महामृत्यूंजय मंत्राचा अर्थ अणि महत्व – Mahamrityunjay Mantra Meaning And Importance In Marathi

महामृत्यूंजय मंत्राचा अर्थ अणि महत्व Mahamrityunjay Mantra Meaning And Importance In Marathi

आज आपण महामृत्युंजय मंत्राचा अर्थ अणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत.

ऊँ त्रयंबकम यजामहे सुगंधी पृष्ठी वर्धनम उर्वा रुकमिव बंन्धना मृत्योमुक्षीय यमाममृतात ह्या मंत्राची त्रषी मार्कडेय यांनी रचना केली होती.

महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख त्रग्वेदात देखील करण्यात आला आहे.ह्या महामृत्यूंजय मंत्राचा जप करून आपण शिवशंकराची कृपा प्राप्त करू शकतो.

महामृत्यंजय मंत्राची अनेक नावे अणि प्रकार आहे यालाच आपण रूद्रमंत्र असे देखील म्हणत असतो.

महामृत्युंजय मंत्राचे महत्व,फायदे –

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आपला अकाली मृत्यु होत नसतो.अणि मृत्युचे भय आपल्या मनातुन निघून जाते.कारण हा मंत्र मृत्युवर विजय प्राप्त करणारा प्राणरक्षक मंत्र आहे.ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला दीर्घायुष्य अणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होती.

ह्या मंत्राचा जो जप करतो त्याच्यावर सदैव महादेवाची कृपादृष्टी राहत असते.एखाद्या व्यक्तीचे गेलेला जीव परत आणण्याची ताकद ह्या महामृत्यंजय मंत्रात आहे.

महामृत्यंजय मंत्राचा जप केल्याने नकारात्मक अणि वाईट शक्तींपासुन आपले रक्षण होते.शरीरातील आजार दुर होतात.

प्रवासात ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा याने आपला प्रवास सुखाचा आनंददायी अणि निर्विघ्न पणे पार पडतो.आपल्या मनातील वाईट विचार अणि सर्व भीती नाहीशी होते.

महामृत्यंजय मंत्राचा अर्थ-

हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्व जण तुझी पुजा आराधना करतो.जो आमचे पोषण करतो,ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातुन मुक्त होत असतात.त्याचप्रमाणे आम्ही मृत्यु अणि नश्वरतेपासुन मुक्त होऊ.

हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणारया मृत्युच्या विळख्यातुन आम्हास बाहेर काढ.अणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर.आम्ही हा संसार सोडुन तुझ्या चरणाशी येऊ अणि अमर होऊ असा तु आम्हाला आशीर्वाद दे.

See also  आय यु आय उपचारा विषयी माहीती IUI treatment information in Marathi

महामृत्युंजय मंत्राची महिमा –

जर आपण ह्या मंत्राचा जप केला तर याच्या ध्वनीचे कंपन होऊन आपल्या देहाच्या अवतीभोवती दैवशक्ति दवारे एक अदृश्य दिव्य कवच तयार होत असते.

ह्या दिव्य कवचामध्ये एकुण तेहवीस देवता समाविष्ट असतात.जे ह्या मंत्रामधल्या तेहतीस अक्षरांनी दर्शविले जातात.

ह्या सर्व तेहतीस देवतांमध्ये आठ वसु,अकरा रूद्र अणि बारा आदित्य,एक प्रजापती एक षटकार यांचा समावेश असतो असे धर्मशास्त्रात देखील सांगितले गेले आहे.

जो साधक हे कवच धारण करतो त्याचे सर्व ईडा पिडा बाधेपासुन रक्षण होते.शिवाय तो जे कार्य करतो त्यात त्याला यशाची प्राप्ती होत असते.

कमीत कमी 27 वेळा ह्या मंत्राचा जप करावा असे विधान आहे.

महामृत्यंजय मंत्राचा जप कधी करावा?

● जेव्हा आपण एखाद्या दुर्घटनेत सापडलेलो असेल एखाद्या संकटांत सापडलो असेल तेव्हा आपण ह्या मंत्राचा जप करायला हवा.

● अंगाचा थरकाप होऊन भीती वाटत असेल तेव्हा ह्या मंत्राचा जप करावा.

● रात्री झोपेत वाईट स्वप्र पडुन अचानक डचकुन उठण्याची समस्या असेल तर आपण हा मंत्र जपायला हवा.

● आपण आजारी आहात अणि औषधपाणी करूनही बरे होत नाहीये तर अशावेळी आपण महामृत्यंजय मंत्राचा जप करायला हवा.

● घरासमोर लावलेली झाडे वनस्पत्या आपोआप वाळु लागल्यास आपण ह्या मंत्राचा जप करावा.

● एखाद्या विषया बाबतीत चिंतित असाल तर अशा वेळी महामृत्यंजय मंत्र जपावा.