अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने- एकही व्ही आयपी नाही – Nirmala Sitharaman’s daughter got married in a simple ceremony

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला सोहळ्यात एकही व्ही आयपी नव्हता – Nirmala Sitharaman’s daughter got married in a simple ceremony

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीचा विवाह निर्मला सीतारमण यांच्या बंगळुरू येथील घरी गुरूवारच्या दिवशी ८ जुन रोजी अत्यंत साधेपणात झाला.

Nirmala Sitharaman’s daughter got married in a simple ceremony

नुकत्याच विवाह झालेल्या निर्मला सीतारमण यांच्या मुलीचे नाव परकला वागमई असे आहे.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मुलीच्या विवाहात फार मोजक्याच लोकांची उपस्थिती पाहावयास मिळाली.

परकला हिच्या लग्नाच्या सोहळ्यात फक्त जवळचे नातेवाईक कुटुंबातील मुख्य सदस्य अणि काही मित्र मैत्रिणी दिसुन आले आहे.ह्या विवाहात कुठल्याही राजकीय नेते मंडळींची उपस्थिती पाहावयास मिळाली नाहीये.

निर्मला सीतारमण यांच्या जावयाचे नाव प्रतिक असे आहे प्रतिक अणि परकला वागमई ह्या दोघांचा विवाह एकदम साध्या पद्धतीने ब्राह्मण परंपरेनुसार पार पडला आहे.

उडपपी अदमारू मठातील संतांच्या आशिर्वादासह ह्या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.निर्मला सीतारमण यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचे शेअर केलेले फोटो सोशल मिडिया वर व्हायरल होताना दिसुन येत आहे.

व्हिडिओ मध्ये विवाहात वैदिक मंत्रोच्चार करत असल्याचे दिसून येत आहे वधू परकला वागमई अणि वर प्रतिक दोघांच्याही जवळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण उभ्या असलेल्या फोटोमध्ये दिसुन येत आहे.

निर्मला सीतारमण यांच्या मुलीच्या विवाहात दिसुन येत असलेल्या ह्या साधेपणाचे सोशल मिडियावर सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

निर्मला सीतारमण ह्या भारताच्या अर्थमंत्री आहेत तरी देखील त्यांनी आपल्या मुलीचा विवाह थाटामाटात मोठ्या जल्लोषात न करता अत्यंत साध्या पद्धतीने ब्राह्मण परंपरेनुसार पार पाडला आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विवाहात निर्मल सीतारमण यांचा परिवार नातलग वगळता इतर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नेते कार्यकर्ते देखील दिसुन आलेले नाहीये.

अर्थमंत्री असुन इतक्या साधेपणाने आपल्या मुलीचा विवाह पार पाडल्यामुळे निर्मला सीतारमण यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.

See also  बाल शिवाजी चित्रपटात आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका - AKASH THOSAR TO PORTRAY BAL SHIVAJI

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जावई २०१४ पासुन पीएमओ मध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे.निर्मला सीतारमण यांचा जावई प्रतिक हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यालयात प्रतिक हा रिसर्च असिस्टंट ह्या पदावर कामाला होता.नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर प्रतिक हा मोदींनी बोलावल्याने पीएमओ मध्ये कामाला लागला होता.

प्रतिकने एका सिंगापूर मधल्या मॅनेजमेंट स्कुल मधून पदवी प्राप्त केली असल्याचे सांगितले जात आहे.अणि सध्या तो पीएम ओ मध्ये ओएसडी officer on special duty म्हणून काम करत आहे.

परकला वागमई ही एक जर्नलिस्ट आहे तिने जर्नलिझम मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.याचसोबत तिने दिल्ली युनिव्हसिर्टी मधून इंग्रजी लिटरेचर मध्ये एम ए केले आहे.