डाँक्टरांविषयी माहीती – डॉक्टर डे माहिती- Doctors Information In Marathi

डाँक्टरांविषयी माहीती Doctors Information In Marathi

आज समाजामध्ये डाँक्टरकडे खुप आदराने आणि सन्मानाने बघितले जाते कारण जेव्हा आपण एखाद्या आजारापुढे रोगापुढे हताश आणि निराश होऊन अक्षरश हात टेकून देत असतो.
तेव्हा ह्या अशा निराशेच्या परिस्थितीत आपल्याला एकच व्यक्ती आहे जो आशेचा किरण दाखवत असतो आणि तो व्यक्ती म्हणजे डाँक्टर.
आज आपण डाँक्टरांना देवाचा दर्जा देतो कारण तीच एक अशी व्यक्ती असते जी आपल्याला गंभीरातील गंभीर आजारातुन देखील बर करत असते.
मृत्युच्या दारातुन आपल्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनी सहीसलामत घेऊन येत असते.
आजच्या लेखात आपण ह्याच समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीमत्वाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Doctor म्हणजे कोण असतो? Who Is Doctor In Marathi

जेव्हा आपण आजारी पडतो किंवा आपल्याला बर वाटत नसते,आपले शारीरीक आणि मानसिक आरोग्य ठिक नसेल तेव्हा आपण उपचारासाठी ज्या व्यक्तीकडे जातो व त्याचाकडे कायद्यानुसार वैद्यकीय सेवा देण्याचा परवाना असतो ती व्यक्ती म्हणजे डाँक्टर.

डाँक्टरांचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात? Types Of Doctors In Marathi

मित्रांनो प्रत्येक आजार हा सारखा नसतो त्याची अलग अलग कारणे तसेच लक्षणे असतात जसे की दाताशी,डोळयाशी,हदयाशी संबंधित रोग विकार
जी एका सामान्य डाँक्टरांच्या लक्षात येत नसतात.
म्हणुन आपण कुठलाही आजार झाल्यावर त्याच्याशी संबंधित तज्ञ डाँक्टरांदवारेच आपला उपचार करून घ्यायला हवा.याने आपल्याला त्या आजारावर वेळ असताच लवकरात लवकर निदान करता येत असते.
कारण आपण उपचारासाठी त्या आजाराची रोगाची क्षेत्राची संपुर्ण माहीती असणारे आणि त्यावर यशस्वी उपचार निदान करणारया तज्ञ डाँक्टरांकडे ट्रिटमेंट केलेली असते.म्हणुन आपण त्या आजाराने गंभीर स्वरूप धारण करण्याच्या आधी त्या आजारातून लवकरात लवकर बरे होत असतो.
आज आपण काही अशाच विविध प्रकारच्या रोगांवर उपचार करत असलेल्या तज्ञ डाँक्टरांचे प्रकार जाणुन घेणार आहोत.
डाँक्टरांचे काही महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

See also  FDI म्हणजे काय? Foreign Direct Investment Marathi information

1)Cardiologist

Cardiologist हा हदयाचा डाँक्टर असतो ज्याला आपण इंग्रजीत(Heart Specialist)असे देखील म्हणतो.हे हदयाशी संबंधित आजारांवर उपचार करीत असतात.
भविष्यात आपल्याला हदयाशी संबंधित कुठलाही आजार जडु नये यासाठी आपण Cardiologist कडुन नियमित तपासणी करायला हवी.
जर आपल्या हाताच्या नसेमध्ये ताण जाणवत असेल छातीवर दबाव जाणवत असेल,थोडेफार चालल्याने देखील आपल्याला दम लागत असेल तेलगट पदार्थ अधिक खात असाल तर आपण एकदा आपण Cardiologist चा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.

2)Dentist/Orthodentist :

Dentist म्हणजेच दातांचा डाँक्टर.जर आपले दात किडलेले असेल दाढ दुखत असेल,दाढ काढायची असेल,दात दुखत असतील तसेच दाताशी संबंधित इतर कुठलीही समस्या असेल तर अशा वेळी आपण Dentist कडे उपचारासाठी जात असतो.
तसेच वाकडे असलेले दात सरळ करण्यासाठी आपण ज्या डाँक्टरांकडे जात असतो त्यांना Ortho Dentist असे म्हणतात.

3) Dermatologist :

Dermatologist म्हणजेच त्वचेचा डाँक्टर जे त्वचेशीसंबंधित कुठल्याही आजारावर उपचार करत असतात.

4) Gynecologist :

Gynecologist म्हणजेच स्त्रीरोगतज्ञ.जे महिलांना गर्भधारणेशी संबंधित असलेल्या कुठल्याही समस्यांवर आजारांवर उपचार करीत असतात.

