आय यु आय उपचारा विषयी माहीती IUI treatment information in Marathi

आय यु आय उपचारा विषयी माहीती IUI treatment information in Marathi

आय यु आयचा फुलफाँर्म काय होतो?IUI full form in Marathi

आय यु आयचा फुलफाँर्म Intrauterine insemination असा होत असतो.

आय यु आय म्हणजे काय?IUI meaning in Marathi

आय यु आय ही सुदधा एक उपचार पदधत आहे जिचा वापर करून कुठलीही संतान नसलेले अपत्यहीन जोडपे देखील आईवडील बनण्याचे सुख प्राप्त करू शकते.कुठल्याही विवाहीत अणि संतानहीन स्त्रिला गर्भधारणा करता येत असते.

यामध्ये एका पातळ नळीचा वापर करून धुतलेल्या चांगल्या अणि सक्रीय शुक्राणुंना गर्भाशयाच्या मुखावाटे स्त्रीच्या गर्भाशयात टाकले जात असते.

आय यु आय उपचार करण्याअगोदर कोणकोणत्या महत्वाच्या टेस्ट केल्या जात असतात?which IUI test you have to be done before IUI treatment in Marathi

आय यु आय ट्रिटमेंटला सुरूवात करण्यापुर्वी डाँक्टर काही महत्वाच्या टेस्ट घेत असतात.

पहिली टेस्ट –

यात सगळयात पहिले ट्रान्स वेजीनल सोनोग्राफी केली जात असते.ज्यात हे बघितले जाते की अंडाशयामधील अंडयाची संख्या एकुण किती आहे?त्या अंडयांच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जाते.यात त्या अंडयांच्या वाढीचे देखील निरीक्षण करण्यात येत असते.

See also  ढग म्हणजे काय ? ढगांचे प्रकार -Types Of Cloud In Marathi

यात इंडोमेट्रियम गर्भाशयाचे अस्तर,त्यातील वाढीची पदधत,रक्तप्रवाह कशा पदधतीने होतो आहे हे पाहिले जात असते.फेलोपियन टयुब म्हणजेच गर्भाशयाची नळी बघितली जाते.

प्रत्येक स्त्रीला दोन टयुब म्हणजेच नळया असतात.पण आय यु आय ट्रिटमेंट करण्यासाठी किमान तिची किमान एक नळी तरी उघडी असणे आवश्यक मानले जाते.

दुसरी टेस्ट –

दुसरी टेस्ट मध्ये Hysterosalpingogram म्हणजेच एच एस जी यात महिलेच्या गर्भाशयामध्ये डाई टाकल्या जात असतात.अणि एक्स रे काढुन चेक केले जात असते की नळया उघडया आहेत की नाही हे तपासले जात असते.

हे सामान्यत मासिक पाळीच्या आठ ते दहा दिवसांच्या दरम्यान करण्यात येत असते.

तिसरी टेस्ट –

तिसरया टेस्टमध्ये शुक्राणुंची गतिशीलता किती आहे शुक्राणुंची संख्या किती आहे?ह्या काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या जात असतात.

यात शुक्राणुंची संख्या पाच ते दहा मिल्यन पर एम एल इतकी असणे गरजेचे असते.

आय यु आय उपचाराची संपुर्ण प्रक्रिया IUI treatment process in Marathi

यात पुरूष वर्गाला किमान सात ते आठ दिवस आहाराच्या बाबतीत डाँक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे गरजेचे आहे.

टेस्टसाठी क्लिनिक मध्ये गेल्यावर आपल्या विर्याचा शुक्राणुंचा नमुना एका निजर्तुक बाटली मध्ये सँपल म्हणुन आपणास सर्वप्रथम द्यावा लागत असतो.

संँपल घेऊन ते तयार करायला किमान दीड तासाचा कालावधी लागत असतो.

धुतलेले शुक्राणु हे किमान २४ ते ८२ तास इतका कालावधी जिवंत राहत असतात.पण ह्या शुक्राणुंची शक्ती सुमारे २४ तासांनंतर नष्ट होऊन जात असते.

तयार केलेल्या सँपल मध्ये किमान एक मिल्यन पर एम एल इतके शूक्राणु असणे गरजेचे मानले जाते.

