाइम असल्याने मी डॉक्टर सडल्यानुसार पोरायले सबमीटच केले …. कां बरं.. गर्दी बगैरे होती कौ काय …हो थोडी फार होती म्हणून स्टॅडोंगमध्ये उभाच होतो. नंबर कबा लागते याचा थांबून वेट करत होतो. डाक्टर वयखीचे होते नां ! मनीपैसा

आता कशाला आमचे सर्वच कर्मचारी नेहमी म्हणतात गव्हमेंटचा जी. आर. , अनं लिव्हची सुटटी,भिंतीचे वाल कंपाऊंड वगेरे मग बिचा-या माझ्या दगडूचा काय दोष.

दगडूचो इंग्रजी सोडा मला तर धड मराठी समजत नाही. मी विदर्भातला असल्याने नूकताच बदलून नाशिकला आलो प्रत्येक आंटोबाल्यांना ऑटो …ऑटो.. म्हणून थकलो पण एकही ओंटोबाला थांबत नव्हता. एक भला मनुष्य माझेजबळ आला म्हणाला साहेब, ऑटो … ऑटो म्हणू नका रिक्शा.. रिक्शा म्हणा.. मी म्हटले रिक्शा कोठे आहे येथे. त्याने माझे डोळे न्याहाळून पाहले

…त्याला वाटले … आंधळे आहेत कौ काय …मी आंधळा नाही हौ खात्री पटल्यावर तौ व्यक्‍ती

मला म्हणाली आपण असे कां बरे करीत आहात… मौच त्यांची व्यया समजलो ब म्हटले आमच्याकडे सायकल रिक्‍्शाला रिक्शा म्हणतात म्हणून मी रिक्शा म्हटले नाही. तेव्हा मला येथे सायकल रिवशा नसल्याचा शोध लागला. त्यानंतर मला ब-याच शब्दांचा इकडे शोध लागला जसे कौ,

फडा नव्हे शिरई,

दुधाची चंदी नव्हे उकडा,

देखावा मस्त नव्हे सुंदर,

बाई नव्हे मावशी,

भाजीएक पाब नव्हे पाबशेर, आहे म्हणावयाचे नाही …फक्त काय हे ! असेच म्हणावयाचे. बरे झाले मी दगडूला इकडे आणले नाही… मला तर वाटते या नोकरशाहीमध्ये माझ्यासारख्यांना असे लांब फेकायचे असल्यास त्या त्या प्रदेशाची नोकरशाहीत डिक्शनरी दयाबयास हवी… अहो.. डिक्शनरीनाही …शब्दकोश, टायटल साँग नाही शीर्षक गीत. अंगाबर वाहन ठेपले नाही …धडकले.. वगेरे..

See also  Organic farming - परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत सेंद्रिय शेती

आता थोडी जनसामान्याची इंग्रजी बघू.

क्रीम नाही स्क्रौम, टाईल्स नाही स्टाईल,

कंपाऊंड बाल नाही बाल कंपाऊंड,

अनाउन्स नाही अलाउन्स,

वेपर्स नाही पेपसं मंगलोर टाइल्सनाही बंगलोर कौलं,

 याशिवाय परवडेबल, सरंडर लिव्ह च्या ऐवजी सलेंडर लिव्ह.

बेस्ट झालंऐवजी बेस झालं इत्यादी. म्हणजे आपण किती इंग्रजाळलेलो आहोत हे लक्षात येते. आता माझ्याचतर पुस्तकात बरेच इंग्रजी शब्द आहेत कारण मो ते मुद्दाम वापरले आहेत त्याशिवाय प्रभाव पडतनाही. स्वत:च्या भाषेतील शिव्यासूध्दा मृदू असतात पण हिंदी भाषेतील शिव्या कशा प्रभावीवाटतात, नाही कां? आता एक साधा प्रश्‍न तुम्हास विचारतो त्याचे उत्तर शोधून ठेवा तोपर्यंतपुढील प्रकरणाकडे वळू. सर्वांचीच मुले आजकाल कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. तेव्हा के. जी. १ व २ला आपला मुलगा जातो. आता के. जी. म्हणजे काय? याचा खरा लाँग फार्म काय? कृपयाआपल्या मुलास विचारू नका. फक्त आपल्या मित्रांनाच विचारा.

भाषेची धन्य वाट!

सदरील लेख हा लेखक प्रकाश राऊत ह्यांच्या नोकरशाहीतील बाळूच्या गंमतीजमती ह्या पुस्तकातील असून .संपूर्ण पुस्तक वाचण्याकरता खालील लिंक वर क्लिक कारवे.

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या http://www.esahity.com ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.

copyrightबाळूच्या गंमतीजमती या पुस्तिकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पूनर्मुद्रण किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई (दंड व तुरुंगवास) होऊ शकते.