5) Pediatrician :

Pediatrician म्हणजे लहान मुलांवर,नवजात शिशुंवर उपचार करणारे डाँक्टर.हे नवजात शिशुंना असलेले कुठलेही आजार,विकार तसेच श्वसनाशी संबंधित त्रास इत्यादींवर उपचार करीत असतात.
18 वर्षापर्यतच्या मुलांवर हे उपचार करीत असतात.

6) Neonatologists:

Neonatologists यांना आपण नवजात जन्मलेल्या शिशुवर,बाळावर उपचार करणारे डाँक्टर म्हणुन ओळखतो.
Podiatrist चा Advanced Course पुर्ण करून आपणास Neonatologists बनता येत असते.

7)Neurologist :

Neurologist हे मेंदुशी संबंधित आजारांवर उपचार करीत असतात.
हे मज्जासंस्थेशी,चेतासंस्थेशी निगडीत आजारावर विकारांवर उपचार करीत असतात.हे डाँक्टर अल्झायमर,मिरगी येणे इत्यादी समस्यांवर उपचार करण्याचे काम करतात.
जर आपल्याला चक्कर येत असतील,डोळयांसमोर अंधारया येणे,अशा समस्या असतील तर अशा वेळी Neurologist चा सल्ला नक्की घ्यायला हवा.

8) Oncologist :

Oncologist कँन्सर तज्ञ असतात जे कँन्सरशी संबंधित कुठल्याही आजारांवर विकारांवर उपचार करीत असतात.आणि कँन्सरग्रस्त रूग्णांवर उपचार करून त्यांना बरे करत असते.

9) Orthopedic Surgeon :

Orthopedic Surgeon म्हणजेच हाडांशी संबंधित आजारावर उपचार करणारा डाँक्टर.
हे हाडांचे आँपरेशन करणे,हाडे तुटल्यावर ती जोडणे तसेच हाडांशी संबंधित कुठल्याही आजारावर उपचार करणे हे Orthopedic Surgeon चे काम असते.
10)Ent Specialist :
Ent Specialist हे नाक,कान,गळयाशी संबंधित समस्यांवर आजारांवर उपचार करणारे तज्ञ असतात.
11) Psychiatrist :
Psychiatrist हे मानसिक रोग,विकार तज्ञ असतात जे कुठल्याही मानसिक आजारावर उपचार करण्याचे काम करत असतात.
ज्यांचे मानसिक संतुलन ठिक नाहीये ज्यांना काही मानसिक आजार आहे अशा व्यक्तींना Psychiatrist कडे दाखवले जाते.
हे आपल्याला कुठल्याही डिप्रेशन,ताणतणावापासुन मुक्त होण्यासाठी मदत करीत असतात.

See also  मनी मार्केट म्हणजे काय ? What is money market in Marathi

12) Radiologist :

हे X Ray,MRI Scan,CT Scan,Ultra Sound तज्ञ डाँक्टर असतात.
13) Urologist :
Urologist हे शौचालय लघवी संबंधित समस्यांवर कुठल्याही विकारांवर उपचार करत असतात.
संडास साफ न होणे कडक होणे बदधकोष्ठता इत्यादी शौचालयासंबंधित समस्या असल्यास आपण Urologist चा सल्ला घ्यायला हवा.
14)Gastro Entrologist :
Gastero Neurologist हे पोटाशी संबंधित कुठल्याही आजारावर,लिव्हर,इत्यादी संबंधित समस्यांवर आजारांवर उपचार करत असतात.
15) Nephrologists :
Nephrologists हे किडनीचा डाँक्टर असतो,हा किडनीशी संबंधित कुठल्याही समस्यांवर आजारांवर उपचार करत असतो.

16) Pulmonologist:

Pulmonologist हे श्वनाशी संबंधित कुठल्याही आजारांवर समस्येवर उपचार करणारा डाँक्टर असतो.
17) Ophthalmologist :
Ophthalmologist हे डोळयांशी संबंधित आजारांवर समस्यांवर उपचार करणारे तज्ञ असतात.
हे डोळयांशी संबंधित विविध आजारांवर समस्यांवर उपचार करीत असतात.
18) Anesthesiologist :
Anesthesiologist हे बधिरता,वेदना वगैरे न जाणवने यासंबंधीचे तज्ञ डाँक्टर असतात.म्हणजे हे डाँक्टर रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याआधी त्याला कुठलीही वेदना होऊ नये संवेदना जाणवू नये म्हणुन त्याला भुल देत असतात.म्हणजेच त्याचा शरीराचा तो भाग बधिर करत असतात.ज्याने रूग्णाला काहीच जाणवत नाही.
Anesthesiologist कडे आपल्याला जाण्याची आवश्यकता नसते जिथे आँपरेशन होणार असते त्या हाँस्पिटलमध्ये आधीपासुनच Anesthesiologist उपलब्ध असतात.

