ढग म्हणजे काय ? ढगांचे प्रकार -Types Of Cloud In Marathi

ढगांचे प्रकार- Cloud And Types Of Cloud In Marathi

आज आपण स्पर्धा परीक्षेत समाविष्ट असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेत ज्यावर प्रश्न विचारले जात असतात अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर माहीती जाणुन घेणार आहोत.

आणि तो महत्वाचा मुददा म्हणजे ढग आणि ढगांचे प्रकार.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या आजच्या मुख्य मुददयाकडे वळुया.

ढग म्हणजे काय असते?= What Is Cloud In Marathi

वातावरणातील सुक्ष्म जलकणांच्या तसेच जलकणांच्या संचाला ढग असे म्हटले जाते.उध्वगामी प्रवाहामुळे ढग हे हवेत तरंगत असतात.

ढगांचा आकार हा सतत बदलत असतो.कोरडया हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्या भागातील जलबिंदुचे बाष्पीभवन होत असते.

कमी उंचीवर ढगांचा आकार मोठा तसेच अधिक जास्त उंचावर त्यांचा आकार हा लहान होत असतो कारण समुद्रसपाटीपासुन उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी कमी होत जात असते.

हवामानशास्त्रात दिलेल्या ढगाच्या व्याख्येनुसार :

ढग हे एक एरोसोल असतात.ज्यामध्ये दृश्यमान तसेच वस्तुमान असलेले सूक्ष्म द्रव थेंब,गोठलेले क्रिस्टल्स किंवा ग्रहांच्या शरीराच्या किंवा तत्सम जागेच्या वातावरणात निलंबित करण्यात आलेले इतर कण समाविष्ट असतात.

ढगांचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Clouds In Marathi

जेव्हा आपण ढगांचे नीट निरखुन निरीक्षण करतो तेव्हा उंचीनुसार आपणास ढगांचे तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण करता येते.

1) अती उंचावर असणारे ढग :

2) मध्यम उंचीवर असणारे ढग :

3) खुप कमी उंचीवर असणारे ढग :

1)अती उंचावर असणारे ढग :

अती उंचीवर असलेल्या ढगांची उंची साधारणत सात हजार ते चौदा हजार दरम्यान असते.अती उंचावर असणारे ढग हे हिम स्फटिकांपासुन तयार झालेले असतात.त्यांच्या अवतीभोवती तेजोमंडलाचे आवरण देखील असते.

See also  ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi

अती उंचीवर असणारया ढगांचे पुढील काही तीन प्रमुख प्रकार असतात-

1)सिरस :

2)सिरोस्ट्रँटस :

3) सिरोक्युमल्स :

1)सिरस :हे ढग तंतुमय असलेले आपणास आढळुन येतात.

2) सिरोस्ट्रँटस : हे ढग दिसायला लहान लहान लाटांच्या समुहासारखे असतात.

3) सिरोक्युमल्स : हे ढग दिसायला एकदम एखाद्या वळया पडलेल्या चादरीच्या सारखे असतात.

2) मध्यम उंचीवर असणारे ढग :

मध्यम उंचावर असणारया ढगांची उंची ही साधारणत दोन हजार ते सात हजार दरम्यान असलेली आपणास आढळुन येते.

मध्यम उंचावरील ढगांमध्ये पुढील काही ढगांचा समावेश होतो-

1) अल्टोक्युमलस :

2) अल्ट्रो स्टेटस :

1)अल्टोक्युमलस :

ह्या ढगांचे स्वरूप स्तरीय स्वरूपाचे असते.यांची रचना ही एकदम तरंगाप्रमाणे असते.ह्या ढगांचा रंग हा पांढरा असतो आणि यात करडया रंगाच्या छटा देखील असतात.

2) अल्ट्रो स्टेटस :

ह्या ढगांमध्ये कमी जाडी असलेले थर असतात.यातुन आपण सुर्यदर्शन होत असते.पण हे सुर्यदर्शन दुधी काचेतुन पाहिल्याप्रमाणे दिसत असते.

3) खुप कमी उंचीवर असणारे ढग :

खुप कमी उंचावर असणारया ढगांची उंची ही साधारणत किमान दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी असलेली आपणास आढळुन येते.

खुप कमी उंचावरील ढगांमध्ये पुढील काही ढगांचा समावेश होतो-

1)क्युमुलोनिंबस :

2) स्ट्ँटस :

3) निम्बोस्ट्रेटस :

4)स्ट्रँटोक्युमोलस :

5) क्युमोलस :

1)क्युमुलोनिंबस :

ह्या ढगांचा रंग हा काळा असतो आणि हे दिसायला एकदम घनदाट असतात.ज्यामुळे ते एखाद्या पर्वतासारखे दिसत असतात.

ह्या ढगांचा कडकडाट होत असतो आणि यातुन विजा देखील चमकत असतात.

ह्या प्रकारच्या ढगांमुळे वादळी पाऊस पडत असतो तसेच यात आपणास गारपीट देखील पाहायला मिळत असते.पण ह्या ढगांमुळे जो पाऊस पडतो तो खुप अधिक वेळ टिकत नसतो.

आणि इतर ढगांच्या तुलनेत यातुन जो पाऊस पडत असतो त्यातील पावसाचे थेंब हे अधिक मोठे असतात.जेव्हा ढगामधील हवा ही खुप गार असते तेव्हा अशा परिस्थितीत हे थेंब गोठत असतात.आणि गारांच्या रूपामध्ये खाली जमिनीवर पडत असतात.

See also  माती च शेतीतल महत्व - भाग -01 Importance of soil in agriculture Marathi - संकलन:- अनंत जुगेले,कृषी अधिकारी

2) स्ट्ँटस :

ह्या ढगांचा रंग हा राखाडी असतो.व यांचा तळा कडचा भाग हा दिसायला एकसारखा असतो.ह्या ढगांमध्ये थर देखील असलेले आपणास आढळुन येते.

3) निम्बोस्ट्रेटस :

ह्या ढगांचा थर हा जाड असतो.हे गडद आणि राखाडी रंगाचे असतात.

4)स्ट्रँटोक्युमोलस :

ह्या ढगांचा रंग हा पांढरा तसेच धुरकट स्वरुपाचा असतो.यामध्ये आपणास ढगांचे गोल आकाराचे पुंजके असलेले आढळुन येतात.

5) क्युमोलस :

ह्या ढगांचा विस्तार हा भुपृष्ठापासून पाचशे ते सहा हजार मीटर एवढया उंचीवर उभा विस्तार असलेला आपणास दिसुन येतो.

हे ढग आल्हाददायक हवेचे निर्देशक म्हणुन देखील ओळखले जातात.यांचा उभा विस्तार वाढल्यावर हे क्युमोलोनिंबस ढगांमध्ये रुपांतरीत होत असतात.आणि पाऊस पडत असतो.

सांद्रीभवन कशाला म्हणतात?

जेव्हा वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपामध्ये परिवर्तन होत असते तेव्हा त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेस सांद्रीभवन असे म्हणतात.

घनीभवन कशाला म्हणतात?

जेव्हा वातावरणातील बाष्पाचे घनरूपामध्ये परिवर्तन होत असते तेव्हा त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेस घनीभवन असे म्हणतात.

आद्रता कशाला म्हणतात?

हवेतील बाष्पामुळे हवेला जो ओलसरपणा प्राप्त होत असतो त्यालाच आद्रता असे म्हटले जाते.

आद्रतेचे देखील दोन प्रकार असतात:

1) सापेक्ष आद्रता :

2) निरपेक्ष आद्रता :