अखेरीस आज मान्सुन केरळमध्ये दाखल महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन कधी होणार?- Maharashtra monsoon update in Marathi

मान्सुन केरळमध्ये दाखल महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन कधी ?Maharashtra monsoon update in Marathi

नेत्रत्य मान्सुन केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.

मान्सुनने केरळमध्ये दाखल व्हायला जरी काही दिवस म्हणजेच एक आठवडा उशीर केला असला तरी आज मान्सुन सक्रीय होण्यासाठी केरळमध्ये पोषक अणि अनुकूल असे वातावरण देखील निर्माण झालेले आहे.

त्यामुळे लवकरच राज्यात मान्सुनचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.आता महाराष्ट्र राज्यात मान्सुन कधी दाखल होईल याच्या प्रतिक्षेत महाराष्ट्र राज्यातील लोक आहेत.

मान्सुनचे आगमन होत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी झालेला दिसुन येत आहे.मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळ ह्या राज्यात मान्सुनने प्रवेश केला आहे.

Maharashtra monsoon update in Marathi

बहुतांश भागात आज ८ जुन रोजी सकाळपासून पाऊस पडायला सुरुवात देखील झाली आहे.केरळमध्ये १ जुन रोजी पाऊस नेहमी दाखल होत असतो पण ह्यावेळी पाऊसाचे आगमन व्हायला थोडा विलंबच झाला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले नवीन चक्रीवादळ बिपरजाॅय हे मुंबई शहरापासून ९१० किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे.पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिपरजाॅय ह्या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे पालघर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडुन वर्तवण्यात येत आहे.

समुद्रात वादळामुळे आठ ते नऊ मीटर इतक्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारी करत असलेल्या कोळी मच्छीमार लोकांना समुद्रापासून लांब अंतरावर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आता ह्या अरबी समुद्रातील बिपरजाॅय चक्रीवादळाचा येणारया मान्सुन वर काय अणि कसा परिणाम होतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मान्सून लागल्याने उकाड्याने सर्व नागरिक त्रस्त झाले होते पण आता पावसाचे आगमन होत असल्याने सर्वांना दिलासा प्राप्त झाला आहे.

विदर्भात असलेल्या काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

See also  आदीपुरुष - हे असले डायलॉग? -फॅन्सकडून चित्रपटाला बाॅयकाॅट करण्याची मागणी का ?why fans demand boycott of Adipurush after release

महाराष्ट्र राज्यात मान्सुनचे आगमन कधी होणार?

मान्सुन केरळ मध्ये दाखल झाल्यानंतर सात ते आठ दिवसांत महाराष्ट्रात येत असतो ह्या अंदाजानुसार १६ ते १७ जुनपर्यत महाराष्ट्र राज्यात मान्सुन दाखल होण्याची शक्यता आहे.