19) Endocrinologist :

Endocrinologist हे मधुमेह,थायरॉईड रोग,वंध्यत्व, वाढ समस्या,चयापचय विकार,इत्यादींचे तज्ञ असतात.
20) Hematologist :
Hematologist हे रक्त तसेच अस्थी मज्जेशी संबंधित कुठल्याही आजारांवर समस्यांवर उपचार करणारे डाँक्टर असतात.
21)Hepatologist :
Hepatologist हे लिव्हर स्पेशलिस्ट असतात जे लिव्हरशी संबंधित कुठल्याही आजारांवर समस्यांवर उपचार करणारे डाँक्टर असतात.
22) Sexologist :
Sexologist हे सेक्सशी संबंधित कुठल्याही आजारांवर समस्यांवर उपचार करणारे तज्ञ डाँक्टर असतात.
डाँक्टरांचे काम काय असते?(Duty Of Doctors In Marathi)
● कुठलाही रूग्ण उपचारासाठी डाँक्टरांकडे गेल्यावर डाँक्टर आधी त्याला चेक करतात.
● त्याच्या रोगाचे,आजाराचे मुख्य कारण काय आहे हे जाणुन घेतात त्यासाठी ते रूग्णाला काय त्रास होतो आहे?किती दिवसांपासुन त्रास होतो आहे?कुठे दुखत आहे त्रास होतो आहे?इत्यादी प्रश्न विचारत असतात.
● आणि मग त्याच्या आजाराचे कारण लक्षात आल्यावर त्याचे निदान करत असतात म्हणजेच त्या रूग्णावर उपचार करत असतात.त्याला आवश्यक ती इंजेक्शन देत असतात आणि काही गोळया औषधे देखील लिहुन देत असतात.ज्याने रूग्ण लवकरात लवकर बरा होईल.
● कुठल्याही आजाराचे मुळ कारण जाणुन घेण्यासाठी कधीकधी डाँक्टरांकडुन रूग्णांच्या काही महत्वाच्या मेडिकल टेस्ट देखील घेतल्या जात असतात.

See also  ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi

भारतात डाँक्टर दिवस कधी साजरा केला जातो?

भारतात डाँक्टर दिवस दरवर्षी
1 जुलै रोजी साजरा केला जातो.

डाँक्टर दिवस साजरा करण्यास भारतात आरंभ कधीपासून
झाला?

डाँक्टर दिवस साजरा करायला
भारतात 1991 मध्ये आरंभ केला गेला होता.

भारतात 1 जुलै रोजी डाँक्टर दिवस का साजरा
केला जातो?

भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी
डाँक्टर दिवस साजरा केला जात असतो.कारण ह्याच दिवशी भारतामधील एक विख्यात डाँक्टर ज्यांनी
मेडिकल क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे त्यांना श्रदधांजली वाहण्याकरीता

आणि सम्मान देण्याकरीता दरवर्षी
त्यांच्या जन्मदिनी 1 जुलैला साजरा केला जात असतो.

डाँक्टर दिवस का आणि कसा साजरा केला जातो?

प्रत्येक देशात अलग अलग तारखेला
डाँक्टर दिवस साजरा केला जात असतो.आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रात अमुल्य योगदान
दिलेल्या डाँक्टरांना या दिवशी पुष्पगुच्छ भेटवस्तु तसेच पुरस्कार देऊन सन्मानित केले
जात असते.

बिधान चंद्र राँय यांचा जन्म कधी आणि कोठे
झाला होता?

बिधान चंद्र राँय यांचा जन्म
1 जुलै रोजी 1882 सालामध्ये भारतात झाला होता.

बिधान चंद्र राँय कोण होते?

बिधान चंद्र राँय हे डाँक्टर
तसेच पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते.वैदयकीय क्षेत्रात आपले अमुल्य
योगदान देणारे भारतातील एक प्रसिदध डाँक्टर आहेत.

बिधान चंद्र राँय हे असे
प्रथम भारतीय व्यक्ती आहेत ज्यांनी गणित हा विषय घेऊन त्यात त्यांचे पदवीचे शिक्षण
पुर्ण केले.

याचसोबत बीसी राँय यांनी
कलकत्ता युनिव्हर्सिटी मधुन मेडिसिनचे शिक्षण देखील पुर्ण केले होते.

बिधान चंद्र राँय यांना कोणत्या पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले होते?

बिधान चंद्र राँय यांना भारत
सरकारकडुन त्यांच्या कार्याबददल भारतरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आला होता
.

बिधान चंद्र राँय यांचा मृत्यु कधी झाला?

बिधान चंद्र राँय यांचा जन्म
दिवस एक जुलै आणि त्यांना मृत्यु देखील 1जुलै रोजीच 1962 मध्ये झाला होता.वयोवर्षे
80 असताना ते मृत पावले.