पण चांगला रिझल्ट हवा असल्यास यांची ५ ते १० च्या वर यांचे प्रमाण असावे लागते.यातच जर शुक्राणुंचे सँपल जर २० ते ३० मिल्यन पर एम एल इतके असेल तर रिझल्ट अधिक चांगला हाती येण्याची दाट शक्यता असते.

See also  दही आणि योगर्टमधील फरक- Difference Between Curd And Yogurt In Marathi

आय यु आय ट्रिटमेंट कोण नाही करू शकत?

● ज्यांच्यात शुक्राणुंची संख्या खुपच कमी आहे.ते डोनर शुक्राणुची मदत घेऊन मुल जन्माला घालु शकतात.

● ज्या महिलांच्या गर्भाशयाच्या दोन्ही नळ्या काही कारणास्तव बंद झालेल्या आहेत, बांधल्या गेल्या आहेत किंवा काढल्या गेल्या आहेत.

● ज्यांच्यामध्ये अंडी अजिबात तयार होत नाहीत.

आय यु आय ट्रिटमेंट करण्याची सर्वोतम वेळ कोणती?

आय यु आय हे साधारणत ओव्हँल्युशनच्या सहा ते सात तास आधी किंवा नंतर केले जात असते.ओव्हल्युशन म्हणजे बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया होय.ज्यास अंडमोचन असे देखील म्हणतात.

एचसीजी इंजेक्शन देऊन झाले की चोवीस ते छत्तीस तास एवढया कालावधीनंतर आय यु आय करण्यात येत असते.

यातही एकदा आय यु आय करताना एचसी जी चे इंजेक्शन देऊन झाले की छत्तीस तासानंतर आय यु आय करण्यात येते.

पण दोनदा आय यु आय करताना दोघांमध्ये बारा बारा तासाचे अंतर ठेवले जाते.

आय यु आय केल्यानंतर किती दिवसांच्या कालावधीत महिलेस गर्भधारणा होत असते?

आय यु आय केल्यानंतर एका आठवडयात गर्भ येत असतो.अणि गर्भाशयाला चिकटत असतो.

एक महिला किती वेळा आय यु आय ट्रिटमेंट करू शकते?

औषध घेऊन झाल्यानंतर आय यु आय केले जात असेल तर एक किंवा दोन वेळेस.यानंतरही आपण तीन चार वेळा इंजेक्शन घेऊन आय यु आय करू शकतो.

आय यु आय केल्यानंतर रक्त वाया जाते का?वेदना होत असतात का?

आय यु आय ट्रिटमेंट दरम्यान सहसा रक्तस्राव होत नसतो.पण काही वेळा ओव्हँल्यूशन मुळे रक्त स्राव होण्याची पोटात क्रँम्प पडण्याची देखील संभावना असते.

अशा परिस्थिति मध्ये जाँब करणारया महिलांना दोन तीन दिवस सुटटी घेण्याची गरज पडु शकते.

आय यु आय उपचाराचा खर्च IUI treatment cost in Marathi

आय यु आय उपचाराचा खर्च उपचार करत असलेल्या जोडप्याचे वय,वंध्यत्वाचा प्रकार,जुनी मेडिकल हिस्टरी यावर अवलंबुन असतो.

See also  NGO म्हणजे काय ? NGO information in Marathi

प्रत्येक राज्यात आय यु आयच्या उपचाराचा खर्च देखील सुख सुविधा नुसार वेगवेगळा असतो.

पण साधारणत आय यु आय ट्रिटमेंटसाठी भारतात किमान बारा ते सोळा हजार इतका खर्च लागत असतो.
हा खर्च आयव्हीएफ पेक्षा कमी महागडा असतो.

आय यु आय सक्सेस रेट IUI success rate in Marathi

आय यु आयचा सक्सेस रेट पुर्णपणे शुक्राणुंच्या कार्यक्षमतेवर अवलंबुन असतो.

काही महिलांना यात एका सायकलनंतर सक्सेस मिळण्याची दहा ते वीस टक्के इतकी शक्यता असते.

तीन ते सहा सायकल पुर्ण झाल्यानंतर ह्या सक्सेस रेटमध्ये ऐंशी टक्के इतकी वाढ होत असते.